Monday, February 19, 2024

मांडवड येथे शिवजयंती उत्साहात साजरी, लेझिम नृत्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण,





मांडवड (प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे म.वि.प्र.समाजाचे स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड येथे "शिवजयंती" मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रशांत आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
       त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवरायांची आरती आयोजित करण्यात आली होती.क्रीडा शिक्षक संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी केलेल्या लेझीम नृत्य सर्वांसाठी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले होते. लेझीम पथकाद्वारे छत्रपती शिवरायांच्या वेशभूषे मध्ये मध्ये इयत्ता दहावीचा विद्यार्थी श्रेयस निकम तर जिजाऊंच्या वेशभूषेत इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी सिद्धी उगले ही होती. लेझीम नृत्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी केसरी रंगाचे फेटे बांधून गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी शालेय स्कूल कमिटी सदस्य रामराव मोहिते, वाल्मीक थेटे,सर्जेराव थेटे, दिलीप आहेर,अशोक निकम, बापूसाहेब आहेर,सिताराम पिंगळे तसेच पालक वर्गातून सागर आहेर,सुखदेव थेटे, दत्तात्रय थेटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे एस. एस. यांनी केले. या कार्यक्रमासाठी मविप्रचे संचालक अमित बोरसे तसेच गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठल आहेर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.


पिंपरखेड येथील विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी






पिंपरखेड ( प्रतिनिधी ) - पिंपरखेड येथील कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात करण्यात आली. या विद्यालयात सकाळी ठीक ८ वा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल बोरसे तर प्रमुख अतिथी म्हणून के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे भाऊसाहेब संजय मवाळ उपस्थित होते. सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच सर्वांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली. प्रसंगी ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या विचारातून आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी सर, उपशिक्षक संजय कांदळकर,श्रीमती अलका शिंदे, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, संदीप मवाळ, आबा सोनवणे, ग्रामस्थ मधुकर घोटेकर, नाना तांदळे, दादा जाधव, मुरली आहेर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कांदळकर यांनी केले तर आभार उत्तम सोनवणे यांनी मानले.

Saturday, February 17, 2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदगाव तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात यांची नियुक्ती,





नांदगाव ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशाने नांदगाव तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दि.१६ फेब्रुवारी राेजी पुढील प्रमाणे नवीन नांदगाव शहरातील नियुक्त करण्यात आल्या आहेत . नांदगाव शहर उपाध्यक्ष कुणाल सौंदाणे, नांदगाव शहर सचिव चेतन पेंढारकर, नांदगाव शहर संघटक पप्पू सोनवणे, नांदगाव शहर सहसंघटक किरण खंबायते, नांदगाव शहर सहसंघटक विष्णू लकडे, नांदगाव शहर विभाग अध्यक्ष उमेश जेजुरकर, यांच्या नियुक्ती करण्यात आल्या ‌. या बैठकीस शहराध्यक्ष अभिषेक विघे 
 , मनसे महिला अध्यक्षा रेखा शेलार मनसे उपस्थित होते . यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Tuesday, February 13, 2024

एच. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे टॅलेंट हंट परीक्षेत यश,




नांदगाव (प्रतिनिधी) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तिन्ही जिल्ह्यांतून १००० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांचा रविवारी दि. ११ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत नांदगाव शहरातील एच.आर. हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांनी अव्वल शंभर क्रमांकावर नांव कोरले आहे. यात स्वलेहा शेख सलीम, मारिया साजिद तांबोळी, इक्रा रियाजुद्दीन , अनैका मोहसीन खाटिक, मुनिझा वसीम शेख, आयेशा अकबर खान अशा विद्यार्थ्यांची नावे आहेत. सहा विद्यार्थ्यांमध्ये स्वालेहा सलीम शेख ही टॉपर असुन,  तिला ११०० रुपये रोख , पदक प्रदान करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्यात एच.आर. हायस्कूलचे सईद सर , सज्जाद सर उपस्थित होते.

Sunday, February 11, 2024

नांदगाव येथे मराठा समाजाचे बेमुदत आमरण उपोषण,





नांदगाव ( प्रतिनिधी) - तब्बल ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि मराठा समाज बांधवांची साडेतीनशेच्या वर बळी गेल्यानंतर अखेर मराठा आरक्षण संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या खडतर संघर्षानंतर अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले. या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी . यासाठी सकल मराठा समाज नांदगाव तालुक्याच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण काल शनिवारी दि. १० फेब्रुवारी पासून भास्कर झाल्टे व विशाल वडघुले यांनी सुरू केले आहे. या बेमुदत आमरण उपोषणकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मनोज दादा जरांगे पाटलांच्या सभेत हृदयविकाराच्या झटक्याने तांदूळवाडीचे कै.दादासाहेब पुंडलीक काळे यांचे दुःखद निधन झाले . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हे बेमुदत आमरण उपोषण सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी सकल मराठा समाज बांधवांना जाहीर आवाहन केले की, या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विधानसभेच्या व विधान परिषदेच्या मराठा आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी . यासाठी मराठा समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातील विद्यमान आमदारांना फोन कॉल करून किंवा मेसेज पाठवून या अधिवेशनात मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडावे. तसेच या शेवटच्या अंतिम निकराच्या लढाईत मोठ्या संख्येने सामील होऊन हा लढा यशस्वी करावा ज्या समाज बांधवांना या बेमुदत आमरण उपोषणात सहभागी व्हायचे असेल . त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा . याप्रसंगी किरण जाधव,महेंद्र जाधव, विष्णू चव्हाण,गणेश काकळीज,ज्ञानेश्वर कवडे,सजन तात्या कवडे,विजय पाटील,निवृत्ती खालकर,गणेश सरोदे आणि भिमराज लोखंडे उपस्थित होते.

Saturday, February 10, 2024

आमदार सुहास कांदे यांच्या मध्यस्थीने साकोरा नवीन जल योजनेसाठी तात्काळ वीज पुरवठा देण्याचे आदेश,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मध्यस्थीने साकोरा नवीन पाणी योजनेसाठी वीज वितरण कंपनीचे तात्काळ वीज पुरवठा देण्याचे आदेश काढलं आहे. जलजीवन योजनेअंतर्गत गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली आहे. मात्र मागील थकबाकी मुळे वीजपुरवठा मिळत नसल्याने ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट कोसळल्याने त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे कैफियत मांडताच ; तत्काळ वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने साकोरा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
      तालुक्यातील साकोरा गावासाठी यापूर्वी असलेल्या एका पाणी योजनेची वीज थकबाकी प्रलंबीत आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी या गावासाठी जल जीवन योजनेअंतर्गत सुमारे ४ कोटी ९२ लाख रुपये किमतीची योजना गिरणा धरणातून मंजूर करून आणली.आजमितीस ते काम पूर्ण झाले आहे.मात्र मागील थकबाकी भरल्याशिवाय नवीन योजनेस वीज पुरवठा देणार नाही,अशी भूमिका वीज वितरण कंपनीने घेतल्याने साकोरा ग्रामस्थांनां पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.
      या संतापातून ग्रामस्थ,महिला,या सर्वच घटकांनी या पाणी टंचाई विरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.तेव्हा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या मध्यस्थीने सदर ग्रामस्थांनी आ.सुहास कांदे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. तेव्हा आ.कांदे यांनी ग्रामस्थ व वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता वाटपाडे यांची बैठक घेऊन पाणी टंचाई ची सद्यःस्थिती विषद केली.
      आमदार सुहास कांदे यांनी सदर थकबाकी ग्रामपंचायतीने हप्ते करून भरून टाकावी.असे आवाहन केल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन तयार झाले.तेव्हा आमदारांच्या या मध्यस्थीनंतर नवीन योजनेसाठी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा देण्याचे मान्य केले.व तसे मंजुरीचे पत्र ही दिल्याने साकोरा वासियांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले आहेत.

Friday, February 9, 2024

नांदगाव मध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टी कामांची आमदार सुहास कांदे यांच्याकडून पाहणी,




 नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे साकार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टी च्या कामाची पाहणी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केली.  आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव शहरात निर्माण होत असलेल्या शिवसृष्टी चे कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. नांदगाव शहरातील जुने पंचायत कार्यालय येथील जवळपास अडीच एकर जागेवर विशाल अश्वारूढ पुतळ्यासह शिवकालीन शिवसृष्टी निर्माण होत आहे. आमदार सुहास आण्णा कांदे स्वतः जातीने या कामात सतत लक्ष घालताना दिसून येतात.  सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह त्यांनी शिवसृष्टी च्या सुरू असलेल्या कामावर जाऊन पाहणी करून आढावा घेतला.  

      अडीच एकर जागेवरील शिवसृष्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी ठरणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची २९ फुटी असून चौथाऱ्यासह ४६ फुट इतकी आहे. तसेच शिवसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य शिव-प्रेमींना अनुभवायला मिळणार असून या शिवसृष्टीमध्ये विविध माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या कथा पाहायला वाचायला व अनुभवायला मिळणार आहे.यात महाराजांची जीवन कथा भिंतीवर साकारली जाणार आहे. शिव संग्रहालयाच्या माध्यमातून शिवकालीन हत्यारे शिवकालीन वस्तू पाहायला मिळणार आहे, यामुळे भावी पिढीला स्वराज्याचा इतिहास जवळून पाहता येईल आणि समजून घेता येईल. शिव वाचनालय यामध्ये शिवकालीन ग्रंथ वाचायला उपलब्ध करून दिले जाणार आहेत . यासह शिवसृष्टी पाहायला येणाऱ्या शिवप्रेमी साठी येथे शिवभोजनालयाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. यानंतर शिव चित्रपटगृह या संकल्पनेच्या माध्यमातून एक मिनी थियटर या ठिकाणी असणार आहे या शिव चित्रपटगृहात ऐतिहासिक चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे शिवसेनेचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी, चोळके साहेब, सदर कामाचे ठेकेदार यांच्यासह माजी आमदार संजय पवार, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील, फरहान दादा खान, उपजिल्हा प्रमुख महेंद्र दुकळे, राजेंद्र देशमुख, नंदू पाटील, सागर हिरे, प्रकाश शिंदे, प्रमोद भाबड, सुनील जाधव, शशिकांत सोनवणे,अय्याज शेख रोहित काकळीज, मंदार ढासे, आदीसह नागरिक उपस्थित होते. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सदर कामाची पाहणी करून कामाबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...