Tuesday, September 19, 2023

नांदगाव मध्ये तैलिक समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात निवेदन,


नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका तैलिक समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षणा बाबत नाशिक विभाग अध्यक्ष शशिकांत व्यवहारे, उत्तर जिल्हाध्यक्ष समाधान चौधरी,जिल्हा वकील आघाडी अध्यक्ष ऍड.बी.आर.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
ओबीसी आरक्षणा बाबत सुरू असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. १८) रोजी नांदगाव शहर व तालुका तैलिक समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, शासनाने कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण जी. आर.२००४ व २०२३ ची आरक्षण समिती रद्द करण्यात यावी. मुळात ओबीसी समाज हा जवळ पास ६०% आणि त्यातही जवळ जवळ ४००. जाती जमाती आहेत आणि संख्येच्या तुलनेत आमचे आरक्षण हे २७.टक्के नव्हे तर अधिक असायला हवे होते पण आम्हाला तुटपुंजे २७.टक्के आरक्षण देऊनही आणि त्यात ही विशेष मागास प्रवर्गासाठी ११.टक्के म्हणजे आमच्या वाट्याला १६.टक्के आरक्षणावर बोळवण करून आणि ते ही आता संपवण्याच्या जो घाट घातला जातोय त्यास आमचा तिव्र विरोध आहे.आज आमचे राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण संपवण्याचा डाव खपवून घेतला जाणार नाही अशा तीव्र भावना व्यक्त करीत आज पर्यंत साऱ्याच राजकीय पक्षांनी आम्हा ओबीसींचा गैर फायदा घेत पिढ्यांन पिढ्या सत्ता भोगत मलिदा लाटला आणि त्यांना आमचा आता हा निर्वाणीचा इशारा आहे. हा समाज आता निद्रिस्त नाही राहिला, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर नकीच आमचा ओबीसी बांधवांचा उद्रेक पाहायला मिळेल. आता ही सुरुवात आहे पण जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर त्यांचा प्रक्षोभ बघावा लागेल आशा भावना कळवित निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदन सादर करतांना तालुकाध्यक्ष दत्तात्रय बत्तासे,तालुका युवा आघाडी अध्यक्ष संतोष गायकवाड, शहर समाज अध्यक्ष दिलीप सौंदाणे,तालुका महिला आघाडी अध्यक्षा कुमुद चौधरी,शहर महिला आघाडी अध्यक्ष सरला चौधरी, विनोद महाले, तालुका उपाध्यक्ष दिलीप देहाडराय, शहर उपाध्यक्ष, मनोहर चौधरी तालुका सचिव,लक्ष्मण चौधरी, नितीन वाघ,बाळासाहेब वाघ,राजेंद्र चौधरी,नितीन पाटील,मनोज वाघ,बाळासाहेब देहाडराय,देविदास सौंदाणे,रमेश खंडू,संतोष चौधरी,सुदाम सौंदाणे,हेमंत चौधरी,अमोल खैरणार आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मनमाड–इंदोर रेल्वेमार्गामुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश ,

नांदगाव (प्रतिनिधी )  - मनमाड–इंदोर रेल्वेमार्गाच्या प्रगतीपथावरील कामामुळे अस्तगाव ता. नांदगाव येथील शेतकरी बांधवांच्या शेती सं...