Sunday, June 29, 2025

नांदगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांनी हाती घेतले शिवसेनेचे धनुष्यबाण, प्रवेश होताच तालुका संघटकपदी नियुक्ती!!








नांदगाव (प्रतिनिधी ) -  भुजबळांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नांदगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले . आमदार सुहास  कांदे व सौ. अंजुम सुहास कांदे यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना वाल्मीक टिळेकर यांनी मागील दहा वर्षांपासून माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या सोबत काम केले. पण अपेक्षित कामी झाली नाहीत आणि आमदार सुहास कांदे यांची कार्यपद्धत आधीपासूनच आवडत होती. आता सर्व समर्थकांकडून आम्ही हा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही अण्णांसोबत विकास कामांच्या सोबत आहोत असे मत व्यक्त केले. 
      याप्रसंगी वाल्मिक टिळेकर यांना (नांदगाव तालुका संघटक ) पदाची जबाबदारी देण्यात आली.
सोबतच गणेश पंडित सोमासे यांची (युवा सेना विभाग प्रमुखपदी) , शरद तुळशीराम महाजन यांची (युवा सेनेच्या नांदगाव शहर उपाध्यक्षपदी) , सतीश परशुराम महाजन यांची( युवासेनेच्या शहर सहसंघटक पदी), तर डॉ. वाल्मीक भास्कर महाजन यांची (शिवसेना नांदगाव शहर संघटक पदी ) नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल नावंदर यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्ष स्वागत केले.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...