Sunday, June 29, 2025

नांदगाव येथील समृद्धी सहकारी बँक लिमिटेडचे उत्साहात उद्घाटन,








नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील सौ. अंजुम सुहास कांदे  चेअरमन असलेल्या  समृद्धी सहकारी बँक लिमिटेड  उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. आमदार सुहास कांदे व सौ . अंजुम कांदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.  याप्रसंगी नांदगाव मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी,  शिवसेना नेते पदाधिकारी,  महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास कांदे यांनी या बँकेच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला व्यापाऱ्यांना लहान मोठा व्यवसाय करणाऱ्यांना शेतकरी बांधवांना फायदा होईल. या प्रामाणिक हेतूने आम्ही बँक सुरू करत आहोत असे सांगितले. बँकेच्या शुभारंभ आधीच वीस कोटी रुपयांची ठेवी जमा झाली असून,  विधानसभा मतदारसंघातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. सौ. अंजुम कांदे यांनी यावेळी खातेदार आणि बँक यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असा विश्वास दाखवला. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नेतेमंडळी,  व्यापारी वर्ग , शेतकरी बांधव तसेच महिला वर्गांनी सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...