मनमाड ( विशेष प्रतिनिधी) - आपल्या सर्वांना मूलभूत सुविधांच्या विकासकामांसह,आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय असलेल्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारेन असा जो शब्द दिला होता.त्याची आज आपूर्ती करताना माझा आनंद द्विगुणित झाला आहे.असे भावनिक प्रतिपादन आ.सुहास कांदे यांनी केले.
शहरात डॉ.बाबासाहेब यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबीत होता.तो प्रश्न महत्वाचा माणून आमदार सुहास कांदे यांनी आज त्याची पूर्तता केली.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यापीठावर पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे,राजेंद्र पगारे,बबलू पाटील,गंगाभाऊ त्रिभुवन,मयूर बोरसे,शाईनाथ गिडगे,सौ.अंजुम सुहास कांदे,फरहान दादा,उपस्थित होते.
आमदार कांदे पुढे म्हणाले की,अनेक मोठ्या लोकांनी या मतदार संघाचे लोकप्रतिनिधित्व केले,पण ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागणी बाबत काही करू शकले नाही,ते भाग्य माझ्या वाट्याला आले.तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या.! भविष्यात शिवसृष्टी सारखीच भीमसृष्टी उभारेन.! असा शब्द देतो, असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी यांनी ही आमदार सुहास कांदे यांच्या कार्याचा गौरव केला.इतिहासात प्रथमच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्याची घटना अलौकिक असल्याचे सांगून हा क्षण मनात साठवून ठेवा असे ते म्हणाले.तसेच आमदार सुहास कांदे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला आहे.तुम्ही भाग्यवान आहात असे ते शेवटी म्हणाले.
या सोहळ्याला उपस्थित पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी व आ.सुहास कांदे,व सौ.कांदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.आज माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यामुळे शहरातील विविध भागातून मिरवणूक काढून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी या मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली.यानंतर सर्वपक्षीय नेते सर्व समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले भीम व आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
मनमाडकर समाज बांधवांकडून आमदार सुहास अण्णा कांदे यांचा नागरिक सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
लोकार्पण सोहळा सुरू असताना आकाशातून हेलिकॉप्टर द्वारे पुष्पृष्टी करण्यात आली, दोन हेलिकॉप्टर ने आकाशात सात वेळा घिरट्या मारत स्मारकावर पुष्पवृष्टी केली.लोकार्पण सोहळ्यानिमित्त कमालीचा उत्साह आनंद जल्लोष समाज बांधवांमध्ये पाहण्यास मिळाला.
No comments:
Post a Comment