Tuesday, May 14, 2024

नांदगावच्या गंगाधरीजवळ एसटी बस - अल्टो कार अपघातात तीन ठार तर एक गंभीर जखमी,






नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील गंगाधरीजवळ एसटी बस व अल्टो कारच्या अपघातात दोन महिलांसह एक पुरुष मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली असुन, या अपघातात एक  तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले असुन त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे .अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की , नांदगाव बस डेपोची चाळीसगाव - नांदगाव  एसटी क्रमांक एम. एच .14 .बीटी. 4498 व 
अल्टो गाडी एम‌. एच. 15 . सीडी. 2057 ही पळसे येथून भडगाव कडे जात असताना एसटी बस ने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरच्या समोरासमोर  धडक होऊन अॅल्टो  कारमधील दोन महिलेसह एक पुरुषाचा मृत्यू झाला असुन या कारमधील एक तीन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले असुन त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे . या अपघाताचे वृत्त समजताच आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.  यावेळी गौरव बोरसे रुग्णवाहिका घेऊन हजर झाले . नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मयत शुभम संतोष नलावडे (वय २४),  वंदना संतोष नलावडे( वर ४०), निकिता मनोज शिंदे (वर २२)  घोषित केले . यावेळी नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे सह  हवालदार संदीप बच्छाव,  पोलिस नाईक नंदू चव्हाण , ठाणे अंमलदार राजेंद्र मोरे सह मुददसर शेख घटना स्थळी हजर होवून पंचनामा केला आहे. एसटीच्या अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असुन याबाबत शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे .

No comments:

Post a Comment

नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,

नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...