Saturday, June 28, 2025

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे याचीे राज्यस्तरीय " युवा धोरण " समितीत निवड,






नांदगाव (प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण ठरविण्यासाठी गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीवरील सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. समितीत विशेष निमंत्रित म्हणून १३ सदस्यांची निवड करण्यात आली असून , यामध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यासंबंधीचे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण ठरविण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मे २०२५ मध्ये समिती स्थापना केली होती. या समितीत १३ विशेष निमंत्रित सदस्यांची निवड करण्यात आली आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या सह प्रवीण दटके, देवेंद्र कोठे, डॉ. बाबासाहेब देशमुख, वरुण सरदेसाई, रोहित पाटील या तरुण आमदारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

नांदगावचे ओम ठाकूर सायकलने अवघ्या ५१ तासांत पूर्ण केली पंढरपूरवारी,






नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील ओम ठाकूर युवकाने अवघ्या ५१ तासात पंढरपूर येथे सायकल वारीवर जाऊन परमेश्वर पांडुरंगाचे दर्शन घेतले. आजच्या तरुणांना दिशा व वेगळा विचार देण्याचे काम केले. ही मोहीम फत्ते करणाऱ्या ओम ठाकूर , मानव निकम, नितीन अहिरे, पीयूष पारखे, गणेश मोरे , संकेत महाजन या युवक मित्राचा सत्कार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला . ओम ठाकूर या नांदगांव शहरातील युवकाने अयोध्या सह अनेक ठिकाणी सायकल वर प्रवास अत्यल्प वेळेत केल्याने सर्व स्तरातून ओमचे कौतुक होत आहे.

Friday, June 27, 2025

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते लोकार्पण,







नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील नागरिकांनी केलेल्या विनंती वर रेल्वे पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला. या पुलाचे लोकार्पण  सौ .अंजुमताई कांदे यांनी केले. चांडक प्लॉट एसटी कॉलनी , गांधीनगर , भोले नगर मार्केट या परिसरातील नागरिकांकरिता हा प्रमुख रस्ता असून नदीला पूर आल्यानंतर या भागातील नागरिकांचा शहराशी अगदी संबंध तुटून जातो आणि मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मागील वर्षी नदीला आलेल्या पुरानंतर सदर परिस्थिती उद्भवली असता चांडक प्लॉट येथील रहिवाशांनी अंजुमताई कांदे यांना पूल बांधून देण्याची विनंती केली होती. सौ अंजुमताई यांनी यावेळी स्वतः चांडक प्लॉट येथे जाऊन रस्ता पाहणी केली होती व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यानंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर सदर पुल मंजूर झाला आणि तो पूर्ण झाला असून लोकांच्या वापरासाठी त्याचे लोकार्पण करण्यात आले. 
     याप्रसंगी पुला वरती रांगोळी काढण्यात आली होती फुग्यांनी पूल सजवण्यात आला होता, 
    याप्रसंगी बोलताना नाना जाधव यांनी आमच्यासाठी हा पुल म्हणजे संजीवनी ठरणार आहे. यामुळे आमच्या अनेक समस्या दूर होणार आहेत. म्हणून आमदार सुहास आण्णा कांदे यांचे संपूर्ण परिसराच्या नागरिकांच्या वतीने आभार मानले.
     महावीर पारख यांनी आपल्या मनोगतात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत नांदगाव शहरात मोठा विकास घडवून आणल्याचे सांगितले. 
      अंजुमताई कांदे यांनी आपण आमच्यावर विश्वास ठेवला आहे . आपल्यासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच हा पूल झाल्याचा आपल्याला जेवढा आनंद होतोय तेवढा आम्हाला सुद्धा होत आहे असे मत व्यक्त केले. 
   याप्रसंगी या पुलाचे कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र परदेशी यांचा अंजुमताई कांदे यांनी सत्कार केला. 
       याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील , चेतन पाटील , काका सोळसे, डॉ.सुनील तुसे, राजाभाऊ जगताप, भारतीय जनता पार्टीचे दतराज छाजेड, सागर हिरे,  प्रकाश शिंदे,  नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव, समाधान पाटील,  बाळासाहेब शेवरे , साईनाथ पवार,  मनोज चोपडे,  चेतन शिंदे , शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप , मनमाड शहरप्रमुख संगीताताई बागुल , विशाल खैरनार , नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे,  आदींसह परिसरातील रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, June 25, 2025

मनमाड येथील उबाठा गटाचे जिल्हा संघटक, अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश,







मनमाड ( प्रतिनिधी ) - मनमाड येथील उबाठाचे जिल्हा संघटक संजय कटारिया  यांच्यासह शेकडो उबाठा पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला. या पक्षप्रवेश प्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते अल्ताफ बाबा खान, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे , माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, राजाभाऊ भाबड, महेंद्र शिरसाठ, कैलास गवळी, उपस्थित होते. 
    यावेळी आमदार सुहास कांदे यांनी बोलताना प्रत्येकाची शिवसेना पक्षात स्वागत केले, यापुढे प्रत्येक सुखदुःखात मी आपल्या सोबत राहील असे विश्वासितही केले.
    संजय कटारिया यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आमदार सुहास अण्णा कांदा यांनी पुन्हा एकदा आम्हाला शिवसेना परिवारात सामील करून घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले . तसेच विरोधात असतानाही अण्णा सतत आमच्या सुखदुःखात सामील व्हायचे दखल घ्यायचे याचा आम्हाला सतत अभिमान आहे आणि तो राहील असे मत व्यक्त केले.
 
पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे - 
संजय कटारिया (जिल्हा संघटक, उबाठा)
 आप्पा हारदे शाखाप्रमुख, अंकुश उगले शाखाप्रमुख, लक्ष्मण बारसे शहर संघटक , राकेश चव्हाण, छगन जोहरे,  सनी गुप्ता राष्ट्रवादी शरद पवार गट कार्याध्यक्ष मनमाड,  संजय वाढणे दीपक गडाख शाखाप्रमुख, वाल्मीक बारसे, राज शिंदे ,,गजेंद्र सानप शरद पवार गट कार्याध्यक्ष मनमाड  सलीम भाई सोनावाला ज्येष्ठ शिवसैनिक , वेदांत राऊत,  विलास घुले , पार्थ गुजराती,  विलास भावसार  तालुका सल्लागार उभाठा , सिद्धांत राऊत,  सुखदेव सोळशे,  आकाश पवार , संजय पिंगळे,  शफी शहा,  कैलास सुपेकर सोनू मिर्झा,  सागर निकम,  मंगेश सूर्यवंशी , संतोष आहेर,  प्रकाश गांगुर्डे , प्रमोद भालेराव , राजाभाऊ सोनवणे , वसीम शहा , ज्ञानेश्वर गवळी आदींचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.

मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच अश्विनीताई खैरनार यांचा आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सत्कार,









  नांदगाव ( प्रतिनिधी) - मल्हारवाडी ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित सरपंच सौ.अश्विनीताई खैरनार यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार सुहास कांदे यांनी मल्हारवाडी गावच्या विकासाकरिता माझे काहीही मदत लागल्यास मला सांगा तुमचा भाऊ सतत तुमच्या पाठीशी उभा आहे असा विश्वास दिला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सरलाताई काकळीज , सौ.मीनाताई गोविंद , ग्रामस्थ वैशाली खैरनार, सौ.अनिता खैरनार, सौ.अरुणाताई गोरे, सौ.रोहिणीताई आहेर, सौ.मनीषाताई भवर, सौ.रूपालीताई जगताप, गौरी रोहम, मुकुंद खैरनार, संदीप खैरनार, अशोक पेंढारकर, वाल्मीक काकळी, भूषण धूत, निलेश घोंगाने, अजय सुरसे, आदी उपस्थित होते.

सावतानगर येथील शाळेच्या गरजु विद्यार्थ्यांना जायंटस ग्रुपकडून शालेय साहित्य वाटप,






नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगांव शहरातील जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव आणि जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव सहेली या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावतानगर येथील शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिष्ठांत वाटप करण्यात आले.
 कार्यक्रमाच्या सुरवातीस मुला - मुलीनी स्वागत गीत सादर केले.  त्यानंतर सरस्वती देवतेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. जायंटस ग्रुप या सामाजिक संस्थेच्या बाबतीत सविस्तर माहिती  देण्यात आली.  ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ दुसाने व अध्यक्षा सौ. वैशाली दुसाने यांचे शुभ हस्ते पाटी, पेन्सिल इ.साहित्य वाटप करण्यात आले . त्याच बरोबर चॉकलेट व मिठाईचे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आले मनोगत व्यक्त केले. मा.मुख्यधापिकांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले. या कार्यकमास ग्रुपचे अध्यक्ष व अध्यक्षा वैशाली दुसाने, सुमित गुप्ता ,बळवंत शिन्दे ,रामनिवास करवा, भारती बोरसे ,पुष्पा दुसाने, शुकुंतला शिन्दे मुख्याध्यापिका सौ. ज्योतीताई पाटील , दीपिका मोकळ, शाईन शेख, वेदना मोकळ, कल्पना मोकळ व इतर सदस्यांची उपस्थिती होती.

Tuesday, June 24, 2025

मोरझर विकास सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रुक्मिणी चोळके यांची बिनविरोध निवड,







नांदगाव (प्रतिनिधी )  -  नांदगाव तालुक्यातील मोरझर विकास सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रुक्मिणी चोळके यांची बिनविरोध झाली. मोरझर विकास सेवा सहकारी संस्थेच्या आवर्तनानुसार रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर निवड करण्यासाठी संस्थेच्या सर्व संचालकांची बैठक तालुक्याचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे उपस्थितीत पार पडली . या बैठकीत ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी अध्यक्षपदासाठी सौ. रुक्मिणी संजय चोळके यांना संधी देण्याचे आव्हान केले. यावर सर्व संचालकानी सहमती दिल्याने संस्थेच्या अध्यक्षपदी रुक्मिणी चोळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
    या निवडी प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष सौ.रुक्मिणी चोळके यांचा सत्कार जेष्ट नेते बापुसाहेब कवडे, सरपंच लीना पाटील,शिवसेना नांदगाव शहरप्रमुख सुनील जाधव,नांदगाव कृ.उ.बा.समितीचे संचालक एकनाथ सदगीर,समाधान पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर देशमुख,कु.उ.बा समितीचे माजी पुंजाराम जाधव,प्रकाश शिंदे सत्कार केला.
    यानिवडी प्रसंगी मोझर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. लिना पाटील, उपाध्यक्ष सुभाष चोळके,संचालक कैलास चोळके,सूर्यभान चोळके,भीमा निकम,वाल्मीक गायके,वसंत चोळके,रमेश पारेकर,श्रावण चोळके आदी संचालक उपस्थित होते.
        यावेळी तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे,कृउबा माजी,सभापती तेजदादा कवडे,नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सौ . रुक्मिणी चोळके यांचे अभिनंदन केले आहे. कृ.उ.बा.समितीचे संचालक समाधान पाटील यांनी यावेळी आभार मानले.
या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश उगलमुगले व संस्थेचे सचिव शिवाजी लव्हाटे यांनी कामकाज बघितले होते.




नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...