नांदगाव ( प्रतिनिधी) - नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल च्या मुली - मुलीनी नांदगाव रेल्वे स्थानकास ला प्रत्यक्ष भेट दिली. आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सरिता बागुल मॕम ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी मॕम यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली.
शाळेच्या नविन शैक्षणिक वर्षात २३ जुलै रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनला प्रत्यक्ष भेट दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात रेल्वे स्टेशन तसेच तेथील कार्यपद्धती याची माहिती असणे आवश्यक आहे. फक्त पुस्तक किंवा चित्रांवरून माहिती सांगणे हे मुलांच्या जास्त लक्षात आले नसते त्यामुळे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मुले जेव्हा बघतात तेव्हा ते त्यांच्या जास्त स्मरणात राहतात. म्हणूनच मुलांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी ही प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यात आली. सर्वप्रथम तिकीट बुकिंग ऑफिस, नंतर ऑपरेटर ऑफिस, आर पी एफ ऑफिस, वेटिंग रूम यांची माहिती देऊन त्यांची कार्यपद्धती मुलांना समजून सांगण्यात आली. विश्वजित मीना यांनी प्रत्यक्षात भेट दिली. सर्वेश यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सर्व ऑफिस दाखवून त्याबद्दल मुलांना सर्व माहिती सांगितली. तसेच तेथील सर्व कर्मचारी वर्गाकडून मुलांना बिस्कीट पुडा देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले.
ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी , प्रिया गरूड ,रूपाली शिंदे ,एडना फर्नांडिस ,मोनाली गायकवाड ,सुषमा बावणे , चैताली अहिरे , रोहिणी पांडे , तसेच मदतनिस छाया आवारे, मंजू जगधने, रविंद्र पटाईत ,तसेच ड्रायव्हर मंगेश शिंदे, विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल, यांनी अतोनात मेहनत घेऊन आजची ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात आली.
No comments:
Post a Comment