मनमाड ( विशेष प्रतिनिधी) - मनमाड आपल्या सगळ्यांचा लाडका आणि आनंदाचा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी आपल्या लाडक्या गणरायाची सगळेचजण आतुरतेने वाट बघत असतात आणि सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो .भारतात एकमेव ठिकाण असे आहे , जिथे गणराया रोज मनमाड ते कुर्ला अप डाऊन करतात ते म्हणजे मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मधील गणेशोत्सव गेल्या २६ वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदाही हा करण्यात आला .आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते विधिवत पुजा करून गोदावरीच्या राजाची स्थापना करण्यात आली. गोदावरी एक्सप्रेस ही आता ३ दिवस धुळे येथून करण्यात आली असुन लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन ही गाडी पूर्ववत मनमाड येथूनच कशी सुरू करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार कांदे यांनी व्यक्त केले.यावेळी चांगला पाऊस पडू दे दुष्काळ दूर होऊ दे अशी प्रार्थना केली असल्याचे कांदे यांनी सांगितले. यावेळी रोज अप डाऊन करणारे चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
आमदार सुहास कांदे व उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुम कांदे यांच्या हस्ते पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजा, ८ किलो वजनाचे चांदीचे विविध अलंकार अर्पण !!
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील ग्रामदैवत असलेल्या श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव बुधवार (दि.१) पासून मोठ्या उ...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment