Saturday, January 7, 2023

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नांदगाव तालुकाध्यक्षपदी सुरेश शेळके यांची बिनविरोध निवड,


नांदगाव / मनमाड (प्रतिनिधी)  -  नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नांदगाव तालुकाध्यक्षपदी सुरेश शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मनमाड येथे पत्रकार दिनी  पार पडलेल्या  विशेष बैठकीत शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक संजीव निकम जिल्हा कार्यकारीणी सदस्य बब्बू शेख,जेष्ठ पत्रकार बळवंत आव्हाड नरेश गुजराती यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
             नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या आदेशानुसार नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाची महत्वपूर्ण व विशेष बैठक मनमाड येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून घेण्यात आली.या बैठकीत सुरवातीला पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी आझाद आव्हाड यांनी प्रास्ताविक करत बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारिते बद्दल माहिती दिली.यावेळी बैठकीत नुतन तालुकाध्यक्ष निवडीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला जिल्हा समनव्यक संजीव निकम यांनी शेळके यांच्या नावाची घोषणा केली . मावळते अध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी नुतन अध्यक्ष सुरेश शेळके यांना पदभार दिला माझ्यावर जो विश्वास ठेवुन मला जी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली ती मी पूर्णपणे निभावेल असे मत व्यक्त केले.यावेळी किरण काळे,हेमराज वाघ,अजहर शेख,विनोद वर्मा,हेमंत गद्रे, शँकर विसपुते, मोहम्मद शेख,सचिन बैरागी,सतीश परदेशी,देशमुख, अनिल धामणे,बाबासाहेब कदम,अमोल बनसोडे,चंद्रकांत भालेराव, क्रांती आव्हाड,हिरामण मनोहर, महेश पेवाल, अविनाश पारखे,सिताराम पिंगळे,महेंद्र पगार,राजेंद्र तळेकर,भरत पाटील,ईश्वर जाधव,जगदिश अडसूळे यांच्यासह इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, January 4, 2023

संगणक परिचालक यांना सुधारीत आकृतीबंधानूसार कर्मचारी दर्जा व वेतनासाठी निवेदन,


नांदगाव (प्रतिनिधी) - काल  दि. ३ जानेवारी रोजी नांदगाव संगणक परिचालक संघटनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  खासदार डॉ.  भारती पवार यांना मनमाड येथे निवेदन देण्यात आले. तसेच नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे  यांना त्यांच्या निवास्थानी निवेदन देऊन  राज्य सरकार कडे यावलकर समितीच्या अहवालानुसार संगणक परिचालक यांचा आकृतीबंध मध्ये समावेश करण्याची शिफारस करावी असे असं निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना नांदगाव तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्ष  सोमनाथ उडकूडे सचिव  श्रीकांत जगताप ,  उपाध्यक्ष अरुण जाधव व सदस्य उपस्थित होते.

नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा,



  नांदगाव (प्रतिनिधी)   -   आज आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी मुळडोंगरी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोक नियुक्त सरपंच जनाबाई सुरेश पवार, सदस्य सतिष मोरे , चंद्रकाला पवार, गोटिराम चव्हाण, घिमाबाई बागुल, सुनिता सोनवणे, राधाबाई घुसळे ,वाल्मिक ठाकरे , वि.वि.का.सो. चेअरमन शुभम कासलीवाल, सोबतच सर्व सदस्यांचा शिंदे गटाच्या बाळासाहेबांची  शिवसेना पक्षात प्रवेश सोहळा संपन्न झाला.
   आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले, सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलतांना गावाच्या विकासासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे, आपल्या प्रत्येक अडी अडचणी मला सांगा मी सर्व सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. आपल्याला पक्षात मान सन्मान मिळेल, मतदार संघाचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे आणि प्रत्येक विकास कार्यात मी आपल्या सोबत राहील असा विश्वास आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांना दिला.
 या प्रसंगी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नुतन कासलीवाल, मिथुन पवार , बाळासाहेब कवडे, प्रमोद भाबड, जिल्हाप्रमुख किरण देवरे,रमेशभाऊ मोरे कीरण मोरे लखा चव्हाण सजंय चव्हाण भैय्या राठोड खडू राठोड रमेश चव्हाण सतोष चव्हाण दादा टेलर एन.के.राडोड , डॉ.प्रकाश चव्हाण, मुलचंद मोरे, सुनिल जाधव, सागर हिरे, संजय आहेर व ग्रामस्थ उपस्थित होते.

नांदगावात आमदार सुहास आण्णा रहेनुंमा फाउंडेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न



नांदगाव (प्रतिनिधी) -  मुस्लिम समाजातील विविध सामाजिक, शासकीय प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली रहेनुमा फाउंडेशन ची स्थापना केली आहे. याचे अद्ययावत सुविधा असलेले संपर्क कार्यालय कोर्ट गल्ली, नांदगाव येथे सुरू केले असून या कार्यालयाचे उद्घाटन आज अंजुम  सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
   रहेनुमा फाउंडेशन चे कार्याध्यक्ष रियाज पठाण यांनी उपस्थितांना फाउंडेशन चे उदिष्ट समजाऊन सांगितले, सचिव अयाज शेख यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार तळागाळातील मुस्लिम कुटुंबीयांना शासकीय योजना, कागदपत्रांच्या अडचणी, सामाजिक अडचणी सोडवता याव्या या साठी या फाउंडेशन ची निर्मिती केली असल्याचे सांगितले.
    अंजुम  कांदे यांनी बोलताना उपस्थित नागरिकांना फाउंडेशन च्या माध्यमातून सामुदायिक विवाह सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अडचणी सोडवून घ्या, महिलांना ही पुढे आणा, ज्यांना मदत पाहिजे त्यांना फाउंडेशन च्या कार्यालयात घेऊन या असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष सईद शेख, कार्याध्यक्ष रियाझ पठाण, सर चिटणीस आयाज शेख वर सदस्यांनी केले. 
        या प्रसंगी महिला आघाडी शहराध्यक्ष रोहिणी मोरे, शहर समन्वयक भारती बागोरे, उपाध्यक्ष तबस्सुम शेख, शबाना शेख माजी नगराध्यक्षा, फरजाना मॅडम, महेजबिन निहाल शेख, नगिना पठाण, रिजवाना अयाज, शबाना अक्रम शेख, अंजुम पठाण, रुक्साना खाला,शाहीन शेख, मिनाज, मुमताज आपा, साबेरा खाला, हाजी मुनव्वर, इकबाल प्रिया, मुफ्ती फहीम, भैया चव्हान सर, खलील जनाब, हाजी युसूफ जमजम,अख्तर भाई, अय्याज कुरैशी,अल्ताफ खान, अनिस मिर्झा न्यायडोंगरी, मौलाना अकील, हाफिज मन्नान साहेब, इसहाक भाई जवलकी, सय्यद सबदर,साजिद तांबोळी, असलम तांबोळी, युनूस जनाब,रफिक मुसा,हाजी रशीद, हाजी अयुब,हाजी अब्दुल रहेमान,हाजी सरफराज,सय्यद रहेनूमा कार्यकारणी मंडळ व सदस्य, सभासद, मुस्लीम समाज समन्वय समिती सदस्य असंख्य मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, January 3, 2023

नांदगाव तालुक्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण,


नांदगाव (प्रतिनिधी) -   राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या  जयंती निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नांदगांव तालुक्याच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे  पुजन करुण पुष्पहार  अर्पण  करण्यात आले. यावेळेस समता परिषदेचे पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व सर्व सामाजिक संस्थेतील पदाधिकारी इतर सामाजिक कार्यकर्ते व संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.  समता परिषदेच्या वतीने आदिवासी मतिमंद विद्यालय गंगाधरी नांदगाव येथे सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयातील विद्यार्थ्यांना अल्पोहार व शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते . यावेळी नांदगाव शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद  शेलार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहरअध्यक्ष अरूण  पाटील,  समता परिषद तालुका अध्यक्ष अशोक  पाटील ,युवक शहर अध्यक्ष मुज्जू शेख, विजुभाऊ पाटील ,संतोष  गुप्ता, दया  जुन्नरे, विलास  राजोळे, वाल्मीक टिळेकर, राजाभाऊ सावंत काका, सोळशे, सचिन  जेजुरकर,  शंकर शिंदे, दीपक खैरनार, विजुभाऊ जाधव, , सागर आहेर, वसंत सोनवणे, गोविंद जाधव, सुधाकर अण्णा निकम, बाळासाहेब देहाडराय, अरबाज शेख, फेज शेख, सलमान पठाण, मंजूर शेख , कचरू   त्रिभुवन, संजू पवार, सोमनाथ पाटील, रिंकेश जाधव, सुनील खैरनार, दत्तू खैरनार, माणिक बाविस्कर, गणेश जेजुरकर, योगेश भागवत, मंगेश आहेर, विश्वजीत जाधव, रवी बिडवे, योगेश पैठणकर, अशोक सौर, चंद्रकांत काकळीज, रोहिदास सोनवणे सर्व मान्यवर उपस्थित होते.

नांदगाव मतदार संघातील नवनिर्वाचित सर्व सरपंच व सदस्यांचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून सत्कार,



नांदगाव (प्रतिनिधी) - आज दि. ३ जानेवारी रोजी आमदार निवासस्थानी आमदार सुहास आण्णा कांदे व  अंजुमताई कांदे यांनी मतदारसंघातील सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. 
    नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यावेळी उपस्थित होते. मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी मी बांधील आहे गावातील अंतर्गत रस्ते भूमिकात गटारी ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी सभा मंडप आदींच ग्रामपंचायतच्या विकासातील महत्त्वाची काहीही कामे असल्यास मला हक्काने सांगा ते मी मार्गी लागेल असे यावेळी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मत व्यक्त केले. 
          याप्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश काका बोरसे, पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर, जिल्हाप्रमुख किरण देवरे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, योगेश (बबलू) पाटील, बाळासाहेब कवडे, डॉक्टर संजय सांगळे, किशोर लहाने, प्रमोद भाबड, आनंद कासलीवाल, राजेंद्र देशमुख, धनंजय (बाळू आप्पा) कांदे, ज्ञानेश्वर कांदे, संजय आहेर, अमोल नावंदर, अंकुश कातकडे,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता ताई बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे, अनिल तात्या रिंडे, संग्राम नाना बच्छाव, दत्तू भाऊ निकम अशोक शेवाळे, सुधीर देशमुख राजाभाऊ सांगळे, दसरथ लाहिरे, एन के राठोड, पंकज जाधव पिंटू भाऊ वडघर, आबा नाईकवाडे, विठ्ठल पगार, भागचंद तेजा, शहर प्रमुख सुनील जाधव, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, भाऊराव बागुल, अण्णा मुंढे, आदि सह मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव बस आगाराप्रमुखांना निवेदनाव्दारे मागणी,




 हिसवळ बु.  नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु. येथे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत माध्यमिक विद्यालय असून या विद्यालयामध्ये हिसवळ बु.,  शास्त्रीनगर, धोटाने खु., काळेवस्ती, तसेच परिसरातील अनेक गावांमधून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.  परंतु सकाळी १०:३० वाजता शाळा भरण्याच्या वेळेत व सायंकाळी ०४:३० वाजता शाळा सुटण्याच्या वेळेत बस नसल्याकारणाने बऱ्याच विद्यार्थ्यांना घरीच राहावं लागतं किंवा प्रयत्न करून शाळेत आल्यानंतर घरी जाण्यास लवकर गाडी मिळत नसल्यामुळे रात्री उशिरा घरी जावं लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.  प्रवास साठी विद्यार्थ्यांना एस. टी. चा रितसर पासही काढला आहे. शाळेत जाण्यासाठी  ७० मुली व ४० मुलं असे एकूण ११० विद्यार्थी आहेत. या सर्व मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा महत्त्वाचा प्रश्न असून ते शिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो. ‌‌यापूर्वी पालकांनी, स्थानिक ग्रामपंचायतींनी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आगार प्रमुख यांना वेळोवेळी विनंती केली असून, परंतु त्यांनी त्यांची कुठलीही दखल आपल्या स्तरावरून घेतली गेलेली नाही.  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी त्वरित बस सेवा सुरू करण्यात यावी. मागणी मान्य न झाल्यास  नांदगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलने छेडण्यात येतील व त्यांच्या होणाऱ्या परिणामास बस आगार  जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असा ईशारा  नांदगाव आगार प्रमुख  यांना देण्यात आला आहे. निवेदन देण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय पाटील, युवक अध्यक्ष सोपान पवार, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, सोशल मीडिया अध्यक्ष वाल्मिक टिळेकर, महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष अशोक पाटील,दत्तू पवार, दारासिंग भिडे, बाळासाहेब देहाडराय,अरूण अप्पर,डगळे सर, देशमुख सर,सनी पवार इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...