Saturday, September 17, 2022

नांदगाव नगरपालिकेचा राष्ट्रीय पातळीवरील "इंडियन स्वच्छता लीग" स्पर्धेत सहभाग,


नांदगाव ( प्रतिनिधी )  - नांदगाव शहरात नांदगाव नगरपरिषदेने भारत सरकारच्या स्‍वच्‍छ अमृत महोत्सव अंतर्गत "इंडियन स्वच्छता लीग" या देश पातळीवरील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला असून आज शनिवारी दि. १७ सप्टेंबर  रोजी शहरातून भव्य स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आली होती. सदरील रॅली नगरपरिषद प्रांगणातुन सकाळी शहरातील तरुण तसेच महिला, विविध शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक , सफाई कर्मचारी आणि नगरपरिषदेचे अधिकारी , कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. 
 त्यानंतर रॅलीचे खास आकर्षण असणाऱ्या बाल वारकरी मंडळाच्या बालवारकरी यांनी " वृक्षवल्ली आम्हा सोयरे " अशा अभंगातुन व ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या साथीने रॅलीची सुरवात करण्‍यात आली. हातात झाडू घेऊन सर्व सहभागी नागरिक स्वच्छतेच्या घोषणा देत निघाले त्यानंतर शहरातून वाहणाऱ्या शाकांबरी नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली त्यानंतर शनीमंदिर येथील नगरपरिषदेचे उद्यान येथे स्वच्छता मोहीम राबवत पुढे हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक येथून नांदगाव नगरपरिषद प्रांगणात येवून रॅलीचा शेवट करण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग नोंदविला होता.

No comments:

Post a Comment

आमदार सुहास कांदे व उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुम कांदे यांच्या हस्ते पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजा, ८ किलो वजनाचे चांदीचे विविध अलंकार अर्पण !!

नांदगाव (प्रतिनिधी)  -  नांदगाव येथील ग्रामदैवत असलेल्या श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव बुधवार (दि.१) पासून मोठ्या उ...