Friday, June 9, 2023

नांदगाव च्या प्रशासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत मनसेचे निवेदन,


 
 नांदगाव (प्रतिनिधी) -  प्रशासकीय कार्यालयातील  सीसीटीव्ही कॅमेरे लावून चालू करण्याबाबत  नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना मनसेतर्फे निवेदन देण्यात आले. 
नांदगाव तहसिलला अद्यावत नवीन इमारत मिळाली असून या नवीन इमारतीमध्ये अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत. परंतु या इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आलेले नाहीत. तरी आपणास निवेदन देत आहोत की , शासकीय धान्य गोदाम तहसील कार्यालय ,सहकार विभाग, खरेदी विक्री कार्यालय ,वनविभाग कार्यालय ,कृषी कार्यालय, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयांमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावून ते चालू ठेवण्याबाबत आम्ही आपणास २१ दिवसाची मुदत देत आहोत .अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी आपली असेल.निवेदनावर मनसे नांदगाव तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात, नांदगाव शहराध्यक्ष अभिषेक विघे, नांदगाव तालुका अध्यक्षा महिला रेखा शेलार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

नांदगाव येथे नांदेड जिल्ह्यातील बोंढारहवेली भालेराव हत्याकांड संदर्भात जन आक्रोश मोर्चा,



नांदगाव( प्रतिनिधी) - नांदेड पासुन ३ की मी अंतर असलेल्या बोंढारहवेली, जि. नादेंड या गावात बौध्द तरुण अक्षय भालेराव यांचा खुन करण्यात आला. अधिक वृत्त,  असे की नांदगाव शहरातील सर्व पक्षीय व बौध्द समाज बांधवांनी तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना भारतीय स्वतंत्रचा अमृत महोत्सव भारतभर साजरा केला जात असतांना आज ही मानसिक विकृतीने लोक ग्रासलेले असुन त्यांना जातीयतेची लागण झाल्याचे वारंवार दिसून येत त्याचीच प्रचीती नांदेड जिल्ह्यातील बोंढारहवेली या गावात रहात असलेल्या बौध्द तरुण अक्षय भालेराव यांचा (हत्याकांड घडले)खुन करण्यात आला.! 
या गावात पहिल्यांदाच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. याचा राग मनात धरून या गावातील बौध्द तरुण अक्षय भालेराव याला काही जातीयवादी गाव गुंडयांनी त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे. अशा विकृत व्यक्तींना कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच हे फरार आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहे त्या संघटनेवर कारवाई करण्यात यावी तसेच पिडीत व्यक्ती व बौद्ध वस्तीला संरक्षण मिळावे शिवाय ॲट्रॉसिटी अॅक्ट 302 अंतर्गत झालेल्या कारवाई 120 ब चा समावेश करावा व अशा गावगुंड्यांना फाशीची शिक्षा करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.तसेच जातेगाव नांदगाव येथील जमिनीच्या वादातून प्राथमिक शिक्षक शरद पवार व त्यांनी आणलेल्या गावगुंडांची तुकाराम लाठे व त्यांच्या परिवारास भ्याड हल्ला करून तुकाराम यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.! त्यांच्यावर व त्यांनी आणलेल्या गावगुंड्यावर कारवाई व्हावी व लाठे कुटुंबीयांना संरक्षण मिळावे त्यात दिरंगाई झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंबेडकर अनुयायी यांनी दिला निवेदनात त्या निषेधार्थ आज नांदगाव  शहरातील आंबेडकर अनुयायींनी नायब तहसिलदार मोरे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे (पाटिल) यांना निवेदन देण्यात आले अक्षय भालेराव याला गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत भाग घेतल्यानं  गावातील काही जातीयवाद लोकांनी त्याचा खुन केल्याचा आरोप करण्यात येतोय.! त्या संदर्भात आज नाशिक जिल्ह्यातील तालुका नांदगाव या शहरात अक्षय भालेराव यांना न्याय देण्यासाठी आंबेडकर अनुयायी एकवटले होते त्यांनी जन आक्रोश मोर्चा काढुन सरकारला धारेवर धरले होते सरकाराचा निषेध व्यक्त केला यावेळी उपस्थित असलेल्या समाजबाधवांनी आक्रोश करत भाषणे ही  केली होती यावेळी अरुण साळवे, वाल्मीक जगताप, भास्कर निकम,विलास कोतकर, माजी नगरसेवक नितिन जाधव, देविदास मोरे. अनिल जाधव ,विश्वास आहिरे, महाविर जाधव, अनिल कोतकर, संदीप पवार, सचिन साळवे, नाना जगताप,अविनाश केदारे फिरोज शेख, कपिल तेलुरे, राज पवार, निर्मला केदारे,अलका रूपवते,संगिता वाघ, विद्या कसबे,जयश्री डोळे तसेच ग्रामीण भागातील  वयोवृद्ध महिला पुरुष आणि तरुण आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने या जन आक्रोश मोर्चेत सहभागी झाले होते. बौध्द पध्दतीने अक्षय भालेराव याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून वंदना घेण्यात आली.

Tuesday, June 6, 2023

नांदगाव शहरातील नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूलचे नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात,




  नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील ५ जून  रोजी नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो  इंटरनॅशनल स्कूल चे नवीन वर्षाची  सुरुवात झाली. नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल , उपाध्यक्ष सरिता बागुल, रेंनबो  इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली   नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे एक अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.  संपूर्ण शाळा ही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सुसज्ज करण्यात आली होती. शाळेला फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती. नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल यांनी विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबिन कट करून स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांनी सरस्वती मातेला नमस्कार करून  आपल्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाला सुरुवात केली.विद्यार्थ्यांना सरप्राईज गिफ्ट वाटप करून स्वागत करण्यात आले.  याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्ये सनई संबळ वर ठेका धरत नृत्य सादर केले त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद हा द्विगुणित झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली भांगे यांनी केले.
               हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी रेनबो  इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका अश्विनी केदारे,  प्रियांका खांडेकर, चैताली अहिरे, मोनाली गायकवाड, एडना फर्नांडिस, अनिता जगधने ,दिपाली भांगे , तसेच मदतनीस वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे  त्याचबरोबर बरोबर शाळेतील ड्रायव्हर विनोद भाऊ, गजानन भाऊ, मंगेश भाऊ, बाळू भाऊ, रवि भाऊ, चंदू भाऊ  सागर भाऊ या सर्वांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचे अति उत्साहाने स्वागत केले.

Friday, June 2, 2023

नांदगावच्या एच.आर.हायस्कुल एसएससी दहावी उर्दू माध्यमाचा ९७.६१% निकाल, आफिया जावेद खाटीक हीने ८९ टक्के मिळवून शाळेत प्रथम ,

८९.००%
                          ८७.२०%
                         ८६.८०%

नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगावच्या एच‌.आर. हायस्कूल उर्दू माध्यमाच्या एसएसी ९७.६१% निकाल अॉनलाईन पध्दतीने संकेतस्थळावर जाहीर झाला. या हायस्कूल मधील विद्यार्थी आफिया जावेद खाटीक ८९.००% मिळवून शाळेत प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झाली. नांदगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी संचलित एच.आर. हायस्कूल नांदगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी ही कायम ठेवली आहे. शाळेचा एकत्रित निकाल ९७.६१ % लागला. यावर्षी परिक्षेत एकुण ४२ विद्यार्थी बसले होते. त्यात २० विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये, तर १५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आणि ६ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतील आफिया जावेद खाटीक हीने ८९.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक जुबीया रफीक अन्सारी ८७.२०% , तृतीय क्रमांक जुफीन   शेख साबीर ८६.८०% मिळवला आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख सईद सर, आरीफ खान सर, इस्राईल सर, इर्शाद सर, जेबा मॅडम, समरिन मॅडम , सज्जाद खान सर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या तर भविष्यात चांगल्या निकालाची इच्छा व्यक्त केली.

नांदगावमधील व्ही.जे. हायस्कूल १० वी चा निकाल ९७.४२ टक्के, कु.वैष्णवी प्रवीण जावरे ९८.४० टक्के गुण मिळून शाळेत प्रथम,




नांदगाव ( प्रतिनिधी )  - नांदगाव येथील व्ही.जे.हायस्कूल मधील २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षातील मार्च २०२३ चा एस.
एस.सी. निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने दुपारी एक वाजता जाहीर झाला.या वर्षीही शाळेने चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .या वर्षी विशेष श्रेणीत १२६ तर प्रथम श्रेणीत ९८ विद्यार्थी गुण मिळून उत्तीर्ण झाले आहेत.
 कु.वैष्णवी प्रवीण जावरे हीने ९८.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहेे. त्याच प्रमाणे कु. मोहिनी सोमनाथ देशमुख ९७.४० टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक तर कु. मृणाल मंदार रत्नपारखी९६.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक तर कु.केतकी विनायक बोरसे ९६ टक्के,श्रुती संजय देशमुख ९५.८० टक्के,मानसी शामपुरी गोसावी ९४.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थांचे कार्याध्यक्ष डॉ.राजेंद्रजी कलाल, सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला, संकुल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर,उपमुख्याध्यापक दीपक बाकळे,पर्यवेक्षक मनोहर शिंदे , टी.एम.भैय्यासाहेब चव्हाण ,भास्कर मधे,वर्गशिक्षक दिपाली सांगळे,विलास काकळीज ,रविंद्र ठाकरे ,राकेश ननावरे तसेच शाळेतील सर्व पदाधिकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Thursday, June 1, 2023

आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या अंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ ,



                        
 नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद येथे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या अंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. नांदगाव नगरपरिषद्वारा आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शहरातील १०७ दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेद्वारा राजगीर ,सर्वज्ञ, सप्तशृंगी, गौरी या बचत गटांना प्रत्येकी रुपये १५००००/- चे धनादेश वितरित करण्यात आले. नसीब, सोनचाफा ,व सिल्की या बचत गटांना आयसीआयसीआय बँक द्वारा प्रत्येकी पाच लाखाचे धनादेश वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री पथविक्रेता योजना या योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक ,बँक ऑफ बडोदा, युनियन बँक इत्यादी बँकेद्वारा आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते ५५ लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. ५ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेअंतर्गत परिचय बोर्डाचे वाटप करण्यात आले. तसेच दारिद्र्य रेषेखालील दाखल्यांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण बँक द्वारा पथविक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आले.अंजुमताई कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी   बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी हनुमंते, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी जयंत अमृतकर मुक्ता कांदे प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे कर निरीक्षक विजय कायस्थ, रविन्द्र चोपडे, सुनील पवार, विजया धनवट, बिजला गंगावणे आदी उपस्थित होते. .     
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक . विवेक धांडे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद महिरे (सहायक प्रकल्प अधिकारी) यांनी केले.

गिरणानगर हद्दीतील आदिवासी महिलांचे प्रश्न मार्गी लागणार , अंजुमताई कांदे यांचे उपोषणाला बसलेल्या महिलांना आश्वासन,




 नांदगाव (प्रतिनिधी) -    गिरणा नगर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीवरील महिला, समाज बांधव विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले होते. या संबंधी माहिती मिळताच सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी येथे भेट दिली. 
     आदिवासी महिलांच्या विविध अडचणी समजून घेतल्या, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांवर त्वरित सोडवल्या जातील असे सांगितले. या वेळी बि.डी.ओ. गणेश चौधरी साहेब,विस्तार अधिकारी मांडवडे साहेब उपस्थित होते. 
      आदिवासी वस्तीवर घरकुल, शौचालय, पाणी , शासकीय कागदपत्रांची अडचणी लक्षात घेता ताईंनी त्वरित पाण्याचे टँकर पाठवण्याचे सांगितले तर त्वरित वस्ती साठी शौचालय ची व्यावस्था करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बिडीओ यांनी शबरी घरकुल योजना अंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. 
       अनेक आदिवासी कुटुंबियांना रेशन कार्ड, जातीचे दाखले तसेच विविध कागदपत्रं नाहीत किंवा अडचणी आहेत त्यांना सर्वांना मोफत शासकीय सुविधा अंतर्गत आमदार संपर्क कार्यालयातून सर्व मदत केली जाणार आहे आणि त्यासाठी सर्वांना कागदपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  तसेच लवकरच मोफत दवाखाना व मोफत शासकीय सुविधा कॅम्प आयोजित करणार असल्याचे सांगितले. 
      आदिवासी महिला व कुटुंबियांच्या उपोषण स्थळी भेट दिल्या बद्दल उपोषणकर्त्यांनी ताईंचे आभार मानले.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...