Tuesday, January 2, 2024

नवीन मोटार वाहन कायद्यातील अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन!!






नांदगाव ( प्रतिनिधी ) -  केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर आहे. असे वाहनचालकाचे म्हणणं आहे. या कायद्याला अनेक पक्ष, संघटना विरोध करत आहेत. या  कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास ७ वर्षांची शिक्षा तसेच १० लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.चालकांना भिती वाटावी असा जुलमी, कठोर व अत्याचारी मोटर वाहन कायदा केन्द्र सरकारने आणला आहे.या कायद्यामुळे स्वत:चे वाहन चालवण्यासही लोकांना भिती वाटत आहे. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाला तर १-२ वर्षांची शिक्षा व १००० रूपयापर्यन्त दंड होता. पण नवीन कायद्यानुसार ७ वर्षांपर्यंत शिक्षा व १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता अजामीनपात्र आहे. या कठोर  कायद्याविरोधात जनतेत तीव्र नाराजी आहे. या काळ्या कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असून चालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा आहे,  असे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता २०२३ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर केले आहे. त्यात त्यांनी हिट अँड रन केसमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. आयपीसीच्या कलम १०४ नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास आधी दोन वर्षाची शिक्षा किंवा दंडाची तरतूद होती. किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद होती. नव्या कायद्यानुसार ७ वर्षाची शिक्षा आणि १० लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हत्येच्या हेतूने गुन्हा केला नसेल, पण आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्यास किंवा त्याने तात्काळ पोलिस अधिकारी किंवा मॅजिस्ट्रेटला माहिती दिली नाही तर त्याला शिक्षा आणि रोख रक्कम भरणे आदी दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिक्षेचा कालावधी दहा वर्षाचा असू शकतो. या गुन्ह्यात आर्थिक दंडाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
   ह्या विरोधात नांदगाव तालुक्यातील पानेवाडी  येथे इंधन पुरवठा करणाऱ्या वाहनावरील वाहनचालक उपोषणास बसले आहेत. त्यांनी ही या कायद्याला विरोध दर्शवला आहे. हा  कायदा म्हणजे दुधारी तलवार  आहे,अपघातानंतर वाहनचालक मदत मागण्यासाठी थांबला तरी त्याच्यावर जमावाकडून हल्ला होण्याचा धोका असतो. अनेकदा अशा वेळी जमाव हिंसक होतो. हल्ल्यातून वाचण्यासाठी तो पळून गेला तर त्याला कायद्यानुसार १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. त्यामुळे रस्त्यावर अपघात होऊन त्याचे संपूर्ण जीवन प्रभावित होऊ शकते.
अपघातानंतर चालक हा घटना स्थळावरून पोलिस स्टेशन अथवा सुरक्षित ठिकाणी पोहचून पुढील कायदेशीर प्रकियेत सहकार्य करत असतो, त्यामुळे नवीन विधेयकातील जाचक तरतुदी वगळून चालक वर्गाला नाहक त्रास होणार नाही अशी सुधारणा व्हावी व चालक वर्गाच्या रास्त मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहोत. आणि वाहनचालकांनी लोकशाही मार्गाने उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत  आहोत‌.

नांदगावच्या तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर... पिवळ्या - केशरी रेशनकार्डवर नागरीक मारताय स्वतःच्या हाताने शिक्के...प्रशासकीय यंत्रानेचा खेळखंडोबा तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी करताय काय...? सर्वसामान्य नागरिकांकडे शिक्के आलेच कसे...?





नांदगाव (प्रतिनिधी ) - तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यलयात भ्रष्टाचार चालतो हे जगजाहीर आहे . मात्र प्रशासकीय अधिकारी यांचे शिक्केच जर नागरीक स्वतःच्या हाताने मारून घेत असतील तर ..? हो हे घडते आहे. आणि तेही नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात नांदगाव तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरू असुन,  पिवळे रेशनकार्ड केशरी रेशनकार्ड यांचे रेट फिक्स असुन राजकीय नेत्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर काम सुरू असतात . मात्र आता तर अजब घटना बघायला मिळाली आहे .नांदगाव तहसील कार्यलयात एक महिला व एक तरुण स्वतःच्या हाताने पिवळ्या रेशनकार्डवर शिक्के मारताना दिसत असुन जर नागरीक स्वतःच्या हाताने शिक्के मारत आहेत. तर यांच्याकडे शिक्के आलेच कसे आणि जर सर्वसामान्य माणसाकडे शासकीय शिक्के आहेत. तर मग पुरवठा अधिकारी व तहसीलदार करतात. तरी काय ...? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
     महसूल विभागात अक्षरशः लुट सुरू असुन अनेक शासकीय काम हे काही नेत्यांच्या घरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असुन याला प्रशासकीय यंत्रणा देखील जबाबदार आहेत. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का व या घटनेची चौकशी करतील का ..? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

Monday, January 1, 2024

मनमाड मध्ये भिमा कोरेगाव क्रांतीस्तंभास अभिवादन,






मनमाड ( विशेष प्रतिनिधी) - भीमा कोरेगाव येथे पेशव्यांच्या विरोधात लढणाऱ्या तत्कालीन महार(बौद्ध) शूर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी देशभरातुन लाखो लोक पूणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात. त्याच धर्तीवर मनमाड येथे देखील भिम सैनिकांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम करण्यात येतो. येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून अभिवादन करण्यात येते.  यावेळी आजपासून ईव्हीएम या मशीनला विरोध करण्यासाठी शपथ घेण्यात आली व त्यासाठी जनजागृती करण्याचा ठराव पारित करण्यात आला.यावेळी मनमाड शहरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र शासनाने वाहनचालकासाठी केलेल्या नवीन कायद्याला टँकर, ट्रक चालकांचा विरोध, चारही कंपनीचे जवळपास दोन हजार पेक्षा जास्त टँकर संपावर,






 मनमाड (विशेष प्रतिनिधी) - केंद्र सरकारने वाहनचालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक,टँकरसह सर्वच वाहन चालका मध्ये संतापाची लाट उसळली असून,  हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत मनमाडच्या पानेवाडी,नागापूर परिसरात असलेल्या इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम,हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडेन गॅस कंपनीतुन इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे सुमारे दोन हजार पेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी काल पासून काम बंद आंदोलन सुरु केले.या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातुन राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेलसह गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प  झाला. संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हा कायदा जाचक आहे हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी संपकऱ्यांनी केली आहे.

केंद्र शासनाने केलेल्या नवीन कायद्यात काय आहे तरतूद,
 - केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता २०२३ कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास १० वर्षे कारावास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालका मध्ये असंतोष निर्माण झाला असून,  हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

Saturday, December 30, 2023

नांदगाव येथील गौरव कदम यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव,








नांदगाव (प्रतिनिधी ) - जिद्द,मेहनत,चिकाटी असेल,तर यश निश्‍चित मिळते.दुष्काळग्रस्त नांदगांव तालुक्यातील नांदगांव शहरातील असलेल्या हमालवाडा भागातील दूरसंचार विभागात काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने त्याचे कौतुक होत आहे.
   राज्यातील पोलीस उपनिरीक्षक भरतीची पूर्व परीक्षा २०२१ ला तर मुख्य परीक्षा २०२२ ला झाली होती.निकाल गुरुवारी ता.२८ रोजी जाहीर झाला.त्यात नांदगाव शहरातील हमालवाडा येथील गौरव सुरेश कदम यांनी यश संपादन केले.गौरवने २०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवले आहे.कुटुंबात पहिलाच पोलीस अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.गौरव चे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्य प्राथमिक शाळेत झाले.तर माध्यमिक शिक्षण येथील व्ही.जे स्कूलमध्ये त्यांनी पूर्ण केले.महाविद्यालयीन शिक्षण नांदगावच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पूर्ण केले नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले.पदवीसाठी नाशिक येथे प्रवेश घेतला.महाविद्यालयीन शिक्षण घेत.सायन्स विषयाची पदवी त्यांनी घेतली.त्यानंतर बाहेर काम करत त्यांनी कोणताही क्‍लास न लावता दिवसाकाठी पाच ते सह तास रविवारी संपूर्ण दिवस मुद्देसूद अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यशाला गवसणी घातली.वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन गौरवने सातत्याने अभ्यास करून आज पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.त्याचे यश पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.नांदगांव येथील दूरसंचार विभागात अल्पमजुरीवर काम करणाऱ्या सुरेश गणपत कदम यांचे ते पुत्र आहेत.आई गृहणी तर मोठा भाऊ विकी कदम फोटोग्राफर आहे. दुसरा भाऊ योगेश कदम आय.टी कंपनीत इंजिनिअर आहे. गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षक झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.गौरवचे हमालवाडा येथील रहिवासी व मल्हारवाडी येथे श्रीराम जनसेवा मोफत वाचनालयात अध्यक्ष रवि सोनवणे यांनी नागरी सत्कार केला यावेळी गौरव यांनी तरुणांना मार्गदर्शन केले यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.











मनमाड रेल्वे स्थानकावर जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा जोरदार स्वागत,






मनमाड (विशेष प्रतिनिधी) - भारतीय रेल्वेच्या वतीने काल  अजून सहा वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले . यातील जालना ते मुंबई या गाडीचे जालना येथून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. तर मनमाड येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार भुसावळ डिव्हिजनचे डी आर एम इथी पांडे व आमदार नरेंद्र दराडे यांनी स्वागत करून गाडीला पूढे रवाना केले .यावेळी रेल्वेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.यावेळी ढोल ताशांच्या गजरात या वंदे भारत रेल्वेचे स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे ध्वज घेऊन या कार्यक्रमात जल्लोष साजरा केला .कार्यक्रम शासकीय होता की भाजपचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला होता.

Tuesday, December 26, 2023

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले पांझण डाव्या कालव्याचे जलपूजन,





नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी)  - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणा वरील पांझण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि आता पाटाला पाणी सोडण्यात आले. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
      आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले. याप्रसंगी परिसरातील या पाण्यामुळे लागणाऱ्या सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवाडी सह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरिक सत्कार यावेळी करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून आपल्यामुळेच  मी आमदार आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते असे मत व्यक्त केले. पन्नास वर्षानंतर दुष्काळी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांकडे केलेला पाठपुराव्या मुळे आज आपल्या पाटाला पाणी आल्याचा आनंद मलाही होत असल्याचे सांगितले‌ ‌. लवकरच या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व गावाकरिता पाणी आरक्षित करणार असल्याचे सांगितले. तसेच उर्वरित गिगाव दहिवाळ रोझे पाडळदे शेरूळ हिसवाळ या गावांना लिफ्ट द्वारे पाणी मिळवून देणार असल्याचे मत व्यक्त केले. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कार्य केली . यापुढे जलसिंचनावर प्रामुख्याने काम करायचे तसेच मतदारसंघातील अतिशय टोकावर असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीतला पाणी मिळेल असे काम करायचे आहे असे मत व्यक्त केले. 
          मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावे आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते. मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आजरोजी धरणात पाणीसाठा कमी आहे. या मुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. यानुसार २९ नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे यंदा देखील आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. 
     आज सकाळी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले, या मुळे पाणीटंचाईसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
         कळवाडीसह चिंचगव्हाण, नरडाणे, उंबरदे, दापुरे, साकुर, देवघट या गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका झाली असून जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
     या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील सर्व गावातील शेतकरी बांधवांनी डीजे लावत आमदार सुहास अण्णा कांदे यांचे गावात स्वागत केले. 
या कार्यक्रमासाठी कळवाडी गटातील सर्वच गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, ज्ञानेश्वर भाऊ कांदे, गटप्रमुख दिनकर आबा महाले, यशवंत देसले, प्रदीप सर देसले, रोहित जाधव, बाळू शेठ बोरा, सोनू पाटील, महेंद्र सिसोदे, उदयसिंग मांडवडे, विजय इप्पर, चंद्रशेखर शेलार, केदा भवर, नाना पगार, प्रवीण जिंजर, अजित सूर्यवंशी, प्रवीण सावकार, बाबाजी सूर्यवंशी, यशवंत भीमराव देसले, जगदीश देसले, अनिल देसले, गंभीर देसले, हेमंत देसले, प्रदीप देसले, राकेश आहिरे, साहेबराव नरवडे, अभिमान डांबरे, पीडी चव्हाण, राजू आहिरे, राहुल सरावत, महेंद्र परदेशी, किशोर बोराळे, विलास परदेशी, महेश शेरेकर, सुरेश अहिरे, मिनराम शांताराम मगर, दिलीप मगर, आण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...