Tuesday, January 16, 2024

न्यायडोंगरी येथील विविध मागण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ भारती पवार यांच्याकडे निवेदन सादर,




न्यायडोंगरी (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावाच्या बरोबर मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची अप डाऊन मुंबई -  भुसावळ   या रेल्वे मार्गावरील तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम जोरात सुरू झालं आहे.  ‌ न्यायडोंगरी गावाच्या पूर्व भागाकडे असणारा गावाचा अर्धा भाग त्याचबरोबर हिंगणे देहेरे , पिप्रीहवेली , परधडी, पिंपळगाव ,राजदेहरे ,ढेकू, जातेगाव ,बोलठाण ,या गावांचा न्यायडोंगरी च्या पश्चिम भागाशी संबंध तुटला असून , पुलाच्या कामामुळे मराठवाडा व खान्देश ला जोडणारी वाहतूक पूर्णतःबंद झाली आहे .रेल्वेचे सबंधित अधिकारी व काम करणारे ठेकेदार यांनी लोकांना वापरण्यासाठी तात्पुरती का होईना पर्यायी व्यवस्था करून न दिल्याने मोठ्ठा पेच निर्माण झाला.  त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व गावातील गावकऱ्यांनी माजी आमदार अनिल दादा आहेर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कुटुंब कल्याण व आदिवासी विकास मंत्री भारतीताई पवार यांची नाशिकच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली .  या समस्या मार्गी लावणे कामे आग्रह धरला असता , भारतीताई यांनी लागलीच दखल घेत सबंधित अधिकारी यांची कानउघाडणी करीत पर्यायी नव्हे तर  कायम स्वरुपी व्यवस्था करण्याचे आदेश दिल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
                   यावेळी रस्त्याच्या मागणी बरोबरच धुळे ते मुंबई या प्रवासी रेल्वे गाडीस  न्यायडोंगरी  स्थानकावर थांबा मिळावा यासाठी ही निवेदन देण्यात आले . यावेळी आग्रह धरण्यात आला असता लवकरच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री भारतीताई पवार यांनी शिष्टमंडळास दिले . यावेळी नांदगाव तालुक्यातील विविध समस्या व विकास कामाच्या संदर्भात अनिल दादा आहेर यांचेशी चर्चा करण्यात आली . नांदगाव मतदार संघाने मला दिलेले मताधिक्य माझ्या स्मरणात असून त्याची उतराई होण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याने तुम्ही मला सार्वजनिक कामासाठी विनंती न करता आदेश द्या असा आदरभाव या वेळी भारतीताई पवार यांनी व्यक्त केला. न्यायडोंगरी गावात उभारण्यात आलेल्या विविध लोकऊपयोगी वास्तुंसाठी संरक्षक भिंत बांधने कामी निधी देण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले आहे. या शिष्टमंडळात मा. आमदार अनिल दादा आहेर ,  जेष्ठ पत्रकार जगनाथ आहेर,माजी सभापती राजेंद्र आहेर , उपसरपंच अमोल आहेर ,शिवाजी बच्छावं, अनिल वाघ, नवनाथ बोरसे ,जिभाऊ पवार , तात्या राठोड , सोमनाथ पवार , भैय्या आहेर,धनंजय आहेर, निंबा आहेर, गणेश आहेर, गुड्डू शेख यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...