नांदगाव (प्रतिनिधी )- नांदगाव येथील ग्रामदैवत एकवीरा देवी यात्रा चैत्र पौर्णिमेला भरविण्यात येते. या यात्रेच्या उत्सवासाठी हिंदू पंच व जनसेवा मंडळाच्या वतीने यात्रा उत्सव भरविला जातो. या यात्रा उत्सव समिती अध्यक्षपदी युवा उद्योजक आनंद कासलीवाल यांची एकमताने निवड झाली आहे. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे होते. दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली यात्रा यंदा जनसेवा मंडळाचे पुढाकाराने होत आहे.
Monday, April 11, 2022
नांदगावमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहर व परिसरात मोठ्या उत्साहात महात्मा जोतिराव फुले जयंती झाली. यानिमित्ताने सार्वजनिक उत्सव समितीतर्फे सकाळी दहाला राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. महात्मा फुले यांच्या विचारांचे विविध दाखले उद्धृत करणारी 'ठळक अवतरणे' सुशोभित करण्यात आले होते. यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणच्या शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांत प्रतिमापूजन झाले. मुख्य कार्यक्रम शहरातील महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ झाला. आमदार सुहास कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, विनोद शेलार यांनी महात्मा फुल्यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन केले.
नांदगाव स्टेशनवर रेल्वे गाड्या थांब्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे निवदेनाद्वारे मागणी
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगांव शहरात रामनवमी उत्सव निमित्त केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार उपस्थित होत्या. रामनवमीचे औचित साधुन शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेने निवेदन दिले की असे मनमाड कुर्ला टर्मिनन्स गोदावरी एक्सप्रेस मनमाड़ छत्रपती शिवाजी टर्मिनन्स पंचवटी एक्सप्रेस या दोन्ही प्रवाशी रेल्वे गाड्या मनमाड रेल्वे स्टेशनवरुन सुटतात. मात्र नांदगांव शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातुन व्यवसाय, नोकरी, शिक्षण व दैनंदिन कामासाठी शेकडो प्रवासी नाशिक, इगतपुरी व मुंबई येथे ये -जा करत असतात. परंतु नांदगांव येथून कार्यालयीन व शालेय वेळेशी सलग्न अशी एकही प्रवाशी रेल्वे गाड़ी नसल्यामुळे प्रवाशाची गैरसोय होत असते. त्यामुळे नांदगांव रेल्वे स्टेशनवरून या वेळेत प्रवाशी रेल्वे गाड़ी सुरु करण्यात यावी अशी प्रवाशांची तसेच नागरिकांची अनेक दिवसांची सातत्यांची मागणी आहे. तरी नांदगांव शहर व तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होण्यासाठी १) मनमाड कुर्ला टर्मिनल गोदावरी एक्सप्रेस व २) मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पंचवटी एक्सप्रेस अप १२११० व डाउन १२१०९ या दोन्ही प्रवाशी रेल्वे गाड्यापैकी एक प्रवाशी रेल्वे गाड़ी नांदगांव रेल्वे स्टेशन वरुन सुरु करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली.
मांडवडच्या जनता विद्यालयात महात्मा ज्योतीबा फुले यांची १९५ वी जयंती साजरी
मांडवड ( प्रतिनिधी ) - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मांडवड हायस्कूलमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक खैरे आर जी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील ज्येष्ठ नेते संस्थेचे सभासद विठ्ठल आबा आहेर,शिवबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष अशोक निकम ,पगार के.जे.,श्री गावित,श्री शेख,निलेश वाळके,शरद सातपुते आदी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानिमित्ताने विद्यालयातील शिक्षक गोटे पी.डी,श्री.रायते, आपल्या मनोगतातून
महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबद्दल समग्र लिखाणातून आणि त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या दिशेवरून त्यांना अभिप्रेत असलेल्या भावी समाजाच्या स्वरूपाची कल्पना येते. सामाजिक व आर्थिक समतेवर आधारलेला शोषणविरहित असा समाज निर्माण करण्याचे ज्योतीबांचे स्वप्न होते. धर्माच्या आधारे निर्माण झालेली सामाजिक विषमता नष्ट झाली पाहिजे व सर्वजण मानव म्हणून एकत्रित आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता.
अध्यक्षीय मनोगतातून खैरे आर.जी यांनी ज्योतीबा फुले यांच्याबद्दल आपले विचार प्रकट केले फुले हे धर्मविरोधक नव्हते. परंतु त्याकाळी धर्माला आलेले विकृत स्वरूप, कर्मकांडाचे व पुरोहित वर्गाचे प्राबल्य व लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन केली जाणारी धार्मिक पिळवणूक त्यांना मान्य नव्हती. म्हणून मानवतावादाचा पुरस्कार करणाऱ्या एका नव्या धर्माची ‘सार्वजनिक सत्यधर्माची’ कल्पना त्यांनी पुढे मांडली. शूद्रांतिशूद्रांची सामाजिक दास्यातून मुक्तता व्हावी, जातिभेद व अस्पृश्यता नष्ट व्हावी असे जसे त्यांना वाटत होते, तसेच पुरुषांनी लादलेल्या रूढींच्या जोखडांतून स्त्रियांची मुक्तता व्हावी असेही त्यांना मनोमन वाटत होते. जिथे स्त्रियांना पुरुषांइतके स्वातंत्र्य व हक्क उपभोगता येऊ शकतील अशी समाजरचना त्यांना निर्माण करावयाची होती.
