नांदगाव ( प्रतिनिधी) - सावरगाव येथील ना. शि. प्र. मंडळ नासिक संचलित माध्यमिक विदयालय इयत्ता १०.वी सन २०२४-२५ उत्तीर्ण विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ शशिकांत जाधव व प्रमुख अतिथी ह.भ. प. रामायणाचार्य माधुरीताई शेरेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रारंभ इशस्तवन व सरस्वतीपुजानाने झाला. कार्यक्रमाचे प्रस्तविक मा .मुख्याध्यापक मिलिंद श्रीवास्तव यांनी केले. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शहरी भागातील विदयार्थ्यांनपेक्षा सवलतीचा अभाव असतांना, पालकांच्या शेती व्यवसायात मदत करून अभ्यासात प्रवीण्य मिळविल्याचे विषद केले व विदयार्थ्यांना भावी वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी गुणवंत विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विदयालयाच्या शिक्षिका श्रीमती हरणे यांनी आपले मनोगतातुन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. ह भ प माधुरीताई शेरेकर यांनी शालेय शिस्त व विदयार्थ्यांसाठी असलेले शिक्षकांचे योगदान ह्या विषयी दाखले देऊन मार्गदर्शन केले. डॉ. शशिकांत जाधव यांनी व मुख्याध्यापक मिलिंद श्रीवास्तव यांनी गुणवंत विदयार्थ्यांना भावी शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक यांचा पुष्प व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत काकाळीज यांनी केले प्रभाकर सूर्यवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ऋषिकेश डोमाडे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमा साठी विद्यार्थी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमा साठी सावन कासट व दगडू केदार यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Saturday, July 26, 2025
नांदगाव येथे नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन,
नांदगाव (प्रतिनिधी ) - राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्ताने ओसवाल श्वेतांबर जैन संघ, जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव, नांदगाव सहेली ग्रुप, स्थानक वासी जैन कॉन्फरन्स महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन ओसवाल भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ जैन साध्वी मधुर व्याख्यानी पूज्य विचक्षणाजी महाराज व प्रसन्न मूर्ती पूज्य संकल्प दर्शनाजी यांच्या आशीर्वाचनाने झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओसवाल जैन संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी केले .तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ दुसाने यांनी करून दिला. येथे उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार चातुर्मास समिती अध्यक्ष आनंद चोपडा व संघ उपाध्यक्ष कमलेश पारख यांच्या हस्ते करण्यात आला. नेत्रशल्य चिकित्सक डॉ.प्रमोद बोराडे व त्यांच्या टीमने नेत्र तपासणी केली तर चांडक पॅथॉलॉजी लॅबच्या टीमने मधुमेह तपासणी केली. सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जाइंट्स ग्रुपचे पदाधिकारी नरेंद्र पारख, जगन्नाथ साळुंखे, सुमित गुप्ता, बळवंत शिंदे, वामन पोतदार, सचिन खरोटे, रिषभ सुराणा, जायंटस् सहेली ग्रुपच्या अध्यक्षा वैशाली दुसाने, भारती बोरसे, वंदना कवडे, पुष्पा दुसाने, वर्षा छाजेड, छाया परदेशी, ज्योती करवा, तारा शर्मा, अनुश्रीया जोशी, शंकूतला शिंदे आदी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बुरकूल यांनी केले.
Thursday, July 24, 2025
माध्यमिक व कनिष्ठ महा.सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न,
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या नांदगाव तालुका माध्यमिक व कनिष्ठ महा.सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन बुधवारी दि. २३ रोजी जुलैला संपन्न झाले. या संस्थेच्या संचालिका सौ.पल्लवीताई आहेर, संस्थापक पी.आर.पाटील, चेअरमन प्रमोद चिंधा चव्हाण, कार्यवाह आनंद चकोर व संचालक अशोक मार्कंड, संतोष इप्पर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. लवकरच नूतन इमारत मोठ्या दिमाखात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभी राहिल असे चेअरमन प्रमोद चिंधा चव्हाण यांनी सांगितले.यावेळी इंजि.समाधान खैरनार,राजुभाऊ रत्नपारखी,द्यानेश्वर पाटील,संतोष आहेर तसेच कर्मचारी शरद देशमुख , शुभम सोनेज उपस्थित होते.
आयशर ट्रक - स्कूटी यांच्यात झालेल्या अपघातात दोन सख्या भावाचा मृत्यू, एक गंभीर जखमी,
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या चांदेश्वरी धबधब्या जवळ असलेल्या घाटात नागमोडी वळणावर इंधन वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक व स्कुटी यांच्यात झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तिघांना नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात डॉक्टरानी तपासणी करून दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
नांदगाव तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदेश्वरी धबधबा जवळ असलेल्या घाटात नागमोडी वळणावर आयशर गाडी क्रमांक (MH 41 U 8525 ) व स्कुटी क्रमांक (MH 41 BQ 1723) यांच्यात जोरदार धडक होऊन दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत झालेले दोघेही बंधू राहुल बाळू खोडके (वय 25) आणि रोहित बाळू खोडके हे मूळचे गर्दनी, तालुका अकोला येथील रहिवासी असून, मागील एक वर्षापासून कासारी येथे वास्तव्यास होते. या अपघातात समाधान गोरख मेगाळ हा युवक जखमी झाला असून, त्याच्यावर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींना स्थानिक रहिवाश्यानी तातडीने नांदगाव च्या ग्रामिण रुग्णालयात नेले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. काजल साळुंखे यांनी तपासणी करून दोन्ही भावांना मृत घोषित केले. या घटनेची नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असुन , घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहे.
नांदगाव येथे उबाठा शिवसेनेचा हल्लाबोल रास्ता रोको आंदोलन , नागरी समस्या मांडत प्रशासनाचे वेधलं लक्ष,
नांदगाव (प्रतिनिधी) - गेल्या अनेक वर्षांपासून
नांदगाव शहरातील नागरिक मूलभूत नागरी समस्यांना सामोरे जात असून, याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी देऊनही प्रशासन व शासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तालुकप्रमुख संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील जुना रेल्वे गेट भुयारी मार्ग येथून मोर्चा काढत महामार्गावर जाऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. नांदगाव शहरातील तसेच तालुक्यातील अनेक जनसामान्यांच्या समस्या प्रलंबित आहेत. यासाठी अनेकदा लेखी तोंडी तक्रारी करण्यात आल्या . मात्र प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे .प्रशासनाला जाग यावी यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तालुका प्रमुख संतोष गुप्ता, जिल्हा समनव्यक सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जुना रेल्वे गेट येथून मोर्चा काढत महामार्ग क्रमांक २४ वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात सुनील पाटील, संतोष गुप्ता, श्रावण आढाव , माधव शेलार, मुक्तताताई नलवडे, शैलेश सोनवणे, निवृत्ती गुंजाळ, सतीश बारावकर, अनिल रिंढे, संतोष वाघ , भाऊसाहेब सदगीर, गोरख जाधव ,सीताराम राठोड ,प्रमोद मोरे ,गौतम जैन, वसंत नागरे, राजाभाऊ आहेर ,दादाभाऊ आहेर, बबन उगले, बाबासाहेब गायके, शिवसेना नेते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या -
▶ गिरणा धरण ५६ खेडी योजनेच्या जलवाहिन्यांमधून होणाऱ्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया या लिकेजमुळे अंडरपासमध्ये वर्षभर साचलेले पाणी, शेवाळ व ओलावा निर्माण होत असून, नागरिकांना यामुळे गंभीर धोके संभवत आहेत.
- दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम
- लिकेज झाल्यानंतर गढूळ पाणी पुन्हा पाइपलाईनमध्ये ओढले जाते. परिणामी संपूर्ण शहरात अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे.
▶ दुरुस्तीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा
- अंडरपासचा रस्ता रुंद करा हॉटेल नंदिनीजवळील भिंत हटवून अंडरपासचा रस्ता अधिक मोकळा व प्रवाहक्षम करावा.
* महत्वाच्या गाड्यांना नांदगाव व न्यायडोंगरी स्थानकांवर थांबा देण्यात यावा झेलम, शालिमार, सचखंड, सेवाग्राम व बडनेरा एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे पुन्हा बहाल करावेत.
- येवला रोडवर पादचारी पूल उभारण्याची मागणी रेल्वे ट्रॅक ओलांडताना आतापर्यंत अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.
- उबाठा शिवसेना कार्यालयावर झालेल्या बेकायदेशीर कब्ज्याची चौकशी करा.
Sunday, July 20, 2025
नांदगावच्या एकवीरा ग्राउंडवर भव्य प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटप्रेमींना चौकार षटकार बघायला मिळणार!!
नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव येथील एकवीरा ग्राउंडवर भव्य प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा दारा कंपनी आयोजित" मुज्जुभाई चषक सिझन २" शुक्रवार दि. १ अॉगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेला सुरू होणार आहेत. मागील वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सामन्यात चौकार, षटकाराची आतिषबाजी बघायला मिळणार आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव पासून दूर रहावे म्हणून क्रिकेट खेळणे साहजिकच प्रत्येक जण उत्सुक आहे. स्पर्धा युट्यूबवर ऑनलाईन पद्धतीने थेट प्रक्षेपण होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी ३१०० रुपये असणार असून, आधी प्रत्येक संघाने १००० रुपये जमा करण्यासाठी सांगण्यात आले आहे. जो संघ अंतिम सामन्यात विजय होईल त्यास एकुण ३१,००० रुपये दारा कंपनी यांच्याकडून, उपविजेता संघास सिध्देश खरोटे यांच्या कडून २१,००० रुपये ,तर तृतीय ७,००० रुपये मस्तानी ज्युस सेंटर यांच्या कडून बक्षीस मिळणार आहेत. स्पर्धेत काही नियम व अटी आहेत. सामना हा एकुण ५ षटकांचा असेल . प्रत्येक संघात ७ खेळाडूचा समावेश असणार आहे. गोलंदाजीची पद्धत ही स्लोव स्पिन असेल. एक खेळाडू एकाच संघातून खेळेल. पंचाचा निर्णय अंतिम राहील. खुली स्पर्धा असल्याने कोणत्याही संघास स्पर्धेत सहभागी होता येईल. जो आधी प्रवेश फी जमा करतील अशा प्रथम १६ संघांना प्राधान्य असेल. सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार आयोजकांना असेल. ही स्पर्धा इतकी रोमांचक असेल की सामन्यात दोन एका इनिंग मध्ये दोन - दोन रिव्हीव घेता येतील. पहिल्या रांउडपासून पोल पध्दतीने सामने होतील. कॉटर, सेमीफायनल चिठ्ठी पद्धतीने खेळवण्यात येईल. सामान्याची प्रवेश फी ही फोन पे नी ही करता येईल . क्रिकेट स्पर्धेत विशेष सहकार्य म्हणून विक्रांत (नानु) कवडे, तर राहील सय्यद, गणेश सांगळे, कपिल पारखे यांचे सहकार्य लाभले आहे. नांदगाव येथील जनसेवा मित्र मंडळ, फोन वाले सागर मोबाईल, महाराष्ट्र मोबाईल, हॉटेल शालीमार, महाराष्ट्र जलेबी, लकी बिर्याणी हाऊस, मुस्कान चिकन शॉप अनमोल सहकार्य मिळाले आहे. जे कोणी संघ सहभागी होणार असतील अशी क्रिकेट संघाने खालील आयोजकांकडे प्रवेश फी भरून नांव नोंदणी लवकरात लवकर करून स्पर्धेत सहभागी व्हावे. संपर्कासाठी - हुमैर कुरैशी - 9067900815, उरुज शेख -( फोन पे नं.)8830103169, अमन शेख - 9145134414, फैज अन्सारी - (फोन पे नं.) 9284927985.
Thursday, July 17, 2025
नाग्यासाक्या धरण प्रकल्पाच्या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत बैठक,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या मध्यम प्रकल्पावरील छतीग्रस्त उजवा व डावा कालवा कामासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीतून मंत्री सकारात्मक दाखवली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. सद्यस्थितीत सदर प्रकल्पाचे दोन्ही मुख्य कार्यवाहीतील बांधकामे माती भराव क्षतिग्रस्त झाले असून आवर्तन काळात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. परिणामी धरणात सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून देखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. या अनुषंगाने या कालव्यांचे भराव, दुरुस्ती व बांधकाम, मजबुतीकरण अस्तरीकरण, झाल्यास परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सोबतच गिरणा डावा उजवा वाढवी कालव्याची बंदिस्त पाईपलाईन व मांजरे ते नगाव पाटाचे खोलीकरण दुरुस्ती करून अस्तरीकरण करण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. सदर प्रस्ताव मालेगाव नाशिक कार्यालयानंतर आता संभाजीनगर कार्यालयात असून आठ दिवसात तो मागवण्याची आदेश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे. या बैठकीत जलसंपदा मंत्री तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नांदगाव शहरात हरितकुंभ अंतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम,
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरात देखील नांदगाव नगरपरिषदेच्या वतीने मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. शामकांत जाधव यांच्या उपस्थितीत शहरातील नवीन जलशुद्धीकरण केंद्र जवळील डोंगरावर बांबू, पिंपळ, चिंच, वड, कडुनिंब, शिसम या सारख्या देशी प्रजातीच्या ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.नाशिक जिल्हाधिकारी मा. श्री. जलज शर्मा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बुधवार पासून दि. १६ जुलै रोजी " हरितकुंभ "अंतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, बचत गटातील महिला, पत्रकार बंधू व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतं. सर्वांच्या मदतीने वृक्षारोपण उत्साहात पार पडले. तसेच यावेळी सर्व वृक्ष जगविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.
Wednesday, July 16, 2025
ढेकू आश्रम शाळेत रक्तदान शिबिर संपन्न ,
नांदगाव( प्रतिनिधी ) - स्मृतिदिनानिमित्त मालेगाव ब्लड सेंटर व ढेकू आश्रम शाळेतील सर्व कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आंले होते. ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी व थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आदरणीय पोपटराव हिरे यांच्या जीवनपटावर मनोगत व्यक्त केले .एस. एम.कामडी यांनी पप्पांनी केलेल्या भरीव कामगिरी चा आढावा मनोगतातून व्यक्त केला . सदरील शिबिरात गावाचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण, हेमराज चव्हाण यांनी स्वत रक्तदान करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. आश्रम शाळेतील सर्व कर्मचारी वृंद व गावकऱ्यांनी रक्तदान करण्यात सहभाग घेतला.प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदान दात्यास ब्लड बँक मालेगाव यांच्याकडून सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली.
रक्तदान शिबिरात एकूण २५ जणांनी रक्तदान केले. त्या सर्वांचे शाळेकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
नांदगाव येथे बांधकाम कामगारांसाठी संसार उपयोगी भांडे व सुरक्षा संच वाटप,
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे १०५ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडे व सुरक्षा संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित कामगार बंधू-भगिनींना दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त भांडी संच, तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारे सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक बांधकाम कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळून, त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारा आधार मिळाला. यावेळी शिवसेना नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव, भाऊराव बागुल, एन के राठोड, तानसेन जगताप, महेंद्र आहेर, चेतन मोरे, कल्पेश निकम आदींचे बांधकाम कामगार बांधव व भगिनी उपस्थित होते.
नांदगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ७ लाख १४ हजारांची शिष्यवृत्ती ,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सण २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेच्या आधारे ७ लाख १४ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपनी द्वारा निकष पूर्ण करणाऱ्या गरजू व पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०२४-२५ साठी गुणवत्तेनुसार महाविद्यालयातील ८४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी आठ ते नऊ हजार रुपये याप्रमाणे ७ लाख १४ हजार रुपये जमा झाले आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमुळे मोठा आधार मिळाला आहे. याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यातील शिक्षणासाठी या शिष्यवृत्तीचा उपयोग होईल अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. महाविद्यालयातील पात्र व गरजू विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, प्रसाद कवडे व इतर सर्व सेवकांनी विद्यार्थ्यांना मदत केली होती.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस एड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे महाविद्यालय विकास समिती व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.
Subscribe to:
Comments (Atom)
नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...