नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरात बाजारपेठ मध्ये भोंगळे रस्त्यावर खड्डे, चिखलामुळे वाहनचालक, पायी चालणाऱ्या डबक्यातून वाट शोधावी लागत आहे. पादचाऱ्यांना खड्डे वाचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हा बकालपणा किती दिवस भोंगळे रस्त्यावर असणार असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. बाजारात लोक भाजीपाला, मासळी घेण्यासाठी मोठी गर्दी असते. तसेच शहरातून कांद्याचे मोठी ट्रकची वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी होते. प्रशासनाने या लवकर बुजवले तर नागरिकांना चालणे मुश्कील होणार नाही. वाहने समोरून जात असताना नांगरिकाच्या कपड्यावर चिखलाचे घाण पाणी पडल्याने कपडे खराब होत आहे. रोजच इथे भाजीपाला विक्री येत असतो बाजार झाल्यावर तोच नदीत फेकला जातो, प्रश्न पडतो की नदीच्या पाण्यात तळे कि मळे अशी अवस्था झालेली आहे. यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बाहेरील व्यक्ती जर नदीच्या बाजूने गेला तर त्याला वास सहन करावा लागतो आहे. ही वस्तुस्थिती सगळीकडे असल्याने डास, मच्छर मुळे रोगराई पसरत आहे. नागरिकांनी मागणी केली की भोंगळे रस्त्यावरील बकालपणा दुर करावा, रस्त्याची डागडुजी करून साफसफाई कामे करायची मागणी करत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment