नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील कमलाबाई कासलीवाल विद्यालयाचे शिक्षक किशोर शंकरराव बागले (५०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी बजावली आहे.काही महिन्यांपूर्वी त्यांची मणक्याची शस्रक्रिया झाली होती तेंव्हा पासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर मंगळवारी रात्री नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. नांदगाव येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, सुनील कासलीवाल, जे.टी.कासलीवाल स्कूलचे प्राचार्य मनी चावला, कासलीवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार,शिक्षक, यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Tuesday, August 29, 2023
Monday, August 28, 2023
आमदार सुहास आण्णा कांदे यांचा जलजीवन मिशन कामांचे लोकार्पण व पाहणी दौरा, नागरिकांना मतदार संघात २४ तास शुद्ध पाणी पुरवठा मिळणार,
नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील कासारी व बोलठाण घाटमाथा परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा पाहणी दौरा आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केला.
कासारी येथील इंदिरानगर, जातेगाव येथील वसंतनगर व चंदनपुरी तांडा येथील कामांचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. या योजने अंतर्गत नागरिकांना २४ तास शुद्ध पाणी मिळणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचा स्त्रोत म्हणून विहीर, पाण्याची टाकी, पाईप लाईन व गावं अंतर्गत वितरण व्यवस्था या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी यावेळी उपस्थित महिलांचे अभिनंदन केल. ग्रामीण भागात असलेली वन वन पाहता आता जलजीवन मिशन अंतर्गत २४ तास पाणी उपलब्ध झाले असून माझ्या माता माय माऊलींचे पाण्याची आज पासून थांबलेली आहे असे त्यांनी सांगितले.
मतदार संघातील प्रत्येक घराघरात पाणी पोहोचवण्याचे माझे स्वप्न असून या मार्गाने मी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याची आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनोगतात सांगितले.
या वेळी घाटमाथ्यावरील ढेकू,जातेगाव,बोलठाण, रोहिला,येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांची पाहणी करून काम चांगल्या प्रतीचे व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामाबाबत असलेल्या अडचणी समजून घेत त्याही तात्काळ सोडवण्याचे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी दिले.
यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुन पाटील, नागापूर सरपंच राजेंद्र पवार, जिल्हाप्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, बोलठाण सरपंच वाल्मिक गायकवाड, अनिल रिंढे, रफिक पठाण, दत्तात्रय निकम ,गुलाब चव्हाण, संजय बोरसे, संजय पवार, मनोज रिंढे, गोकुळ कोठारी, बापूसाहेब जाधव, शुभम आव्हाड, आण्णा मुंढे, सौ.अनिता संतोष सरपंच कासारी इप्पर, काशिनाथ काळे, सोनाली राठोड, नितीन शेरेकर, अंबादास पवार, तुळशीराम शिंगाडे, नाना राठोड, प्रकाश चव्हाण, ईश्वर राठोड, भाऊसाहेब चव्हाण,अनिल अरबुज, सरपंच ठकुबाई पवार, अवधूत गायकवाड, सचिन गायखे, भगवान गायखे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, अशोक बिन्नर उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग नांदगांव यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद चव्हाण तर, व्हा. चेअरमनपदी प्रियंका पाटील यांची निवड, आमदार सुहास कांदे यांच्या कडून शाल - पुष्पगुच्छ देऊन सत्कार,
नांदगाव( प्रतिनिधी ) - आज नांदगांव तालुका व क.महा.सेवक सह.पतसंस्थेचे चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवडणूक, निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत विघ्ने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . माध्यमिक आश्रमशाळा टाकळी बु. येथील शिक्षक प्रमोद चव्हाण यांची चेअरमनपदी तर व्ही. जे.हायस्कूल नांदगांव येथिल शिक्षिका श्रीमती प्रियंका पाटील यांची व्हा. चेअरमनपदी तर सर्जे. दादा माध्य. विद्यालय जामदरी येथील शिक्षक आनंद चकोर यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी संस्थेचे संचालक महेंद्र जाधव, श्रीमती पल्लवी पाटील,अशोक मार्कंड, संतोष इप्पर, योगेश पगार, जिभाऊ खताळ, संजय पवार व कैलास पाटोळे उपस्थित होते.
तसेच संस्थेचे मा.कार्यवाह व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नांदगांव तालुकाअध्यक्ष बाळासाहेब भोसले, मा.चेअरमन राजेंद्र देवरे, राजेश हिरे, पंजाबराव आहेर यांनी उपस्थित राहून व मा. सभापती विलास आहेर यांनी फोनकरुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. नांदगाव विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी भेच्छा दिल्या.
Saturday, August 26, 2023
शालेय पोषण आहार समितीच्या महिलांचे विविध मागण्यांसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन, कर्मचाऱ्याचा प्रश्न आगामी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्याचे दिले आश्वासन,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शालेय पोषण आहार समितीच्या महिलांना अगदी तुटपुंज्या स्वरूपात मानधन मिळते यात वाढ करावी . महिलांना सुरक्षिता द्यावी विमा संरक्षण द्यावे यासह शिपाई पदावर नियुक्ती द्यावी या मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष संगीता सोनवणे ,अलका आयनोर ,आशा काकळीज, यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी राज्याचे हेविवेट नेते अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले . शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. यासाठी मी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करेल असे सकारात्मक उत्तर दिले. यावेळीं महिलांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी संगीता सोनवणे, आशा काकळीज ,अलका आयनोर रत्ना सोनवणे, संगीता मोकळ यावेळी उपस्थित होते.
Friday, August 25, 2023
पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवानी नांदगावला ईदगाह मैदानावर केली विशेष सामूहिक नमाज अदा, अल्लाह मेघ दे पाणी भेज दे असें म्हणत केली दुवा,
नांदगाव (प्रतिनिधी) - पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटल्या नंतर ही नांदगांव मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात समाधान कारक पाऊस झालेला नाही. पावसा अभावी पिके करपू लागली असून शहरा पासून गाव खेड्या पर्यंत पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे.पाऊस पडावा यासाठी नांदगावला ईदगाह मैदानावर विशेष सामूहिक नमाजचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. नांदगाव शहरातील मौलानाच्या नेतृत्वाखाली विशेष नमाज अदा करून पावसासाठी दुवा करण्यात आली. मनमाड शहरातील सर्व मस्जिदी मध्ये सलग तीन दिवस विशेष नमाज आणि दुवा करण्यात आली . ईदगाह मैदानावर रमजान ईद आणि बकरी ईद ह्या दोनच नमाज अदा केल्या जातात मात्र नैसर्गिक आपत्ती आल्यास ती दूर व्हावी यासाठी विशेष नमाज अदा केली जाते.
Tuesday, August 22, 2023
राष्ट्रीयकृत बँक मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी शेतकरी व सामान्य ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी : आ.सुहास आण्णा कांदे
नांदगाव (प्रतिनिधी) - शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथील मा.बाळासाहेब ठाकरे सभागृहात आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांची विविध विषयांवर बैठक घेतली.
गेल्या अनेक दिवसांपासून नांदगाव मधील बँक कर्मचारी ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करत नाही, सहकार्य करत नाही किंवा उद्घटपणे वागतात अशा तक्रारी आमदार संपर्क कार्यालयात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
या वेळी उपस्थित सर्व बँक मॅनेजर यांना सद्यपरिस्थिती पाहता ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना कर्ज प्रकरण असो वा इतर काहीही काम असो आपण सहकार्याची भूमिका घेऊन काम करावे अशी सूचना केली. आपण कर्मचारी आहात आणि गाव आमचे आहे तेंव्हा आपण सामंजस्य घेऊन प्रत्येक ग्राहकाला समजून घ्या त्याला मदत करा असे आवाहन केले. ग्राहकांना त्रास होईल असे कोणी कर्मचारी वागत असेल तर त्याला तशी ताकीद द्या असे या वेळी सांगितले.
या बैठकीत स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, महारष्ट्र ग्रामीण बँक, एच डी एफ सी बँक, युनियन बँक आदी बँकेचे मॅनेजर यावेळी उपस्थित होते.
नांदगाव येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन आढावा बैठक संपन्न ,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत २७ गावांमध्ये विविध कामे सुरू असून या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी बिडीओ गणेश चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, सर्व गावांचे ग्रामसेवक तसेच ठेकेदार उपस्थित होते. काम कुठपर्यंत आले, स्थानिक समस्या, इतर अडचणी व कामाचा वेग यावर चर्चा झाली.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. ग्रामीण भागातील जनतेस तात्काळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून कोणतीही काटकसर न करता काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.
नांदगाव तालुक्यातील वसंतनगर, चंदनपुरी, कसाबखेडा, चींचविहिर, रोहिले बु, साकोरा, तळवाडे, न्यायडोंगरी, अनकवाडे रामनगर तांडा, रागुविर तांडा, कासारी इंदिरानगर, पानेवाडी, बेजगाव, वंजारवाडी, कुसुमतेल, माळेगाव कऱ्ह्यात, भार्डी, सावरगाव, कोंढार, नागापुर, जातेगाव, मोहेगाव, ढेकू, बोलठाण, मळगाव या गावात काम सुरू आहे. यामध्ये गावात विहिर, गाव अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था, पंपगृह, पंपिंग मशिनरी, टाकी आदींचा समावेश असणार आहे. गुरुवार पासून या सर्व गावात भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार असल्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले या वेळी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी उपस्थित राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...