Thursday, March 5, 2026

नांदगाव येथील मविप्र महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्यातून २४६ विद्यार्थ्यांना मिळाली नियुक्तीपत्रे,





नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक  मविप्र समाजाचे  कला, वाणिज्य व विज्ञान नांदगाव महाविद्यालय व CII-MCC नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला. महिंद्र सोना लि., बॉश, टाटा मोटर्स, ब्लिंकीट, किर्लोस्कर, बजाज आणि टापारिया टूल्स लि. इत्यादी नामांकित कंपन्यांसोबतच ५० हून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या. या मेळाव्यात २४६ हून अधिक विद्यार्थ्यांना मुलाखती झाल्यानंतर लगेचच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
    या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे यांनी नांदगाव परिसरातील औद्योगिक कंपन्यांची उणीव, येथील विद्यार्थ्यांमध्ये असलेली विविध कौशल्ये आणि त्याप्रमाणात त्यांना प्राप्त होणाऱ्या रोजगाराच्या संधींची असमानता यादृष्टीने या रोजगार मेळाव्याचे महत्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी निर्भिड होऊन आत्मविश्वासाने आलेल्या परिस्थितीचा सामना करत आलेल्या संधीचे सोने करावे आणि नियुक्तीपत्रासोबतच नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याची मानसिकता तयार करावी असे आवाहन त्यांनी केले.
    प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. दहावी, बारावी, ITI, पदवी, पदव्युत्तर पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकिंग, फायनान्स, मेडिकल, ऑटोमोबाईल, इंजीनियरिंग व अन्य इतर क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदगाव, मनमाड, मालेगाव परिसरातील विद्यार्थी या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणूनच हा मेळावा नांदगाव महाविद्यालयात घेण्याचा आग्रह होता. तसेच या मेळाव्यासाठी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एवढा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
CII-MCC चे मॅनेजर श्री सागर शिरसाठ यांनी मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या तरुणांना विविध कंपन्यांची माहिती देत विद्यार्थ्यांनी सर्वच कंपन्यांच्या HR प्रमुखांची भेट घेऊन मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करत मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या.
     या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक रमेश अण्णा बोरसे, योगेश भाऊराव बोरसे, ITI प्राचार्य एच. बी . ठाकरे, मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी. गव्हाणे, होरायझन अकॅडमीच्या प्राचार्य पूनम मढे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. के. आर. खंदारे, प्रा. गोकुळ बोरसे, प्रा. पी . एम. आहेर, IQAC समन्वयक प्रा. एम बी आटोळे, प्रा. स्वप्निल शेंडगे, प्रा. बी. पी. मोरे, प्रा. आर व्हि. वाघ, प्रा. ए. बी. जाधव, प्रा. बी.एम. आहिरे, प्रा. एम. पी. मेश्राम, प्रा. एस. जे. कर्वे, प्रा. एस. पी. दौंड, प्रा. योगेश वाघ, प्रा. ए. एफ. राठोड, प्रा. श्रीमती धोंगडे, प्रा. श्रीमती आहिरे, प्रा. श्रीमती आवारे आणि मोठ्या संख्येने परिसरातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस.एस. प्रसाद व आभार प्रदर्शन प्रा. डी. वाय. तुंगार यांनी केले.

No comments:

Post a Comment

नस्तनपूर रेल्वे उड्डाणपूल भूसंपादन संदर्भात शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट,

नांदगाव ( प्रतिनिधी)   -  नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड ते न्यायडोंगरी दरम्यानच्या नस्तनपुर रेल्वे फाटकावरील प्रस्तावित उड्डाण पु...