नांदगाव शहर (प्रतिनिधी) - नांदगाव मध्ये शुक्रवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी सौ.क.मा. कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महाशिवरात्री व शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक गोरख डफाळ व विशाल सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.शाळेच्या प्रांगणात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थी शिवाजी महाराजांच्या व माता जिजाऊंच्या वेशभूषेत आले होते. तसेच महाशिवरात्री असल्याने काही विद्यार्थी महादेवाच्या व पार्वतीच्या वेशभूषेत आले होते. प्रथम विद्यार्थ्यांचे भाषणे घेण्यात आली. हर्षवर्धन साठे,तन्वी दळवे,सायली काकळीज,पार्थवी वेताळ,यांनी शिवाजी महाराजांवर अतिशय छान प्रकारे भाषणे सादर केले.तसेच भक्ती थोरात,अन्वी पवार,खुशी जेजुरकर,लावण्या जगधने, या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज आधारित पोवाडे छान प्रकारे सादर केली.विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित विविध घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय.जय भवानी जय शिवाजी,हर हर महादेव. तसेच काही विद्यार्थी महादेव आणि पार्वतीच्या वेशभूषेत आले होते. त्यांनी महादेवावर आधारित गीते सादर केली. आणि संपूर्ण परिसर भक्तीमय,शिवमय करून टाकला. अशा दोन्ही कार्यक्रमाचा संगम विद्यार्थ्यांनी घडवून आणला. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी शाळेच्या आवर दणाणून गेले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडक्यात माहिती श्रीमती.निलोफर पठाण व संदिप आहेर सरांनी सांगितली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती मोरे,आणि विधी साळंखे यांनी केले. या कार्यक्रमात वेशभूषेत बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय, सुनील कुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा, पी.पी गुप्ता, सरचिटणीस प्रमिला कासलीवाल, संचालक महिंद्र चांदिवाल, तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, विशाल सावंत व गोरख डफाळ,शाळेतील ज्येष्ठ शिक्षक किशोर बागले. यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, विजय जाधव, तुषार जेजुरकर, श्रीमती. धन्वंतरी देवरे,निलोफर पठाण, जयश्री पाटील, आदिती चव्हाण, अनुराधा सागर,मीना सुरळकर, निकिता देशमुख,यांनी विशेष परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment