नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील जामधरी शिवारातील गोपाळा नामक परिसरात काल दुपारी वीज कोसळून दोन शेळ्या व एका मेंढ्याचा मृत्यू झाला होता. तर मेंढपाळ किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तत्काळ तहसीलदारांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. व मदतीबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. या या ठिकाणी अचानक जोरदार पाऊस सुरु झाला. त्यावेळी भिकाजी तांबे यांच्या शेळ्या, मेंढ्या या परिसरात चरत होत्या. यावेळी या मेंढ्यावर वीज कोसळली त्यात दोन मोठ्या शेळ्या, एक नर मेंढा जागीच ठार झाले. तर जवळ असलेला सोनू गोटे हा किरकोळ भाजला. या घटनेची माहिती मिळताच आ.सुहास कांदे यांनी प्रतिनिधी राजेश शिंदे यांना पाठवून घटनेची माहिती घेतली. व तहसीलदारांना सूचना केल्यात. तलाठी श्रीखंडे यांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा करून तहसीलदार सुनील सौंदाणे यांना सादर केला आहे.
Tuesday, June 25, 2024
नाशिक येथे घडलेल्या घटनेचा नांदगावी निषेध, संबंधितांवर कठोर कारवाई करावी तहसीलदारांना निवेदन,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नाशिक येथे घडलेल्या काळाराम मंदिर येथील घटनेचा नांदगाव येथे आंबेडकरी जनतेने आंदोलन करून निषेध केला. यावेळी सबंधित व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी केली . तसेच सर्व आंबेडकर प्रेमी बंधू आंणि भगिनींना मंगळवार रोजी येथे रास्ता रोको करण्यात आला आहे. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौकात रस्ता रोको आयोजित करण्यात आला. त्या प्रसंगी सर्व आंबेडकरी अनुयायी बंधू भगिनींनि आंदोलनात हजार होते . या घटनेचा निषेध नोंदवत नांदगावचे तहसीलदार सुनील सैदाने यांना निवेदन पत्र देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते नाकसेन चव्हाण. अरुण साळवे ,जगताप सर, मनोज चोपडे ,सुनील जाधव ,अविनाश केदारे, रंजीत अहिरे ,राजू गांगुर्डे ,अर्जुन पवार ,भास्कर निकम ,देविदास मोरे ,गणेश शर्मा, अँड. सचिन साळवे, निर्मला केदारे ,अँड. विद्या कसबे भीम सैनिक उपस्थित होते.
नांदगाव, मनमाड मध्ये संतोष गुप्ता यांच्या अटकेच्या निषेधार्थ बंदला मोठा प्रतिसाद, सर्वपक्षीय नेत्यांचे पोलिस प्रशासनास निवेदन,
नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवाद खालच्या पातळीवर राजकारण किंवा दडपशाही गुंडगिरी नव्हती . मात्र आता तालुक्याला या सर्व गोष्टींची कीड लागली असुन याचा पहिला बळी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता हे ठरले आहे. त्यांच्यावर गांजा बाळगल्या प्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ नांदगाव शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने नांदगाव पोलिस ठाण्यात गर्दी केली. काल २५ जुन रोजी मनमाड व नांदगाव शहर कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा केली. याला मनमाड , नांदगाव मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुळात गुप्ता यांना संपूर्ण तालुका ओळखतो संतोष गुप्ता असे कृत्य करूच शकत नाही असे मत तालुक्यातील जनतेने व्यक्त केले. तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी दडपणात येऊन हा गुन्हा केला, असल्याचा आरोप तालुक्यातील राजकीय नेत्यांनी केला आहे.मनमाड येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी मनमाड बंद करण्यासाठी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन रॅली काढली व व्यापारी वर्गाला आवाहन केले. तर नांदगाव येथे गांधी चौक येथून सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चा काढला. हा मोर्चा महात्मा फुले चौक, दत्त मंदिर , सोनार गल्ली , छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे , महावीर मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , पोस्ट ऑफिस मार्गे पोलीस ठाण्यात नेण्यात आला.याठिकाणी नांदगाव शहरातील सर्वपक्षीय नेते सर्वसामान्य जनतेने जोरदार घोषणाबाजी केली. येथे नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी,खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या .यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक , माजी आमदार अनिल आहेर , माजी आमदार जगन्नाथ धात्रक, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विशाल वडगुले , नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे ,
काँग्रेस शहराध्यक्ष मनोज चोपडे , देविदास भोपळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरूण पाटील , शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद , शिवकन्या संगीता सोनवणे यांच्यासह आदी नेते व सर्वसामान्य जनतेने आपले मत व्यक्त केले मुळात ज्या दुकानात गांजा सापडला असे पोलिस सांगतात त्या दुकानात आदल्या रात्री चोरी झाली आणि याबाबत स्वतः संतोष गुप्ता हे रात्री पोलीस ठाण्यात गेले . मात्र पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता काही चोरी झाले नाही जाऊ द्या अशी भूमिका घेतली. यामुळे गुप्ता यांनीही दुर्लक्ष केले मात्र हा गांजा कोणीतरी आणून ठेवला हे गुप्ता व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सांगितले.याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर तसेच खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने तहसीलदारांचा करणार सत्कार..!