उत्पादक श्रमांचे माहात्म्य ज्योतिबांना पटलेले होते. समाजातील परोपजीवी वर्गाची निर्मिती आर्थिक शोषणाच्या प्रक्रियेतून निर्माण होते व या वर्गाचे समाजातील अस्तित्व आर्थिक शोषणाच्या प्रक्रियेचे सातत्य टिकविण्यास कारणीभूत होते असा त्यांचा दृढविश्वास होता. समाजातील उत्पादक श्रम करणाऱ्या वर्गाला योग्य संरक्षण देऊन सामर्थ्यवान केले तर समाजातील आर्थिक शोषणाचे उच्चाटन करणे शक्य होईल असा त्यांचा विश्वास होता. या नव्या समाजरचनेत उत्पादक श्रम करणाऱ्यांचे प्राबल्य असावे असे त्यांना वाटत होते.
ज्योतीबांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक समाजाचे पाईक होणे, सत्यधर्माचे पालन करणे, आपणा सगळ्यांकडून त्यांना हीच खरी आदरांजली आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत परदेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप आहेर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीतील सर्व सदस्य शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी श्री .कोल्हे,श्री.आहेर एन.ए, श्री वर्पे यांनी प्रयत्न केले.
Sunday, April 10, 2022
पतीने पत्नीचा केला तीक्ष्ण हत्याराने खून,
नांदगाव ( प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यातील बाभुळवाडी गावात चारित्र्याया संशयावरून पतीने पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने खून करून मुलीला देखील जखमी केले. फरार आरोपी पतीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. बाभुळवाडी गावातील संजय सोमनाथ दिवे व पत्नी बाली ऊर्फ सुगंधा, मुलगी करूणा राहत होते. संजयला पत्नीच्या चारित्र्याचा संशय आल्याने त्याने पहारेने मारहाण केली. यात सुगंधाचा जागीच मृत्यू झाला. मुलगी देखील यात जखमी झाली. तिला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील , वाघमारे, हवालदार राजू मोरे, अनिल शेरेकर , सागर कुमावत, सागर कुऱ्हाडे तपास करीत आहे.
Wednesday, April 6, 2022
नांदगावात संविधान सभेचे आयोजन
नांदगाव शहरात संविधान सभेच्या आयोजन प्रसंगी महापुरुषांचे वारसदार बहुजन समाजातील बांधवांना संबोधित करणार.
नांदगाव (प्रतिनिधी) - बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांती नायकांच्या संयुक्त जयंतीनिमित्त, संविधान सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदगाव शहरात संविधान के सन्मान में बहुजन मैदान में या कार्यक्रमा प्रसंगी उदघाटक म्हणुन पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आ सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर तसेच प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनची साठे आणि दादाजी साठे हे उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ राजू वाघमारे प्रवक्ते तथा जनरेल सेक्रेटरी काँग्रेस तर स्वागत अध्यक्ष म्हणून विजयजी बोरसे विशेष कार्य, अधिकारी मान राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची ही उपस्थिती असणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात छत्रपतीचे वंशज युवराज खा. संभाजीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची त्यांच्या हस्ते नूतनीकरण व सुशोभिकरण करुन शहराला भेट देऊन बहुजनांचे राजे छत्रपतींचे विचार मस्तकात घ्या असे सांगून गेलेत त्या पाठोपाठ आता पुन्हा एकदा महापुरुषांच्या वंशजांचे आगमन शहरात होत असून त्यांचे ही विचार घेण्यासाठी तसेच तमाम बहुजन समाज बांधवानी त्यांच्या स्वागतासाठी मंगळवार दि १२/४/२०२२ ला सायंकाळी मोठ्या संख्येने पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपस्थित रहावे अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक युवानेते मनोज चोपडे व गौतम जगताप यांनी दिली आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक मनोज निकम यांचा समाज प्रबोधन पर गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
Saturday, April 2, 2022
नांदगावमधील कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात गुढीपाडव्यानिमित्त शैक्षणिक गुढी चे उत्साहात सादरीकरण
नांदगाव ( प्रतिनिधी)- गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षांमध्ये येतो . हिंदूंमध्ये वर्षभरात येणारे साडेतीन मुहूर्त अतिशय शुभ मानले जातात. या साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त गुढीपाडवा हा आहे. पाडवा या सणा पासूनच मराठी नववर्षाची सुरुवात देखील होते .भारतातील सर्व लोक गुढीपाडवा हा सण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.
सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात शैक्षणिक गुढी उभारली .श्रीमती शिंदे मॅडम यांनी गुढीपाडवा या सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस यानिमित्ताने मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी कार्डशिट, माउंट बोर्ड यांपासून गुढी तयार केली. गुढी भोवती शैक्षणिक संबोधाच्या पट्ट्या लावण्यात आल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर , माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ सर उपस्थित होते. प्रशासक पी.पी.गुप्ता ,चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल,विजय चोपडा, महेंद्र चांदीवाल ,यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक सिद्धार्थ जगताप,अभिजीत थोरात, विजय जाधव, ईश्वर फणसे, निलोफर पठाण, धन्वंतरी देवरे, जयश्री चोळके,अनीता पवार,वैशाली शिंदे आदींनी परिश्रम घेतले.अशाप्रकारे गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
Subscribe to:
Posts (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...