नांदगाव (प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या सत्ता नाट्य नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत आले असून बंडखोर झालेल्या मतदारसंघातील शिवसेना आमदार व त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्याचा धडाका शिवसेनेच्या वतीने लावण्यात आला असून, याच धर्तीवर नांदगाव तालुक्यातील पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आल्या. यात आमदार सुहास कांदे यांच्या जागेवर जिल्हाप्रमुख म्हणून मनमाडची माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची वर्णी लागली असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुख पदी अल्ताफ बाबा खान यांच्या खांद्यावर धुरा देण्यात आली आहे. तर नांदगाव तालुका प्रमुख म्हणून संतोष अण्णा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज या सर्व शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नांदगाव तालुक्यातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन रॅली केली. आज हा सायंकाळी चार वाजता नवनिर्वाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, महात्मा फुले पुतळा, तसेच अहिल्यादेवी चौक अभिवादन करत शिवस्मृती मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅली करण्यात आली. यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख अल्ताफ बाबा खान, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक , तालुकाप्रमुख संतोष अण्णा गुप्ता, नांदगाव तालुक्याचे संपर्कप्रमुख प्रवीण नाईक, मनमाडची माजी नगराध्यक्ष दिलीप सोळशे, शशिकांत मोरे, सुनील पाटील, एडवोकेट सुधाकर मोरे, मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख संतोष अण्णा बळीत, शैलेश सोनवणे ,सनी फसाटे, प्रमोद पाचोरकर, संजय कटारिया, लिकायत शेख, ससमाधान देतकार , प्रदीप सूर्यवंशी, भरत आप्पा मोकळ, राजाभाऊ चिते, संतोष बच्छाव, बाळासाहेब गुंजाळ ,शरद गुजर, दिलीप नंद, न्यानेश्वर पवार, चंदू चव्हाण , नामदेव बोराडे, दत्तू चोळखे आदी उपस्थित होते.
Monday, July 18, 2022
Friday, July 15, 2022
गावाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या सूचना
नांदगाव( प्रतिनिधी) - नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नांदगाव दौरा केला. आज नांदगाव येथे तालुकास्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही गावाला दुषित पाण्याचा पुरवठा होता कामा नये, टीसीएल चा वापर योग्य प्रमाणात व नियमितपणे करावा, मुदतबाह्य टीसीएल चा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गट विकास अधिकारी गणेश चौधरी उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक , रास्तारोको करत केली मागणी!!
हिसवळ खुर्द ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द ईथे गिरणा धरणावरील ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या सदोष यंत्रणेमुळे हिसवळ खुर्द , हिसवळ बु. ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. अनेक वेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी नांदगाव - मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले . ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेतुन सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली . यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढवळे साहेब, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कापसे साहेब, नांदगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरवाडकर , पो. बोगीर , पो. सोनवणे, हिसवळ खुर्द चे सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, सदस्य नानासाहेब आहेर, सुदाम आहेर, बंडूकाका आहेर, लखन आहेर, शांताराम लोखंडे, संदीप कदम, संदीप आहेर, माजी सरपंच विजय आहेर, माझे सरपंच मोहन दादा आहेर, माजी सरपंच संजय बापू आहेर,हिसवळ बु. सरपंच बाळू नाना बेंडके, रवींद्र देशमुख, श्रावण भालेराव, राजेंद्र करवर यासह, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचीही गाडी ग्रामस्थांनी अडवली व आपले संपूर्ण समस्या त्यांच्यासमोर मांडली. यातून अधिकारी लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढण्याचेही आश्वासन बनसोड यांनी ग्रामस्थांना दिले.
Thursday, July 14, 2022
नांदगाव , मनमाड ईथील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक राज्य निवडणूक आयोगाकडुन स्थगित ...!!
नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव , मनमाड ईथील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक जाहीर झाली असताना, राज्य निवडणूक आयोगाने मात्र राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय केला आहे . स्थगित करण्यात आलेल्या निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम यथावकाश जाहीर करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. या निर्णयानंतर निवडणूक जाहीर करण्यात आलेल्या क्षेत्रांत लागू करण्यात आलेली आचारसंहिता लागू राहणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
काल राज्य सरकारने आता नगराध्यक्ष, सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून करायचा निर्णय घेतल्याने, नेमका पुढचा बॉस कोण याचा विचार आता जनतेला करावा लागणार आहे. सद्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे. त्यासाठी आता १९ जुलै ही तारीख देण्यात आली आहे. तोपर्यंत नव्या निवडणुका जाहीर करू नयेत, असे कोर्टाने म्हटले होते. त्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ८ जुलै रोजीच्या पत्राद्वारे राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात १ जुलै रोजी विशेष अनुमती याचिकेवरील सुनावणी झाली. त्यावेळी शासनाने इतर मागासवर्ग आयोगाने मागासप्रवगाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी १९ जुलै रोजी ठेवली आहे.
निवडणुक स्थगित झाल्याने नांदगाव , मनमाड मध्ये उमेदवारीवरून मात्र पेच आहे. राज्यातील सत्ता बद्दल झाल्याने होणाऱ्या पालिका निवडणुकीत काय परिणाम होतील येणारा काळ ठरवेल. पुन्हा निवडणूका कधी जाहीर होतात याकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नजरा लागल्या आहे. नांदगाव , मनमाड मध्ये पक्षाचे टिकट मिळण्यासाठी सगळ्येच आजी माजी नगरसेवक, युवक सज्ज आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका सत्ताधारी पक्षांपासून इतर सर्वच पक्षांनी घेतली आहे. त्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी महत्वाची मानली जात आहे.
Wednesday, July 13, 2022
नांदगाव नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कडुनिंबाच्या वृक्षांची लागवड
नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत व स्वाध्याय परिवाराच्या माधववृंद उपक्रमांतर्गत मंगळवारी १२ जुलै रोजी नांदगाव शहरातील महाजनवाडा परिसरातील स्वाध्याय केंद्रासमोर कडुनिंबाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी वृक्षांचे पूजन मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व स्वाध्याय परिवारातील सदस्य व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
Saturday, July 9, 2022
नांदगाव, मनमाड नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं, पुढील महिन्यातील १८ ला मतदान, १९ अॉगस्टला मतमोजणी..!
नांदगाव / मनमाड ( प्रतिनिधी) - आगामी होणाऱ्या नांदगाव , मनमाड नगरपरिषदेची निवडणुक पुढील महिन्यातील १८ अॉगस्ट ला होणार असून, तर मतमोजणी १९ अॉगस्ट आहे.
महाराष्ट्र राज्यातील ९२ नगरपरिषद आणि ४ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर निवडणुक आयोगाकडून कार्यक्रम जाहिर करण्यात आला. नांदगाव , मनमाड नगरपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीचे पुढील महिन्यातील १८ ऑगष्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगष्ट ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया २० जुलै पासून सुरू होणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशा नुसार २२ जुलै ते २८ जुलै पर्यत नामनिर्देशन पत्र भरावयाचे असून २९ जुलै रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी आहे. तर ४ ऑगष्ट माघारी ची तारीख असून ५ ऑगष्ट रोजी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे . निवडणुकीचे मतदान १८ ऑगष्ट रोजी होणार असून, १९ ऑगष्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
काही दिवसापुर्वी नांदगाव (क) नगरपरिषदेत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानूसार , १ ते १० प्रभागाचे आरक्षण निश्चीत करण्यात आले. आगामी निवडणुकीत १० प्रभाग असुन यापुढे नव्या प्रभागरचनेनुसार नगरपरिषदेत २० सदस्यसंख्या असतील. आधी सदस्यसंख्या १७ होती. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य निवडुन येतील. महिलासाठी १० राखीव जागा असल्याने पुढील समीकरणे काय असेल येणारा काळ ठरवेल.
मनमाड (ब) नगरपरिषदेत एकूण 16 प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनेक ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्याने विद्यमान आणि काही भावी नगरसेवकाचा हिरमोड झाला आहे. मनमाड शहरात नव्या प्रभाग रचनेत एकूण ३३ नगरसेवक असणार आहेत. निवडणुकीसाठी असणारे आरक्षण जाहीर झाल्याने ईच्छुकांनी नेतेमंडळी कडे भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
नांदगाव , मनमाड नगरपरिषदेची तारखा जाहिर झाल्याने नेतेमंडळी, कार्यकर्ते ही प्रचारासाठी व्यस्त आहे. राज्यात नवीन सरकार विराजमान झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक आणखी चुरशीची होणार आहे. नांदगाव , मनमाड नगरपरिषदे च्या निवडणुकीत विविध पक्ष जोर लावणार असून , सत्ता कोणाकडे जाते मतदारराजा मतपेटीतून ठरवेल.
Friday, July 1, 2022
नांदगाव मध्ये आमदार सुहास कांदे समर्थकांनी केला जल्लोष
नांदगाव (प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयातील मिठाई वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी याप्रसंगी 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या , विजय असो 'एकनाथ शिंदे यांचा विजय असो..' अशा घोषणा देण्यात आल्या ‘आमदार सुहास कांदे तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ हे , यावेळी उपस्थिती माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, तेज कवडे, तालुकाप्रमुख किरण देवरे, शहराध्यक्ष सुनील जाधव , विष्णू निकम ,डॉ सुनिल तुसे, सुधीर देशमुख, प्रदीप कासलीवाल, आनंद कासलीवाल, अमोल नावंदर, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब शेवरे, नंदू पाटील, प्रमोद भाबड, सागर हिरे नितीन सोनवणे , अरुण भोसले, संतोष भोसले, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहिणी मोरे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...