- नांदगाव तालुक्यात महसूल विभागाच्या डोळ्यासमोर रेती मुरूम यासह इतर अनेक अवैध राजरोसपणे व्यवसाय सुरू आहेत .तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी मटका, सोरट, दारू यासह पत्याचे क्लब सुरू आहेत. मात्र या ठिकाणी तालुक्याचे दंडधिकारी तथा तहसीलदार सुनील सौदाने यांचे दुर्लक्ष असते . मात्र कोणत्यातरी दैवी शक्तीने सौदाने यांना समजले आणि त्यांनी गुप्ता यांच्या दुकानात रेड केली. आणि कारवाई केली याबाबत आम्ही नांदगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार सुनील सौदाने यांचा नागरी सत्कार करणार आहे.
- संतोष बळीद, उपजिल्हाप्रमुख शिवसेना,
Friday, June 21, 2024
नांदगावच्या जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'फादर्स डे' साजरा,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'फादर्स डे' अर्थात पितृ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्कूलचे प्राचार्य मनी चावला यांनी भूषविले. या कार्यक्रम प्रसंगी युकेजीच्या चैतन्य दाभाडे,साई पवार,श्लोक फोफलिया या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या. तसेच याप्रसंगी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी 'पापा मेरी जान' या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. यावेळी पालकांसाठी बिल्डिंग टाॅवर, रनिंग रेस, बलून गेम्स इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे खेळामध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला. आपल्या वडिलांना खेळताना पाहून सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. तसेच वडिलांनी आपल्या मुलांबरोबर डान्स करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. वेगवेगळ्या खेळांमध्ये विजयी झालेल्या पालकांना संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालकांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आला. सर्व उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल संस्थेचे सचिव विजय चोपडा,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल, सुशीलकुमार कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल,महेंद्र चांदिवाल, प्रशासक पी.पी गुप्ता तसेच स्कूलचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी फादर डे च्या शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य मणी चावला सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
नांदगाव येथील होरायझन ॲकॅडमीच्या प्रांगणावर विद्यार्थ्यांनी ग्रीन- डे उत्साहात केला साजरा ,
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन ॲकॅडमी नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी ग्रीन- डे उत्साहात साजरा केला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे पोशाख परिधान करून झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा देश वाचवा असे विविध संदेश देणारे पोशाख परिधान करून सामाजिक संदेश दिला. झाडांची पाने, झाडांच्या आकाराची कलाकृती, झाडांची रोपटे आदी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत आणले होते पर्यावरण संतुलित राहावे यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे असाही संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी हरित भारत, पृथ्वीमाता असे अनेक पोस्टर बनवले होते, आपल्या मनपसंतीच्या गीतांवर नृत्य सादर केले. तसेच हिरव्या पालेभाज्या आणि हिरवी खाद्यपदार्थ आदी व्यंजनांचा आस्वाद घेतला. व वृक्ष,पक्षी, पृथ्वी यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या.
मविप्र समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व चिमुकल्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या श्रीमती.पी.डी.मढे, अकॅडमीचे शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Subscribe to:
Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...