नांदगाव (प्रतिनिधी ) - दिंडोरी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून, सोमवारी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पार पडावे, यासाठी शहर पोलिस दलाने शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन केले. जिथे मतदान प्रक्रिया पार पडणार अशा ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी पोलिस बलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहे. याठिकाणी शांतता व्यवस्था अबाधित राहावी, यासाठी रूट मार्चचे आयोजन केले होते.यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव पोलीस ठाण्यापासून संचलनाला सुरुवात झाली. नांदगाव शहरातील डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक, अहिल्याबाई चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारक चौक प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आले. पोलीस ठाण्यात संचलनाचा समारोप झाला. संचलनात सहा पोलिस अधिकारी, महिला-पुरुष पोलीस कर्मचारी, तसेच गृहरक्षक दलाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment