नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव मध्ये भारतीय जनता पार्टी नांदगाव शहर आणि तालुका यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन व मेणबत्ती प्रज्वलीत करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम नांदगाव येथील शनी चौक येथे आयोजित करण्यात आला होता.
शहरातील कार्यक्रमास भा.ज.पाच्या जेष्ठ नेत्या ॲड.जयश्रीताई दौंड, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, अध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रशांत खैरनार, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, डॉ. अशोक सदगीर, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, सोमनाथ घोंगाणे, मनोज शर्मा, राजेंद्र गांगुर्डे, भाजपा ग्रामीण च्या अक्षदा कुलकर्णी, ॲड. मनिषा पाटील, तारा ताई शर्मा, ज्योतीताई गाडे, ओबीसी शहर अध्यक्ष दिनेश दिंडे, ॲड. उमेश सरोदे, डॉ. बाळासाहेब आहेर, बळवंत शिंदे, रवि सानप, समाज सेवक संजय मोकळ, सुरेश कुमावत, अतुल कुलकर्णी, धम्मवेदी बनकर, शुभम सौंदाणे, सतिष आहिरे, सुरसेसह आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment