Saturday, September 30, 2023

नांदगावच्या रेंनबो इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांची अत्याधुनिक शेतीला प्रत्यक्ष भेट,




नांदगाव (प्रतिनिधी ) -  नांदगाव येथील ‘नमन एज्युकेशन सोसायटी’ संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल यांची शेतात प्रत्यक्ष भेट दिली होती. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल , रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली.
    या शैक्षणिक वर्षात ३० सप्टेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी नांदगाव येथिल प्रगती शील शेतकरी दिगंबर रंगनाथ पाटील (काकळीज) यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शेतीची  तेथील कार्यपद्धती याची माहिती असणे आवश्यक आहे. फक्त पुस्तक किंवा चित्रांवरून माहिती सांगणे, हे मुलांच्या जास्त लक्षात आले नसते. त्यामुळे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मुले जेव्हा बघतात, तेव्हा ते त्यांच्या जास्त स्मरणात राहतात. म्हणूनच मुलांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी ही प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यात आली. सर्वप्रथम शेत, शेतातील पिके, ट्रॅक्टर, तेथील जनावरे, शेती करण्यासाठी लागणारी अवजारे यांची माहिती देण्यात आली. निसर्गरम्य वातावरणात ही भेट अत्यंत आनंददायी ठरली.
मुले फुलपाखरांसारखे इकडे तिकडे बागडत आनंद व्यक्त करत होती.प्रदीप काकळीज आणि सुभद्राबाई काकळीज यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सर्व शेती दाखवून त्याबद्दल मुलांना सर्व माहिती सांगितली. तसेच त्यांच्याकडून सर्व मुलांना खाऊ चे वाटप करून मुलांचे कौतुक करण्यात आले.
ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन  ही भेट उत्तम रित्या घडवून आणली.

नांदगाव शहर भारतीय जनता पार्टीतर्फे ' मेरी माटी मेरा देश ' अभियान


नांदगाव (प्रतिनिधी)-  नांदगाव शहर भारतीय जनता पार्टी तर्फे ' मेरी माटी मेरा देश ' हे अभियान भाजपा जिल्हा नेत्या अॅड.जयश्रीताई दोंड यांच्या अध्यक्षतेखाली व शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहिद विर विरंगना सन्मान अभियान अंतर्गत ' मेरी माटी मेरा देश ' हे अभियान संपूर्ण देशात अमृत कलश यात्रा सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने आज येथील सदर अभियान महात्मा गांधी  चौकात सुरू करण्यात आले. 
यावेळी भारत माता कि जय... मेरी माटी मेरा देश... पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... भारतीताई पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... आदि घोषणा देत परिसर दणाणुन गेला होता. या अभियानाची सूरूवात येथील महात्मा गांधी चौक येथून सुरू होऊन शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, म.फुले चौक, शिवस्फूर्ती मैदान या शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात येवून  रॅलीची सांगता म.गांधी चौकात करण्यात आली. रॅली दरम्यान शहरातील चौका- चौकात नागरिकांनी रॅलीत ठेवलेल्या कलशामध्ये मुठभर माती टाकण्यात आली. याप्रसंगी जिल्हा सरचटणीस संजय सानप, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, शहराध्यक्ष राजाभाऊ बनकर, अनु.जाती जिल्हाध्यक्ष बाबाजी शिरसाठ, व्यापारी आघाडी संजय पटेल, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सजन कवडे, डाॅ.राजेंद्र आहेर, मनोज शर्मा, दिंनेश दिंडे, सतिष शिंदे, अॅड.उमेश सरोदे, धम्मवेदी बनकर, गणेश शर्मा, किरण पैठणकर, पप्पू भटेवरा, वंश पटाईत, सतिष अहिरे, प्रविण पवार, परसराम हरळे आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगाव येथे सकल धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा, अनुसूचित जमाती संवर्गात आरक्षण मिळावे यासाठी निवेदन,


नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे नगर आरक्षणासंदर्भात  सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी) संवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे  नांदगाव तहसीलवर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील शनिमंदिर गार्डन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाजवळून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 
 येळकोट येळकोट जय मल्हार,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नांदगांव तालुक्यातील शेकडो धनगर बांधव व भगिनी हातात झेंडे व फलक घेऊन सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर मोर्चा गेल्या नंतर छोटेखाणी सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी अंँड.गंगाधर बिडगर,साईनाथ गिडगे,डॉ.गणेश चव्हाण, बाळू बोरकर,अण्णा सरोदे,, खुशाल सोर,सीताराम पिंगळे,मच्छिंद्र बिडगर, आदींची मनोगत व्यक्त करण्यात आले. यामध्ये धनगर (एस.टी) आरक्षणाची केस सरकारने फास्ट ट्रॅकवर चालवावी. सरकारी वकिलांनी न्यायालयास मागणी करावी, एसटी प्रवर्गात समावेश होईपर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी दहा हजार कोटींची तरतूद करावी, मेंढ्या व मेंढपाळांना मोफत विमा द्यावा. मेंढपाळांना मेंढपाळ सरक्षण कीट शंभर टक्के अनुदानावर द्यावे. सोलर चूल, सोलर बटरी, बैलगाडी, ताडपत्री व स्वसंरक्षणासाठी बंदूक द्यावी, मेंढ्यासाठी स्वतंत्र चारा छावण्या सुरू कराव्यात, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, याचे प्रशिक्षण देण्यासाठी इस्राईलसारख्या देशात प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले जाते. त्याप्रमाणे मेंढपाळांना प्रशिक्षण देण्यासाठी परदेशात पाठवावे. आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
यावेळी शहरातील शिवसेना शिंदे गटाचे सुनील जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महेंद्र बोरसे,शिवसेना ठाकरे गटाचे संतोष गुप्ता,काँगेस आयचे मनोज चोपडे,वंचित बहुजन आघाडीचे एॅड.आम्रपाली निकम आदींनी पाठींबा दिला. याप्रसंगी तहसील कार्यालयाचे योगेश पाटील यांना नांदगाव तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.नांदगाव तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

नांदगाव मध्ये ईद - ए- मिलाद निमित्ताने शोभायात्रा, जुलुसमध्ये धार्मिक एकोप्याचे संदेश,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील एच. आर. हायस्कूलमध्ये ईद-ए-मिलाद शहरातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र साजरा केला. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली.
इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती, ईद- ए-मिलाद निमित्त नांदगाव शहरात  शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभागी होत एकतेचा संदेश देत शिस्तबद्ध पद्धतीने ईद साजरी केली.
   हजरत  मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली . शहरातील प्रमुख मार्गाने जात हुतात्मा चौकात वीरगती प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, गांधी चौक, अहिल्यादेवी चौक मार्गाने जात एच. आर. हायस्कूल येथे मिरवणूक सांगता करण्यात आली.
    यावेळी सर्वत्र सुख-शांती टिकून राहावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. एच. आर. हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. येथे  पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी नगराध्यक्ष राजेश कवडे तर पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, संजीव धामणे , वाल्मिकी जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रावण आढव,  मनोद चोपडे , संतोष गुप्ता व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावेळी नासिर पठाण, जावेद शेख , याकुब शेख, बबलू सैय्यद, आबिद सय्यद,  शरिफ शेख, अकिल मास्टर, कलिम भाई , मज्जू शेख, मोसिन खाटिक , तर अँड.युनूस शेख यांसह आदींनी परिश्रम घेतले.

Thursday, September 28, 2023

नांदगावच्या मोरया प्रतिष्ठानतर्फे शालेय मॅरेथॉन स्पर्धा,




नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात मोरया प्रतिष्ठान  (मेन रोड चा राजा ) यांच्या तर्फे  गुरूवारी   मंडळाच्या वतीने २ कि.मी.मीटर शाळेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजित करण्यात आले या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात १० ते १६ वर्षीय मुलं व मुलींनी सहभाग नोंदवला ‌ . यामध्ये रोख रक्कमेचे अनेक पारितोषिक प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले .या स्पर्धेसाठी व बक्षीस वितरणासाठी  नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी ,वामनदादा पोतदार , डॉक्टर आनंद पारख, दत्तराज जी छाजेड , प्रकाश शिंदे , गणेश सांगळे ,मुस्ताक शेख, बापू जाधव ,प्रतीक मराळकर ,मुज्जू शेख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात मोलाचे सहकार्य  त्रिभुवन सर यांचे होते. पालकांनी या कार्यक्रमाचे तोंड करून कौतुक केले .

नांदगाव येथील दहेगाव नाका मित्रमंडळातर्फे भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन,


 
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगावचा महाराजा दहेगाव नाका मित्र मंडळ यांचे यंदाचे ४५ वे वर्ष असून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रम राबविले यात पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्या नंतर दुसऱ्या व सातव्या दिवशी संध्याकाळी एकविरा भजनी मंडळाचा भजन संध्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी येथील भाविक भक्ताने मोठ्या संख्येने भक्ती संध्याचा आनंद घेतला.
त्या नंतर आठव्या दिवशी मंडळाच्या वतीने येथील नागरिकांना विविध झाडांची रोपे वाटप करून पर्यावरणाला वाचवुया हेच अभियान चालवुया असा संदेश देण्यात आला.९ व्या दिवशी दरवर्षी प्रमाणे सत्यनारायणाची महापूजा करून,महाआरती रवी गेजगे यांच्या हस्ते करून दोन ते अडीज हजार भाविकांसाठी भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली,बंटी सोनवणे,निलेश गेजगे, सागर जाधव, बापू जाधव.प्रसाद सोनवणे महेश चौघुले,किशन गुडेकर,रवी गेजगे,प्रतिक भालेकर,गणेश जाधव,गोटु गेजगे, दर्शन शेलार, सौरभ शर्मा,आदित्य भालेकर,दत्तु काळे आदींनी परिश्रम घेतले.

पिंपरखेड येथे आमदार आपल्या दारी महाशिबिर ,





नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी) -  नांदगाव तालुक्यातील रणखेडा, चांदोरा, पिंपरखेड, पिंपरखेड तांडा, आटकाट तांडा, जळगाव खुर्द, डॉक्टर वाडी, बाबुळवाडी, चिंचविहीर ,जळगाव खुर्द व पोखरी आदि गाव मिळून  पिंपरखेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरखेड ग्रामपंचायत समोरील प्राणांगणात  आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी परिसरातील गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सुविधांचा लाभ घेतला. 
     आमदार आपल्या दारी या अभियान अंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
     मोफत डोळे तपासणी, आरोग्य तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत रेशन कार्ड व इतर शासकीय दाखले काढून दिली जातात. मतदारसंघातील प्रत्येक गावात आमदार आपल्या दारी अभियान राबवले जात असून आता पर्यंत हजारो नागरिकांनी लाभ घेतला आहे, 
      या प्रसंगी मा.सभापती विलास भाऊ आहेर, किरण भाऊ देवरे, किरण भाऊ कांदे, अमोल नावंदर,सरपंच पिंपरखेड सौ.मंजुषा गरुड, रमेश मामा काकळीज, जीवन गरुड, देशमुख सर, संदीप मवाळ, नवनाथ सोमवंशी, दीपक मोरे, बाबासाहेब गरुड, राजेंद्र गरुड, एकनाथ पाटील, जालम आहेर, संजय आहेर, शिवाजी बछाव, शिवाजी सुरासे, जिभाऊ पवार, रवींद्र गायकवाड, मनोज बछाव, शांताराम शिंदे, गणेश घोटेकर, शरद शिंदे, शिवाजी जाधव, उमेश मोरे, रामेश्वर तुरकुने, किशोर नवले, रमेश दळवी, उत्तम चव्हाण, मगण चव्हाण, माधवराव गरुड, पतींगराव देशमुख, दिनेश गरुड, भाईलाल दळवी, जनार्दन पवार अमोल पाटील, मनोज देशमुख, भरतआबा शेलार, बाबा ढोमासे, गिरधारी भालेकर प्रमोद देशमुख, बाळासाहेब गुंजाळ, सागर हिरे, भाऊराव बागुल, आण्णा मुंढे दीपक शेलार, आदींसह विविध गावातील सरपंच, चेअरमन, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने ने उपस्थित होते.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...