Monday, April 28, 2025

नांदगाव येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिस प्रशासनाकडे निवेदन,






नांदगाव (प्रतिनिधी ) - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगावला सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (दि.२८) रोजी पुकारण्यात आलेला नांदगाव बंद उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांनी दूकाने बंद ठेवून उस्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. पोलिसांना निवेदन देत घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. भारताचा मुकूट असलेल्या जम्मू काश्मिर येथील पह‌ल‌गाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप हिन्दू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला. हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर भारत सरकारने देऊन दहशतवादाचा समूळ नायनाट करावा अशी मागणी करण्यात आली. 
नांदगाव शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने ह्या हल्ल्याचा जळजळीत निषेध करण्यात आला . येथील हुतात्मा चौकात पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात येवून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. ह्या हल्ल्याचा प्रतीशोध भारत सरकारने कठोर कार्यवाही करून घ्यावा आशयाचे निवेदन सकल हिंदू समाजच्या वतीने नांदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना देण्यात आले. यावेळी शहरातील सकल हिंदू समाज, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...