नांदगाव ( प्रतिनिधी ) - भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नांदगाव येथील दत्तराज छाजेड यांची निवड करण्यात आली आहे . महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांचे मार्गदर्शनात व्यापारी आघाडीचे प्रदेश प्रमूख वीरेंद्र कूकरेजा यांनी त्यांच्या नावांची नियुक्ती जाहीर केली. छाजेड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणा पासून स्वयंसेवक आहेत. गत २५ वर्षांपासून संघटनेत सातत्याने विविध पदावर कार्यरत आहेत. दोन टर्म नांदगाव तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असताना लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद ,पंचायत समिती या निवडणुकीत पक्षाला चांगले मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. सामाजिक संस्था संस्कृती रक्षक केंद्राची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्याने राबविले आहेत. महाविद्यालयीन जीवनात पुणे विद्यापीठ विद्यार्थी संसदेचे अध्यक्षपद व सिनेट सदस्य पद भूषवले आहे. भारतीय जैन संघटनेचे उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष पदावर ही त्यांनी काम केलेले आहे. व्यापारी आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्षपदावर कायरत असतांना फेर निवड होवून ही त्यांनी राजीनामा दिला होता. त्या पाठोपाठ जिल्हाभरात शेकडो पदाधिकारी यांनी पक्षपदाचा त्याग करून फक्त भाजपा सदस्य रहाणे पसंत केले होते. प्रदेश महामंत्री व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख विजयराव चोधरी यांनी त्याची दखल घेवून सर्व पदाधिकारी यांचेशी विचार विनिमय मार्गदर्शन करून पुन्हा सर्व पदाधिकारी सक्रीय केले. त्यांचे निवडी बद्दल भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच एक अभ्यासू सर्वसमावेशक व लोकप्रिय नेतृत्वाचे या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment