नांदगाव (प्रतिनीधी) - शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसाचे नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागणाऱ्या नांदगाव येथील शहरतलाठी युवराज मासाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मुद्देमालासह पकडले. तक्रारदाराने नांदगाव येथील तलाठी युवराज मासाळे यांच्याकडे शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, तलाठी मासाळे यांनी यासाठी त्यांच्याकडे पाच हजारांची मागणी केली व दोन हजार रुपये आगाऊ देण्याचे ठरले. तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार दुपारच्या सुमारास जुन्या तहसील कार्यालयातील तलाठी कार्यालयात नाशिक येथील पथकाने सापळा रचून तलाठी मासाळे यांना दोन हजारांची लाच घेताना .रंगेहात पकडले या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र पवार, हवालदार प्रकाश डोंगरे, पोलिस नाईक प्रणय इंगळे सहभागी झाले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment