Tuesday, April 29, 2025

नांदगाव येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा समस्त मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त करत निवेदन,








नांदगाव (प्रतिनिधी) - जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरण येथे निष्पाप २८ पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळाबार करून त्यांना ठार मारले. या घटनेचा निषेध म्हणून आम्ही नांदगाव येथील समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने नांदगाव येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोकसंतप्त झाला असून, या घटनेमुळे सर्व भारतीयांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. आम्ही ही सर्व या दु:खात बरोबरीने सहभागी आहोत. आणि निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवित आहोत. या देशात कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. केंद्र व राज्य शासनाने याबाबतीत कठोर पाऊले उचलत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद ठेचून काढावा. आम्ही सर्व देशहितासाठी सर्व भारतीयांच्या व सरकारच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभे आहोत. पोलिस प्रशासनाकडे निवेदन देताना यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. 

Monday, April 28, 2025

नांदगाव येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिस प्रशासनाकडे निवेदन,






नांदगाव (प्रतिनिधी ) - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगावला सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (दि.२८) रोजी पुकारण्यात आलेला नांदगाव बंद उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील छोट्या मोठ्या व्यापारी बांधवांनी दूकाने बंद ठेवून उस्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. पोलिसांना निवेदन देत घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. भारताचा मुकूट असलेल्या जम्मू काश्मिर येथील पह‌ल‌गाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप हिन्दू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला. हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर भारत सरकारने देऊन दहशतवादाचा समूळ नायनाट करावा अशी मागणी करण्यात आली. 
नांदगाव शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने ह्या हल्ल्याचा जळजळीत निषेध करण्यात आला . येथील हुतात्मा चौकात पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात येवून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. ह्या हल्ल्याचा प्रतीशोध भारत सरकारने कठोर कार्यवाही करून घ्यावा आशयाचे निवेदन सकल हिंदू समाजच्या वतीने नांदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना देण्यात आले. यावेळी शहरातील सकल हिंदू समाज, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Wednesday, April 16, 2025

'भटक्या - विमुक्त विकास समिती' च्या अध्यक्षपदी झाल्याने नांदगावचे आमदार सुहासअण्णा कांदे यांचा सत्कार,





नांदगाव (प्रतिनिधी) - नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघांचे लोकप्रिय आमदार सुहासअण्णा कांदे यांची महाराष्ट्र शासनाच्या 'भटक्या - विमुक्त विकास समिती' च्या अध्यक्षपदी नुकतीच सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या 'भटक्या - विमुक्त विकास समिती'च्या अध्यक्षपदाला राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. आमदार सुहासअण्णा कांदे हे 
'राष्ट्रीय सरपंच संसदे'चे जिवलग स्नेही आहेत.
१५ एप्रिल  रोजी 'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट' अंतर्गत स्थापित 'राष्ट्रीय सरपंच संसदे'च्या वतीने आमदार सुहासअण्णा कांदे यांचा नांदगाव येथे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.  'एम आयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'चे प्रणेते राहुल कराड यांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
   'राष्ट्रीय सरपंच संसदे'चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील व सहसमन्वयक प्रकाशराव महाले यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व 'एमआयटी विश्वशांती घुमटा'ची प्रतिमा देऊन हा सत्कार संपन्न करण्यात आला.
'राष्ट्रीय सरपंच संसदे'चे नांदगाव तालुका अध्यक्ष व नांदगाव कृउबाचे संचालक समाधान पाटील,नांदगाव तालुका समन्वयक व नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार,नांदगाव तालुका संघटक व पत्रकार राजेंद्र तळेकर,नांदगावचे माजी नगराध्यक्ष चेतन पाटील,नांदगाव तालुका भाजपा अध्यक्ष गणेश शिंदे,भालूरचे समाधान थेटे,भालूरचे उपसरपंच गणपत निकम,ग्रामपंचायत सदस्य रमेश निकम.देविदास निकम, राजेंद्र मेंगाळ,गंगाधरी चे सरपंच सचिन जेजुरकर,रामनाथ चोळके,ग्रामपंचायत बोराळेच्या लोकनियुक्त सरपंच सौ.अश्विनीताई राजेंद्र पवार,उमेश काळे,पत्रकार संजीव धामणे,बाबासाहेब कदम व सचिन बैरागी हे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
'राष्ट्रीय सरपंच संसदे'च्या विविध उपक्रमांविषयी याप्रसंगी चर्चा झाली.
    'राष्ट्रीय सरपंच संसदे'च्या वतीने नांदगाव तालुक्यात दोन दिवशीय 'नाशिक जिल्हा - सरपंच संसद' आयोजित करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.सुहासअण्णा कांदे यांनी त्या आयोजनासाठी पूर्ण सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.
नांदगाव तालुक्यातील सर्व विद्यमान सरपंचांसह सुहास अण्णा कांदे यांनी पुणे येथे ' एमआयटी' सदिच्छा भेट देण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
योगेश पाटील व प्रकाशराव महाले यांचे श्री.सुहासअण्णा कांदे यांनी प्रारंभी सत्कार करून स्वागत केले.

Sunday, April 13, 2025

कुटुंबातील महिला निरोगी तर संपूर्ण कुटुंब निरोगी : डॉ . काजल तुसे






नांदगाव (प्रतिनिधी) - ज्या प्रमाणे मराठीत म्हण आहे, "मुलगी शिकली ,प्रगती झाली" त्याप्रमाणे घरातील कुटुंब प्रमुख महिला निरोगी तर संपूर्ण कुटुंब निरोगी ही म्हण प्रचलित करण्याची गरज आहे . विशेषतः घरकाम करता करता बाहेरील नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांनी विषेश काळजी घेणे गरजेचे आहे.  त्यानी स्वतः उत्तम आहार व्यायाम आणि आराम करणे गरजेचे आहे. कारण कुटुंबातील महिला निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहील असे स्पष्ट मत डॉ काजल तुसे यांनी व्यक्त केले.  आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज,  महात्मा ज्योतिबा फुले,  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले व महिलांनी विशेष काळजी घ्यावी . स्वतःसाठी जगावे कारण घरातील महिला जशी असेल तसेच घरातील व्यक्ती व घरातील मुलांवर संस्कार असतात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष सौ संगिता सोनवणे या होत्या.
                 नांदगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त जयंतीनिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. काजल तुसे बोलत होत्या.  यावेळी संस्थेच्या सचिव आशाबाई काकळीज यांच्यातर्फे त्यांचा संविधान उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच डॉ. तुषे यांच्या हस्ते संविधान उद्देशिका देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.महिलांचे एवढे मोठे संघटन व कार्य बघुन डॉ. तुषे यांनी कौतुक केले. संस्थेच्या अध्यक्ष सौ. संगिता सोनवणे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देतांना सांगितले की सध्या देशातील वातावरण बघुन आम्ही सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करून त्यांचे विचार जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.तसेच महिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले.यावेळी महिलांनी देखील आपल्या अडचणी सांगुन मत व्यक्त केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा काकळीज , सरला मोढे,  वंदना बहिकर, रत्ना सोनवणे, शोभा भोसले, तबसूम शेख,तारा निकम,  जोती मोरे, संगीता मोकळ, अलका आयनोर यांच्यासह ग्रामीण भागातील महिलांनी परिश्रम घेतले.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ग्रहउपयोगी वस्तू सेटचे सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते वाटप,






नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांना कामगार सुविधा केंद्र केंद्र सुरू करण्यात आले असून,  या सुविधा केंद्राच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांना सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भांड्याचे सेटचे वाटप करण्यात आले. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातून नोंदणीकृत कामगारांना ग्रह उपयोगी वस्तूचा संच भांडी वाटप करण्यात आले. तालुकास्तरावर बांधकाम मजुरांसाठी सुविधा केंद्र सुरू झाल्याने बांधकाम मजुरांची सोय झाली आहे‌‌. आमदार सुहास कांदे यांच्या मागणीनंतर कामगार विभागाने तालुका निहाय हे केंद्र सुरू केल्याने कामगारांची होणारी गैरसोय आता दूर झाली आहे ‌या आधी नाशिक तसेच मालेगाव येथील बांधकाम नोंदणी सुविधा केंद्रात मोठी गर्दी होत होती . जिल्ह्यातील एकाच ठिकाणी भांडे वाटपासाठी दिवस दिवस थांबावे लागत असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता.  मात्र आता तालुका निहाय ग्रह उपयोगी भांडी वाटप केंद्र सुरू झाल्याने मजुरांची होणारी गैरसोय थांबण्यास मदत होणार आहे.  नांदगाव सेतू कार्यालयात पंधरा दिवसात एक हजारापेक्षा अधिक बांधकाम कामगारांनी आपले नूतनीकरण केले असून तसेच नवीन नोंदणी झालेल्या प्रत्येक कामगारांना सेफ्टी किट व नूतनीकरण झालेल्या कामगार कुटुंबांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले . यावेळी समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे, संगीता बागुल, खुशाली सोनावणे, नेहा खटके, युवासेना तालुकाध्यक्ष सागर हिरे , प्रकाश शिंदे,  सुनील जाधव , प्रशांत पगार,  सेतू केंद्रचालक रवींद्र खैरनार, सोनू रौंदळ, देव गोसावी, दिनेश बच्छाव, हेमंत शेवाळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


नांदगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार - आमदार सुहास अण्णा कांदे





नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे भीमजयंतीच्या पूर्वसंध्येला (रात्री १२ वाजता) आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यांनी मागील वर्षी आंबेडकरी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला. लवकरच या स्मारकाचे काम सुरू होणार असून , प्रत्येकाला अभिमान वाटेल असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आपण बांधू असा विश्वास आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दिला.
  स्मारकाची परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा ही तयार आहे. सदर पुतळा १४ एप्रिल निमित्ताने आंबेडकर अनुयायी तसेच जनतेला अभिवादनासाठी दोन दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. एखाद्या महिन्यानंतर या स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, समाजातील प्रत्येक व्यक्तीला विश्वासात घेऊन स्मारक बांधले जाईल, आपल्याला जी डिझाईन योग्य वाटेल ती सुचवा आपण तसेच स्मारक या ठिकाणी बनवणार असेही यावेळेस आमदार सुहास आण्णा कांदे कांदे यांनी सांगितले. 
"जयंती निमित्त उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या".
   यावेळी नांदगाव शहरातील विविध जयंती उत्सव समिती अध्यक्षांच्या वतीने अण्णांचा सत्कार करण्यात आला. तसेच समस्त आंबेडकरी जनता च्या वतीने ही अण्णांचा सत्कार करण्यात आला. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सन्माननीय भंतेजी यांना चिवरदान भेट दिले. या प्रसंगी मोठ्या संख्येने भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...