Sunday, September 17, 2023

नांदगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदवीदान दीक्षांत समारंभ,



 नांदगाव ( प्रतिनिधी) -  औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे विश्वकर्मा जयंती निमित्ताने पीएम स्किल रन तसेच पदवीदान दीक्षांत समारोह  आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन  करून विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली .या कार्यक्रमासाठी नांदगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्या अर्पणा कुलकर्णी,  नांदगावचे पीआय नितीन खंडागळे , पीएसआय बहाकर साहेब तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष पंकज खताळ ,  आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अॅड.विद्या कसबे , नांदगाव रेल्वे लोको पायलट क्रू लॉबीचे प्रमुख शंकर धनवटे  पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नितीन खंडागळे यांनी भूषविले .औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण झालेल्या विविध व्यवसायातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच पीएम स्किन रन मध्ये प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस रकमेचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी संजय धनवटे , शंकर धनवटे, अँड.विद्या कसबे , पीआय  नितीन खंडागळे ,  पंकज खताळ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेतील गटनिदेशक एम. डी. निकुंभ सर  तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद आवर्जून हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी .राठोड व पी. एस. गायकवाड यांनी केले व एस. टी. शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत यांचे गान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...