Wednesday, March 15, 2023

मांडवडमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून नांगरिकासाठी मोफत विविध सेवा,


  मांडवड , नांदगाव (प्रतिनिधी) -   आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत विविध सेवा पुरविण्यात येत आहेत. आज नांदगाव तालुक्यातील मांडवड गावात हा कॅम्प लावण्यात आला होता. २ दवाखाना, २ शासकीय सुविधा कार्यालय, डॉक्टर, सिस्टर, डोळ्यांचे डॉक्टर, सेतू प्रतिनिधी, आशा ताई, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते असा ताफा नागरिकांच्या सेवेत आज कार्यरत होता. 
   सकाळी १० वाजता उपस्थितांच्या हस्ते नारळ फोडून आजच्या कॅम्प ची सुरुवात करण्यात आली. पी.आर.पाटील सर यांनी आपल्या मनोगतात सर्व सुविधांबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली, सर्व टीम चे स्वागत केले तर आमदारांचे आभार मानले.
      मांडवड , लक्ष्मीनगर, आझादनगर तसेच मांडवड गावातील नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला.५३० नागरिकांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला तर डोळ्यांची तपासणी केली, यात ३०६ नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले यात मोठ्या संख्येने वयोवृध्द, व महिलांनी सहभाग घेतला, यात ६६ जणांना डोळ्यांची शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून लवकरच त्यांचे मोफत ऑपरेशन केले जाणार आहे. या शिवाय २६४ जणांनी सेतू सुविधांसाठी संपर्क केला. यामध्ये रेशन कार्ड संबंधित अडचणी तर निराधार योजना, पेन्शन योजनेसाठी अनेकांनी कागदपत्र जमा केली.
    मोफत आरोग्य सेवा, डॉक्टरांचा सल्ला, औषधे, डोळ्यांची तपासणी, ड्रॉप, चष्मा, सेतू सुविधांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आभार मानले. तर मांडवड येथील ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच, कर्मचारी, तसेच गावातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
डॉ.संकेत मार्कंड, डॉ.कीर्ती आहेर, डॉ. आशा जगताप, डॉ.राहुल पाटील यांनी रुग्ण तपासणी केली.
     या प्रसंगी मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड, जिल्हाप्रमुख किरण देवरे, सरपंच अंकुश डोळे, उपसरपंच विठ्ठल आहेर, अशोक निकम, योगेश आहेर, डॉ.प्रवीण निकम, सागर आहेर, सुधीर देशमुख, पी.आर.पाटील सर, भावराव बागुल, सुनील जाधव, आण्णा मुंढे, लक्ष्मी नगर सरपंच शंकर उगले, अंकुश उगले, रमेश घाडगे, कैलास आहेर, त्रंबक आहेर, सुदाम आहेर, वाल्मीक काकळीज, वाल्मीक थेटे, सर्जेराव थटे, गोरख थेटे, मच्छिंद्र निकम, रंगनाथ पिंगळे, साहेबराव गरुड, बापू हांडे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कॅम्प साठी प्रकाश शिंदे, निशांत बोडके, महेंद्र आहेर, सतीश बोरसे, गणेश खैरनार,भरत पारख, ओमकार चिकने, यांनी मेहनत घेतली .



Monday, March 13, 2023

राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार २०२३ चा सामाजिक कार्यकर्त्या संगिता सोनवणे यांना मिळाला,


नांदगाव ( प्रतिनिधी) -   नांदगाव येथील शिवकन्या  संगीता सोनवणे यांना जळगाव येथील वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर संचलित एम के व्हेंचर जळगांव आणि साहित्य सरिता मंच तर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार २०२३ मिसेस युनिव्हर्स संगीत खैरनार व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सौ सोनवणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याआधी पनवेल, मुंबई, ठाणे ,औरंगाबाद ,नांदेड, नाशिक आदी ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकतेच नांदगाव नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियानचे ब्रँड आंबेसिडर म्हणुन त्यांची नियुक्ती केली आहे.सौ सोनवणे यांना मिळालेल्या या पुरस्काराची नांदगाव तालुक्यातील जनतेसह संपूर्ण जिल्ह्यातील शिवप्रेमीनी दखल घेतली असुन सर्व थरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.सौ सोनवणे या कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात शिवपूजा हा नित्यक्रम याशिवाय अनेक गरजूंना देखील कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता मदत करत असतात.

Sunday, March 12, 2023

आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर,




    नांदगाव (प्रतिनिधी)  -  अर्थसंकल्प २०२३ मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते पूल यावर लक्ष केंद्रित करत पाठपुरावा केला असता , तब्बल २१२ कोटींची कामे मंजूर करून घेण्यात यश मिळवले.     
           नांदगाव मतदार संघातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते . तसेच अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.  पावसाळ्याच्या कालावधीत नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतूक बंद होऊन अनेक गावे व वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे रस्त्यावर पूल बांधणे रस्त्यांची सुधारणा होणे आवश्यक होते. यासाठी आमदारांनी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांचे व पुलांचे कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने नांदगाव मतदार संघातील राज्य मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची सुधारणा व पुलांच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला .त्यापैकी नांदगाव तालुक्यात ७९ कोटी दहा लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी ३२ कोटी ६५ लक्ष तर इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांसाठी ४५ कोटी ४५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघातील व मालेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १२४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. 
   रस्त्यांच्या व पुलांच्या कामांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल ने आण करण्यासाठी तसेच नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर होणार असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Friday, March 10, 2023

आरोग्यवर्धीनी केंद्र कळमदरी येथे जागतिक महिला दिन निमित्त विविध स्पर्धेंचे आयोजन,



  नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी) -   जागतिक महिला दिनानिमित्त कळमधरी महिला कर्मचारी यांसाठी रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा , संगीत खुर्ची स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व स्पर्धांचा महिलांनि आनंद घेतला विजयी स्पर्धकांस मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
    कार्यक्रमास कळमदरी सरपंच मनोज पगार,जामधरी सरपंच बाबासाहेब मोरे ,वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील ,डॉ पवार ,समुदाय आरोग्य अधिकारी वैभव पाळंदे,आरोग्य सेविका डोंगरे ,गटप्रवर्तक आहेर ,आशाताई दीपाली पाटील वर्षा शेवाळे ,संगीता विसपुते,सविता पवार,अश्विनी मोरे ,सुवर्णा देवरे वैशाली आहेर शिक्षिका सुरवसे अंगणवाडी सेविका रंजना पवार ,नलिनी पवार ,सुनीता पवार ,भारती आहेर,उषा मगर आदी उपस्थित होते.

नांदगावला शिवसेनेतर्फे विविध मागण्यांचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन,



नांदगाव (प्रतिनिधी) -  नांदगाव येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नांदगांव तालुका पक्षाच्या वतीने वाढलेले गॅस डिझेल पेट्रोल व जीवनावश्यक वस्तूंचे कमी करून शेतमालाला व कांदा कापूस यांना मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे शेती व शेतकरी याना शेतमालाला योग्य भाव मिळणे न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीमळविषयी योग्य धोरण राबवून शासनाने शेकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा पिकविम्याच्या व अनुदानाच्या थकीत रकमा शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावा. नार पार च्या डीपीआरमध्ये नांदगांव तालुक्याचा समावेश व्हावा शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत चालू करावा आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार सिद्धार्थ मोरे  याना देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता, शहर प्रमुख श्रावण आढाव, महिला आघाडी शहर प्रमुख लताताई कळमकर ,
विभाग प्रमुख अशोक चोळके ,सुरेश खेरणार ,नुरा खान ज्ञानेश्वर पवार ,समाधान इप्पर ,दिलावर इनामदार, किशोर साळवे, तेजस बोराळे दुर्गेश ठाकरे ,बाळासाहेब रसाळ आदींची उपस्थिती होती.

Friday, March 3, 2023

कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात 'पक्षीवाचवा' अभियानाला सुरुवात,



 पिंपरखेड, नांदगाव  ( प्रतिनिधी) -  आज शुक्रवारी दि. ३ मार्च  रोजी विद्यालयात 'जागतिक वन्यजीव दिनाचे' औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे 'पक्षी वाचवा' अभियानाला सुरुवात झाली. या प्रसंगी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी प्लॅस्टिकच्या डब्यापासून तयार केलेले कृतिम पाणवठे विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी सर यांचे हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात लावलेल्या झाडांच्या फांद्यांवर टांगण्यात आले. त्यात पाणी व बाजूला असलेल्या कप्प्यात पक्षांसाठी धान्य टाकण्यात आले. धान्य तेही विद्यार्थ्यांनी घरून आणले होते. सध्या नैसर्गिक पाणवठे आटले असून पाण्या अभावी पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे असे उपक्रम महत्वाचे आहेत. 
   या उपक्रमात मुख्याध्यापक  काशिनाथ गवळी सर यांच्या संकल्पनेतून २०१४ पासून ते आजतागायत म्हणजे सलग ९ वर्षांपासून चालू आहे. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी देखील अनुकरण करत आपापल्या घरी, वाडी वस्तीवर असे कृतिम पाणवठे तयार केले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांबद्दल, प्रेम, आपुलकी व जिव्हाळा निर्माण होऊन भूतदया हा सद्गुण वाढीस लागेल व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाबद्दल त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण होईल, विद्यार्थी संस्कारक्षम होतील अशी आशा मुख्याध्यापक काशिनाथ गवळी यांनी यावेळी व्यक्त केली. असा उपक्रम सर्वत्र राबवला गेल्यास येत्या काळात घटत जाणाऱ्या पशुपक्षांबाबत आशादायक वातावरण निर्माण होईल असेही ते म्हणाले. संस्थेच्या संचालक मंडळाने या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. 
    यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गोकुळ बोरसे,  संजय कांदळकर,  अलका शिंदे,  कैलास पठाडे,  उत्तम सोनवणे,  लक्ष्मण जाधव संदीप मवाळ  आबा सोनवणे ई. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

Thursday, March 2, 2023

मनमाड नगर परिषद शाळा इमारतीचे नूतनीकरणाच्या कामाची अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन,




नांदगाव , मनमाड ( प्रतिनिधी ) -   आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत नांदगाव व मनमाड शहरातील नगरपरिषद शाळा इमारतींच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
      मनमाड शहरातील विविध नगरपरिषद शाळांना भेट दिल्यानंतर शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे निदर्शनास  आले . तसेच इमारत परिसरात सुशोभीकरण करणे व उत्तम वातावरण असणे गरजेचे असल्याचे संकल्पना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे मांडली असता या विषयाची तात्काळ दखल घेत निधीसाठी पाठपुरावा केला होता. नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेत मनमाड सह नांदगावच्या नगरपरिषद शाळांना एकूण दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
    भूमिपूजन झाले असून लवकरच शाळांचे नूतनीकरण करण्यात येईल आणि स्वच्छ सुंदर असलेल्या इमारतीत शिक्षण घेण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल, असे अंजुम कांदे यांनी सांगितले.  
     विविध शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी स्वागत केले. आमदारांच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या शाळांच्या इमारत नूतनीकरणाबद्दल शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आभार मानले होते.
  याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, मनमाड शहरप्रमुख मयूर बोरसे, बांधकाम विभागाचे खैरनार शिक्षण अधिकारी चंद्र मोरे , महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्या जगताप मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल,नाझमा मिर्झा, मोहिनी राजाभाऊ अहिरे,मंदा भोसले,शाहीन शेख, सरला गोगळ, अलका कुमावत, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे,डॉ.वर्षा झाल्टे, गालिब शेख, आमीन पटेल, वाल्मीक आप्पा आंधळे, अज्जू शेख,लाला नागरे, दिनेश घुगे,गोविंद रसाळ, धिवर बाबुजी, रुपेश आहीरे, रवि खैरनार ललित रसाळ, गोकुळ परदेशी, अमजद पठाण, मिलिंद उबाळे, लोकेश साबळे, सचिन दरगुडे, आनंद दरगुडे,अजिंक्य साळी, राहुल साबळे दीपक जोरणे, विलास परदेशी , मोहसीन पठाण , मजहर खान, अरबाज शेख, निसार पठाण, चैतन्य परदेशी, जमीर शेख, आसिफ शेख, जय अहिरे, जॉनी जॉर्ज, प्रमोद अहिरे,विलास परदेशी,अज्जू पठाण,नितीन राजपूत,बाजीराव चव्हाण, अर्जुन सोनवणे ,संदीप निकम,गुलाब जाधव,आनंदा गवळी, नितीन वामने, निलेश व्यवहारे, कुणाल विसापूरकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...