नांदगाव ( प्रतिनिधी) - सोमवारी दि. १० एप्रिल रोजी नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल चे नवीन वर्षाची आजपासून सुरुवात झाली. नमन एज्युकेशन सोसायटीचे
अध्यक्ष संजय बागुल ,उपाध्यक्ष सरिता बागुल, रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे एक अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. संपूर्ण शाळा ही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सुसज्ज करण्यात आली होती. शाळेला फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती. नमन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सरिता बागुल यांनी विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबिन कट करून स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना सरप्राईज गिफ्ट व गुलाबपुष्प आणि बिस्किटाचे वाटप करून स्वागत करण्यात आले. शाळेच्या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक नृत्य सादर केले त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद हा द्विगुणित झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री चौधरी यांनी केले.
हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका रोहिणी पांडे, अश्विनी केदारे, प्रियांका खांडेकर , चैताली अहिरे ,निकिता सकट, मोनाली गायकवाड ,एडना फर्नांडिस, जयश्री डोळे तसेच मदतनीस वैशाली बागुल, छाया आवारे, अनिता नेमणार, ज्योती सोनवणे या सर्वांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचे अति उत्साहाने स्वागत केले.
No comments:
Post a Comment