नांदगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या २०२६ च्या बारावी (HSC) परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इयत्ता १२ वी (HSC) बोर्ड परीक्षेच्या आसनव्यवस्था करण्यात आली आहे.परीक्षा केंद्र (केंद्र क्रमांक: 0220) असून, परिक्षेत एकुण ६३७ विद्यार्थी प्रविष्ट आहे. या परिक्षेसाठी विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव, जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालूर, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरे असतील. यात शाखानिहाय आसनव्यवस्था
परीक्षार्थींची आसनव्यवस्था त्यांच्या शाखेनुसार आणि बैठक क्रमांकांनुसार विज्ञान (Science) - S025079 ते S025377 व कला (Arts) - S106705 ते S106953, वाणिज्य (Commerce) - S159649 ते S159735, वोकेशनल कोर्स - S173124 ते S173127 अशी निश्चित करण्यात आली आहे.
ब्लॉक आणि इमारतीची रचना मंगळवारी होणाऱ्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी एकूण २६ ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. त्यांची विभागणी प्रमाणे या आहे वरचा मजला ब्लॉक १ ते १४, खालचा मजला: ब्लॉक १५ ते २४, तळमजला (Ground Floor): ब्लॉक २५ व २६ असून, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी. यासाठी संपूर्ण कॅम्पसमध्ये CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
या परिक्षेसाठी प्रशासकीय प्रमुख प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील,
केंद्र संचालक आहेर पी. एम, उपकेंद्र संचालक राठोड डी. एम, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी परीक्षेच्या यशस्वी नियोजनासाठी कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment