नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मध्यस्थीने साकोरा नवीन पाणी योजनेसाठी वीज वितरण कंपनीचे तात्काळ वीज पुरवठा देण्याचे आदेश काढलं आहे. जलजीवन योजनेअंतर्गत गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली आहे. मात्र मागील थकबाकी मुळे वीजपुरवठा मिळत नसल्याने ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट कोसळल्याने त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे कैफियत मांडताच ; तत्काळ वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने साकोरा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
तालुक्यातील साकोरा गावासाठी यापूर्वी असलेल्या एका पाणी योजनेची वीज थकबाकी प्रलंबीत आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी या गावासाठी जल जीवन योजनेअंतर्गत सुमारे ४ कोटी ९२ लाख रुपये किमतीची योजना गिरणा धरणातून मंजूर करून आणली.आजमितीस ते काम पूर्ण झाले आहे.मात्र मागील थकबाकी भरल्याशिवाय नवीन योजनेस वीज पुरवठा देणार नाही,अशी भूमिका वीज वितरण कंपनीने घेतल्याने साकोरा ग्रामस्थांनां पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.
या संतापातून ग्रामस्थ,महिला,या सर्वच घटकांनी या पाणी टंचाई विरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.तेव्हा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या मध्यस्थीने सदर ग्रामस्थांनी आ.सुहास कांदे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. तेव्हा आ.कांदे यांनी ग्रामस्थ व वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता वाटपाडे यांची बैठक घेऊन पाणी टंचाई ची सद्यःस्थिती विषद केली.
आमदार सुहास कांदे यांनी सदर थकबाकी ग्रामपंचायतीने हप्ते करून भरून टाकावी.असे आवाहन केल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन तयार झाले.तेव्हा आमदारांच्या या मध्यस्थीनंतर नवीन योजनेसाठी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा देण्याचे मान्य केले.व तसे मंजुरीचे पत्र ही दिल्याने साकोरा वासियांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment