मांडवड ( प्रतिनिधी ) - पुढच्या पिढीला शहीद संदीप मोहिते यांच्या बलिदानाची ,देशासाठी केलेल्या कर्तव्याची जाणीव रहावी,त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे उचित असे स्मारक या मांडवड गावात उभारणार असे जाहीर करून तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी संदीप मोहिते यांच्या बलिदानाचा गौरव करताना आ. सुहास कांदे पुढे म्हणाले की,आपले भारतीय जवान आपल्या देश बांधवांसाठी,देशासाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात.त्यांच्यामुळेच आपण आणि आई - बहीण किंवा संपूर्ण कुटुंबं सुरक्षित आहे. नांदगाव तालुक्याच्या वतीने आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार सिद्धार्थ मोरे,पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,माजी आ.अँड.अनिल आहेर, आ.संजय पवार,जगन्नाथ धात्रक,विलास आहेर,शिवसेना तालुका प्रमुख शाईनाथ गिडगे, राजेंद्र पवार,किशोर लहाने,सागर हिरे,समाधान पाटील,अंकुश कातकडे,अँड.जयश्री दौंड,राजेश बनकर,गटविकास अधिकारी संदीप दळवी,विठ्ठलं आहेर,आदिंसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment