नांदगाव ( प्रतिनिधी) - तब्बल ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि मराठा समाज बांधवांची साडेतीनशेच्या वर बळी गेल्यानंतर अखेर मराठा आरक्षण संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या खडतर संघर्षानंतर अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले. या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी . यासाठी सकल मराठा समाज नांदगाव तालुक्याच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण काल शनिवारी दि. १० फेब्रुवारी पासून भास्कर झाल्टे व विशाल वडघुले यांनी सुरू केले आहे. या बेमुदत आमरण उपोषणकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मनोज दादा जरांगे पाटलांच्या सभेत हृदयविकाराच्या झटक्याने तांदूळवाडीचे कै.दादासाहेब पुंडलीक काळे यांचे दुःखद निधन झाले . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हे बेमुदत आमरण उपोषण सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी सकल मराठा समाज बांधवांना जाहीर आवाहन केले की, या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विधानसभेच्या व विधान परिषदेच्या मराठा आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी . यासाठी मराठा समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातील विद्यमान आमदारांना फोन कॉल करून किंवा मेसेज पाठवून या अधिवेशनात मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडावे. तसेच या शेवटच्या अंतिम निकराच्या लढाईत मोठ्या संख्येने सामील होऊन हा लढा यशस्वी करावा ज्या समाज बांधवांना या बेमुदत आमरण उपोषणात सहभागी व्हायचे असेल . त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा . याप्रसंगी किरण जाधव,महेंद्र जाधव, विष्णू चव्हाण,गणेश काकळीज,ज्ञानेश्वर कवडे,सजन तात्या कवडे,विजय पाटील,निवृत्ती खालकर,गणेश सरोदे आणि भिमराज लोखंडे उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
क.भा.पा. विद्यालयातील एम.पी.सोनवणे सरांना WHC संघटनेतर्फे राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार,
नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी ) - कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,साकोरे येथे गुरुवारी दि. १९ सप्टेंबर र...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment