नांदगाव (प्रतिनिधी ) - उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सौ. अंजुम कांदे मार्गदर्शन करताना बोलत होत्या. शासनाकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य विनियोग करा,दहा पैशाचे वीस पैसे कसे होतील. याचा सारासार विचार करून व्यवसाय करा.आणि आपली आर्थिक प्रगती साधा असे आवाहन समाजसेविका सौ.अंजुम कांदे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या तालुकाप्रमुख सौ.विद्या जगताप, शहरप्रमुख रोहिणी मोरे,मनमाड शहर प्रमुख सौ.संगीता बागुल, बँक ऑफ बडोदा चे शाखाधिकारी मनजीत शहारे,प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी,स्वयं सहाय्यता बचत गटाचे अशोक अहिरे (साकोरा प्रभाग),भालूर प्रभाग चे दीपक सोनवणे,न्यायडोंगरी चे राहुल भदाणे,तालुका समन्व्यक अश्विनी जाधव,आदी उपस्थित होते.
सौ.कांदे बोलताना म्हणाल्या की,ज्या जबाबदारीने कर्ज घ्याल,त्या जबाबदारीने फेडले ही पाहिजे जेणेकरून तुमची पुढची प्रगती सुखकारक होईल.तसेच या दृष्काळी तालुक्यातल्या माझ्या माता भगिनींना त्यांच्या घरातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपले आमदार सुहास कांदे यांनी व मी एक महत्वकांक्षी योजना आखली आहे.येत्या काही महिन्यात ते काम सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत.त्यासाठी दवा अन दुवा ची गरज आहे,तर दवा आम्ही देतो दुवा तुम्ही करा.! असेही त्या यावेळी म्हणाल्या.
पहिल्या टप्यात किमान २५ हजार महिलांना रोजगार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.असे त्या शेवटी म्हणाल्या.याप्रसंगी तालुक्यातील गिरणानगर येथील ६ बचत गट तर लोहशिंगवे येथील ५ महिला बचत गटांना बँक ऑफ बडोदा कडून प्रत्येकी १ लाख ५० हजार असे १६ लाख ५० हजार रुपये कर्जाच्या धनादेशाचे वितरण सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
No comments:
Post a Comment