Monday, March 11, 2024

नांदगाव येथे जिम व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन,







नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील भोंगळे रस्त्यालगत आमदार सुहास कांदे यांच्या निधीतून होलार समाजासाठी व्यायामशाळा व सभागृह मंजूर करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
  नांदगाव शहर व परिसरातील होलार समाज तरुणांच्या मागणीनंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तात्काळ समाजातील तरुणांकरिता व्यायामशाळा व सभागृह मंजूर केले. तरुण पिढीने व्यसनाकडे न वळता व्यायाम करावा या उद्देशाने मतदारसंघात अनेक ठिकाणी व्यायाम शाळा बांधून देण्यात आले आहेत.
    याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर,माजी नगरसेवक नंदू पाटील,शहर अध्यक्ष सुनील जाधव,सौ.रोहिणी मोरे,रामनिवास करवा, विजय चोपडा,भगवान सोनावणे,रवी सोनावणे,रोहिदास सोनावणे, नामदेव सोनावणे, पंडित गेजगे, संजय गेजगे,शिरूभाऊ शेलार, पप्पू सोनावणे,पप्पू जाधव,नितीन सोनावणे, बापू जाधव, सागर सोनावणे,सर्वेश्वर हातेकर, बिरू जाधव,जय जाधव, आंबा सोनवणे, संजु सोनवणे, गणेश हातेकर, अंबादास खांडेकर आदिंसह मोठ्या संख्येने  नागरिक,समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....