Friday, September 20, 2024

क.भा.पा. विद्यालयातील एम.पी.सोनवणे सरांना WHC संघटनेतर्फे राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार,






नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी ) -  कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,साकोरे येथे गुरुवारी दि.  १९ सप्टेंबर रोजी शाळेतील नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले . या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड मा .  भगीरथजी शिंदे  ,इमारत उद्घाटन शुभहस्ते माजी खासदार, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा  राम शेठजी ठाकूर  ,प्रमुख उपस्थिती उत्तर विभागीय कार्यालय विभागीय अधिकारी मा .बोडखे साहेब ,सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब ,वडजे बापू , जिल्हा परिषद सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मा . रमेश उग्रसेन बोरसे ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीषभाऊ बोरसे ,विद्यालयाच्या प्राचार्या सौ. जगताप मॅडम या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन इमारतीचे उद्घाटन झाले .या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक  सोनवणे एम. पी.(सर) यांना World Humanity Commission (USA ) या संघटनेमार्फत राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाला आहे. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थ , शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सरांचे अभिनंदन केले.

नांदगाव शहरात ईद-ए-मिलाद निमित्त शांतीपूर्ण शोभायात्रा, मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित,






नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने नांदगाव शहरात दणाणुन गेले  होते. मिरवणुकीनतंर  ‘या अल्लाह जगात शांतता नांदू दे, देशात एकात्मता नांदू दे , देश महासत्ता होवू दे’ अशी प्रार्थना करत मुस्लिम समाज बांधवांतर्फे अल्लाहला कडे प्रार्थना करण्यात आली. सुन्नी जामा मस्जिद व अहेले सुन्नत वल जमाअत व जमात रजा-ए-मुस्तफा नांदगाव तर्फे सकाळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  होते.मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात पवित्र सण ईद-ए-मिलादुन्नबी बुधवार साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी नऊ वाजता नांदगाव एच् .आर. हायस्कूल कोट गल्ली जामा मस्जिद येथून  मिरवणुकीची सुरुवात झाली.त्यानंतर मुख्य मार्गाने कालीका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौका , शनी मंदिर येथून हुतात्मा चौक,  डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक,  महात्मा गांधी चौक,  महात्मा फुले चौक , दत्त मंदिर तसेच गावातील मुख्य रस्त्याने परत एच्. आर. हायस्कूल येथे समारोप करण्यात आला. ठिकठिकाणी  शोभायात्रेचे स्वागत करण्यात येवून गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले असून तसेच मिरवणुकीत सहभागी बांधवांकडून घोषणा देण्यात येत होत्या. तसेच ध्वनी प्रक्षेपकावरुन नातपाक व सलातो सलामचे पठण करण्यात येत  होते. मिरवणुकपूर्वी कार्यक्रम प्रसंगी नांदगाव पोलीस स्टेशनचे यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक यांच्या पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 या प्रसंगी अध्यक्ष मुज्जमील शेख,  उपाध्यक्ष मोसीन डाफेदार , कलिम शेख,  ग्यासोद्दीन शेख,  समिर पठाण,  शाकीर पठाण,  माजी नगरसेवक याकुब शेख, माजी नगरसेवक एकबाल शेख , नासिर पठाण , शरीफ शेख,  शकूर शेख, सेक्रेटरी मदरसा बबलू सय्यद  , दाऊद गणी शेख शरीफ, पिंजारी समाज अध्यक्ष  मन्सुरी  आदीसह मुस्लीमबांधव , बाळगोपाळ उपस्थित होते.



नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....