( छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर )
नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ च्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन माजी नांदगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर कवडे यांच्या शुभहस्ते सकाळी अकरा वाजता संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा. डॉ.एस.एन. शिंदे यांनी केले. आपल्या मनोगतातून महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या कक्षा रुंदावल्या जात असल्याची माहिती दिली. नगरसेवक चंद्रशेखर कवडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अमित बोरसे यांनी विविध उदाहरणे देऊन एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थी कसा घडला जातो याची जाणीव करून दिली व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एस .आर. जाधव यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी दिलीप पाटील, कैलास पाटील , विठ्ठल दादा आहेर, सुदामराव काळे, रमेश अण्णा बोरसे, डॉ. प्रवीण निकम,अरविंद पाटील, राहुल पवार, प्रवीण सोमासे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व साहित्य पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.के. पवार व आभार प्रदर्शन प्रा. डी वाय आहेर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर.टी. देवरे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर वृंदांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment