नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावचे सुप्रसिध्द साहित्यिक व व्ही.जे. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कवी दयाराम दामु आहिरे (गिलाणकर)सर यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी मालेगाव तालुक्यातील गिलाणे येथील मळ्यात येथे झाला. शालेय अद्यापनाबरोबरच आपली साहित्य व नाट्यकला जोपासत नांदगाव सारख्या ग्रामीण भागात साहित्याची गोडी अनेकांमध्ये निर्माण केली. व सुरवातीला काही मोजक्या मित्रमंडळी सह साहित्यिक चळवळ साहित्यानंद च्या माध्यमातून नव्वदच्या दशकात सुरू केली. पुढे २००९ मध्ये मराठी साहित्य परिषद शाखा नांदगावची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यामुळे नांदगाव शहरात साहित्य चळवळ चांगलीच बहरत गेली. आणि अनेक कवी, लेखक यांच्या पुस्तकाची निर्मिती झाली. यासाठी डी.डी.चे योगदान मोठे आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील अनेक कवी व लेखक यांना आमंत्रित करून शहरातील श्रोत्यांना साहित्यिक मेजवानी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. व स्वतः चे "बळीच जिणं " काव्यसंग्रह तसेच "सप्तरंगी एकांकिका " हा एकांकिका संग्रह प्रकाशित केला. व इतरांनाही कविता,कथा, ललित लेख लिखाणास सतत प्रोत्साहन सरांकडुन मिळत असल्यामुळे नांदगाव शहरात साहित्य चळवळ निर्माण करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. आज त्यांच्या निधनाने नांदगाव शहरातील साहित्य चळवळ पोरकी झाली.
Tuesday, December 26, 2023
Monday, December 25, 2023
नांदगाव भाजपतर्फे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगावच्या शनि चौक येथे भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणुन साजरी करण्यात आली. स्व. अटलजी यांना अभिवादन करताना भाजपा च्या माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड. जयश्रीताई दौंड यांनी स्व. अटलजी यांच्या सोबत दिल्ली येथील संसद भवनात घडलेल्या भेटी बद्दल ची आठवण सांगितली. सदर कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय सानप, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, सोमनाथ घोंगाणे, सतीश शिंदे, मनोज शर्मा, बाबाजी शिरसाठ, ॲड. बी.आर चौधरी, संजय पटेल, महीला मोर्चा शहर अध्यक्षा अन्नपूर्णा जोशी, तारा शर्मा, ॲड. उमेश सरोदे, डॉ. बी.के आहेर, कांतीलाल पटेल, अमोल चव्हाण, धम्मवेदी बनकर, नंदु शर्मा, राजेंद्र चौधरी, देविदास शिंदे, काजल जाधव, नंदिनी निळे, स्वाती जाधव, आकांक्षा रोकडे, वंश पटाईत, संजय सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात स्व. वाजपेयीजी यांच्या प्रतिमेचे पूजन हे शहरातील जेष्ठ नागरिकांना तर्फे करण्यात आले आणि स्व. वाजपेयीजी यांच्या अजरामर कविता व जीवनातील काही प्रसंग, लोकसभेतील त्यांचे भाषण त्यांच्याच प्रखर आणि तेजोमय आवाजात ध्वनिक्षेपक द्वारे उपस्थितांना ऐकविण्यात आल्या. वंदे मातरम् , अटलजी अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमात सुशासन दिवस संयोजक ॲड. जयश्रीताई दौंड आणि सहसंयोजक ॲड. बी.आर चौधरी यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी, महीला आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले.
Wednesday, December 20, 2023
मानवी जीवनाचा संबंध हा विज्ञानाशी - अमित बोरसे, नांदगाव येथील न्यू इंग्लिश विद्यालयात ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन,
नांदगाव (प्रतिनिधी ) - विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांना सुप्त कलागुणांना वाव देणारे असून, शिक्षकांनी त्यांच्यातील कल्पनाशक्ती व संशोधक वृत्तीला चालना देऊन भविष्यातील संशोधक तयार करावेत असे आवाहन म. वि. प्र. संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील यांनी केले. ते न्यू इंग्लिश विद्यालयात आयोजित ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी संदीप दळवी होते. तर प्रास्ताविक विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष संजय बच्छाव यांनी केले.याप्रसंगी अमित बोरसे यांनी बोलताना सांगितले की, मानवी जीवनाचा संबंध हा विज्ञानाशी आला आहे. आजचे विज्ञान प्रदर्शन हे महान शास्त्रज्ञांना आदरांजली ठरेल. अब्दुल कलाम हे अतिशय गरीब परिस्थितीतून आले आहेत. देशासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. आई - वडिलांनी विद्यार्थीच्या कला गुणांना वाव दिला पाहिजे. तालुक्यातील सर्व संस्थांनी एकत्र येवून विद्यार्थ्यांना एक वेगळे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत..
व्यासपीठावर गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, पोलीस उपनिरीक्षक खडांगळे, पत्रकार अनिल आव्हाड, संजय मोरे, विस्तार अधिकारी नंदा ठोके, न. पा. प्रशासन अधिकारी प्रशासन अधिकारी एन. एम. चंद्रमोरे, जिल्हा विज्ञान अध्यापक संघ कार्यवाहक अरुण पवार, स्कूल कमिटी अध्यक्ष दिलीप देवचंद पाटील, विजय काकळीज, राजाराम गवांदे, मुख्याध्यापक डी. व्ही. गोटे, मुख्याध्यापक
मुख्याध्यापक वाय चव्हाण, मुख्याध्यापिका जे. आर .काळे, मुख्याध्यापिका एस. एस. कांबळे, मुख्याध्यापक योगेश पाटील, जी. ए .वैद्य, पी .एन खुटे, आयोजक अविनाश शेवाळे, सी. डी .अहिरे, उमेश पाटील, निलेश इप्पर, सुनील कोठावदे, भाऊसाहेब सोनवणे, अजित पगार, आत्माराम बोरसे, बाबूलाल ठोंबरे, प्रवीण ठोंबरे आदींची उपस्थिती होती.
नांदगाव महाविद्यालयात विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन,
( छायाचित्रकार - सुहास पुणतांबेकर )
नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ च्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन माजी नांदगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर कवडे यांच्या शुभहस्ते सकाळी अकरा वाजता संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा. डॉ.एस.एन. शिंदे यांनी केले. आपल्या मनोगतातून महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या कक्षा रुंदावल्या जात असल्याची माहिती दिली. नगरसेवक चंद्रशेखर कवडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अमित बोरसे यांनी विविध उदाहरणे देऊन एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थी कसा घडला जातो याची जाणीव करून दिली व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एस .आर. जाधव यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी दिलीप पाटील, कैलास पाटील , विठ्ठल दादा आहेर, सुदामराव काळे, रमेश अण्णा बोरसे, डॉ. प्रवीण निकम,अरविंद पाटील, राहुल पवार, प्रवीण सोमासे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व साहित्य पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.के. पवार व आभार प्रदर्शन प्रा. डी वाय आहेर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर.टी. देवरे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर वृंदांनी परिश्रम घेतले.
Saturday, December 16, 2023
नांदगावच्या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण तीनदिवसीय व्याख्यानमालेची सांगता,
( छायाचित्रकार- सुहास पुणतांबेकर)
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे तीनदिवसीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला पार पडली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. शामकुमार दुसाने (नाशिक) यांनी 'आरोग्यावर बोलू काही...' या विषयाने गुंफत आरोग्याची निगा दैनंदिन जीवनात सहज-सोप्या पद्धतीने कशी राखली जाईल या विषयावर प्रकाशझोत टाकला. डॉ.बी.बी.आहिरे (लासलगाव) यांनी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प 'आपत्ती व्यवस्थापन...' या विषयावर चर्चा करत गुंफले. प्रा. राजाराम मुंगसे यांनी 'रसास्वाद...' या विषयाने व्याख्यानमालेची सांगता करताना साहित्यातील नऊ रस दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने कायम सामील असतात याचे विश्लेषण केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे बहि:शाल शिक्षण मंडळ आणि मविप्र समाजाचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्र कार्यवाह प्रा.एस.पी.भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रवीण शार्दूल, प्रा.पूजा जाधव, प्रा.योगेश वाघ यांनी केले. आभार डॉ.भारती धोंगडे यांनी मानले. व्याख्यानमाले प्रसंगी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नांदगाव शहरातील विवेक गोदावरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग , जनरल सर्जरी तपासणी शिबिर संपन्न,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे काल शनिवारी दि. १६ रोजी विवेक /गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदगाव तसेच एसएमबीटी हॉस्पिटल धामणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग व जनरल सर्जरी तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले . विवेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे १२५/१३५ लाभार्थीनी शिबिरामध्ये ज्यांना गुडघेदुखी, खांदेदुखी, खांदा वारंवार निसटणे, दुर्बिणीद्वारे गुडघ्यांचे आणि खांद्यांचे सर्व स्नायूवरील शस्त्रक्रिया तसेच हर्निया, हायड्रोसील, आतड्यांच्या शस्त्रक्रिया, स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स व मूळव्याध या सर्व आजारांवर लागणाऱ्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत लाभ घेतला.
मोफत नाव नोंदणी व अल्प दरात एक्स-रे आणि सोनोग्राफी करण्यात आल्या. या शिबिरात विवेक गोदावरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. सुनील तुसे, डॉ.हर्षद तुसे सर ( स्रिरोग तज्ञ), डॉ.शशांक तुसे सर(हृदयरोगतज्ञ),
डॉ. शुभम इल्ले (ऑर्थो तज्ञ एसएमबीटी),
डॉ.पूजन बच्चूका (सर्जन तज्ञ एसएमबीटी),
रफीक शेख सर (टी.एल.नांदगांव तालुका),
शोएब मंसूरी (नांदगांव ता.एसएमबीटी प्रतिनिधि)
, संदीप पाचोरकर (चाँदवड ता. एसएमबीटी प्रतिनिधि) यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Tuesday, December 12, 2023
नांदगावच्या शनि चौक येथे भाजपतर्फे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी,
नांदगाव (प्रतिनिधी ) - भाजपचे दिवंगत लोकनेते व भारताचे तत्कालीन केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती नांदगाव शहरातील शनी चौक येथे साजरी करण्यात आली. भाजपतर्फे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे औक्षण करून व त्यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा च्या जेष्ठ नेत्या ॲड. जयश्रीताई दौंड यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्व. मुंडे साहेब हे अडचणींच्या काळात सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि कशा प्रकारे मदत केली याची त्यांनी प्रचिती सर्व उपस्थितांना सांगितली. आपण सर्वांनी त्यांची शिकवण अशीच अविरत ठेवत सर्वांना सहायता करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष(उत्तर) गणेश शिंदे व भाजपा शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर यांनी प्रतिमेचे पुजन केले.
या कार्यक्रमास किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे, अनु. जाती जिल्हा अध्यक्ष बाबाजी शिरसाठ, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, शहर उपाध्यक्ष दिपक पाटील, शहर सरचिटणीस सतिश शिंदे, सोमनाथ घोंगाणे, राजेंद्र गांगुर्डे, मनोज कासलीवाल, ॲड. मनिषा पाटील, महीला मोर्चा शहर अध्यक्षा अन्नपूर्णाताई जोशी, उपाध्यक्षा ताराताई शर्मा, संजय पटेल, व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष गणेश शर्मा, ओबीसी शहर अध्यक्ष दिनेश दिंडे, रविंद्र सानप, कोषाध्यक्ष धम्मवेदी बनकर, अक्षदा कुलकर्णी, योगिता आहेर, अमोल चव्हाण, रविंद्र कवडे, यश सेठी, कमलेश जाधव, सतिश आहिरे, सुरेश कुमावत, सोमनाथ दुसाने, उत्तम आमले, सुरेश महाले, देविदास शिंदे, अनिल महाले, रामआसरे कहर, जबीन बानो मणियार, मनिषा पाटील, लक्ष्मी सोळसे, ज्योती गाढे, जयश्री भाईजे, उषा आहेर, गीता मोरे, विमलबाई मोरे, मंगल बोडखे, उज्वली मोरे, सुवर्णा मोरे, माया रोकडे, काजल जाधव, स्वाती जाधव, संगीता कटारे, भारती निकम, निकिता आहिरे, भावना पानपाटील, शितल बोराळे, कमलबाई बोरसे आदींनी प्रतिमेचे पुजन केले.
Subscribe to:
Posts (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे माघारीनंतर युतीचं ...