नांदगाव ( प्रतिनिधी ) - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचलित व्ही.जे.हायस्कूल,नांदगाव येथे इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी स्वानंद उपक्रमांतर्गत टाकावू वस्तू , जूने रद्दी पेपर यापासून ' चंद्रयान 3 ' च्या 3D प्रतिकृती तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी दोन ते तीन फूटा पर्यंत आकर्षक, वास्तववादी ४२ प्रतिकृती साकारल्या. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक चंद्रकांत दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. गिरीश निकम व स्वप्निल पाटील यांनी त्यांना सहकार्य केले. सहभागी विद्यार्थांचे कौतुक शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक मनोहर बडगुजर, उपमुख्याध्यापक दिपक बाकळे, पर्यवेक्षक मनोहर शिंदे यांनी केले.तसेच शिक्षक प्रतिनिधी गुलाबराव मोरे,अनिल तांबेकर, मिलींद श्रीवास्तव, राजेश भामरे, विलासराव काकळीज यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment