नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे क्रीडा दिनानिमित्त व्ही.जे हायस्कूलमध्ये शुक्रवारी दि. २९ ऑगस्ट रोजी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा सत्कार शाळेकडून करण्यात आला. यावेळी दि. २० रोजी झालेल्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन ७२ एन डी ठाणे स्टेट सीनियर चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेमध्ये राज्यपातळीवर खेळून व वूशु गेम्स मध्ये आपल्या शाळेचे व पालकांचे नाव उज्वल करणारी हुमेरा असलम पठाण या विद्यार्थिनीचा व तिचे वडील असलम पठाण आणि आई नौशिन पठाण यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . या विद्यार्थिनीच्या यशामध्ये सिंहाचा वाटा घेणाऱ्या व्ही .जे हायस्कूलच्या क्रीडाशिक्षिका सुनीता देवरे मॅडम यांनी विद्यार्थिनी मध्ये असलेली खेळाची आवड ओळखून तिला योग्य ते मार्गदर्शन करून चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थिनीला घडविले त्याबद्दल असलम पठाण व नौशिन पठाण यांनी क्रीडा शिक्षिका सुनीता देवरे मॅडम यांचे आभार मानले. यावेळी प्रमुख पाहुणे एडवोकेट गोरखनाथ बलकवडे-छत्रपती पुरस्कार विजेते कुस्तीगीर भगूर, सौ . मंगल शिरसाठ फिटनेस कोच, योगेश शिरसाठ राज्यस्तरीय पहिलवान, कु.समीक्षा पवार राज्यस्तरीय पहिलवान, कु.नारायणी जोशी राज्यस्तरीय पहिलवान, शाळेचे माजी कुस्तीपटू उपमुख्याध्यापक डॉक्टर जोगेश्वर नांदुरकर, क्रीडा शिक्षिका श्रीमती सुनीता देवरे, डीएम बोर्ड सदस्य शिक्षिका प्रतिनिधी सौ रुपाली झोडगेकर तसेच शिक्षक व कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
Saturday, August 30, 2025
Sunday, August 24, 2025
नांदगाव येथे जमियत उलमा- ए -हिंद ची नूतन कार्यकारणी जाहीर, सेवाभावी वृत्तीने एकजुटीने काम करण्याचं संकल्प व्यक्त !
नांदगाव ( प्रतिनिधी) - संपूर्ण भारतात राष्ट्रीय पातळीवर काम करणारी स्वातंत्र्यपूर्व काळातील जमियत ए उलमा हिंद या सामाजिक संस्थेच्या नांदगाव शाखेची नूतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया नुकतीच मस्तानी अम्मा दर्गा मस्जिद मध्ये पार पडली. मालेगाव येथील जमियत शाखेचे प्रमुख मौलाना आसीफ शाबान, कारी अखलाक जमली, हाफीज अनिस अझहर, हाफीज अब्दुल अजीज,मौलाना हसन, आरिफ भाई यांच्या उपस्थितीत अत्यंत शांततेत आणि पारदर्शकतेने असंख्य मुस्लिम समाज बांधवांच्या उपस्थितित निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मतदार प्रक्रियेतून सर्व स्थानिक उपस्थितांचे मत जाणून घेऊन मागचीच कार्यकारणी कायम ठेवून त्यात अल्पशा बदल करून नविन तडफदार तरुण नेतृत्व आयाज भाई शेख तसेच हाजी लतिफ ( सुपर ) यांची सर्वांच्या आग्रहाने व एकमताने निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारणी तथा सदस्यांनी नव्या जोमाने समाज व राष्ट्रहितासाठी , सेवाभावी वृत्तीने एकजुटीने काम करण्याचं संकल्प व्यक्त केला. देशाच्या उन्नती, कल्याण, एकोप्यासाठी शेवटी दुआ केली.
* नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे -
अध्यक्ष (सदर) - मौलाना अकील मिल्ली साहेब
उपाध्यक्ष (नायब सदर) :- मुफ्ती फहीम शेख आसीफ
हाफीज अब्दुल मन्नान साहेब
हाजी मुनव्वर खान साहेब
हाजी सईद शेख (लस्सीवाले)
जनरल सेक्रेटरी :- सय्यद जावेद अहमद अली
जॉइंट सेक्रेटरी - हाजी अब्दुल लतिफ सुपर
अक्रम अस्लम मोमीन
खजिनदार :- हाजी जहांगीर बाबु मुनाफ (महाराष्ट्र पान स्टॉल)
सदस्य :-
हाफीज अशफाक
सय्यद गुलामनाबी
अब्दुल जब्बार हनिफ शेख
अमजद खान
वसीम खान पठाण
इम्तियाज मो. हनिफ शेख
बाबा काझी
वसीम काझी
इम्तियाज शेख
Wednesday, August 20, 2025
नांदगाव तालुका फोटो ग्राफरचा वर्ल्ड फोटो ग्राँप्री डे सेलिब्रेशन उत्साहात साजरा
नांदगाव (प्रतिनिधी) - फोटो ग्राफी हा एक सर्वच ठिकाणी एक महत्त्वाचा भाग आहे. मग तो कोणताही कार्यक्रम असो. फोटो ग्राफर हा दु:खालाही हसविण्याचे काम करत असतो. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या जीवनातील आहे. मी लहान असताना सायकलवरुन पडलो. पायाला वेदनादायी जखम झाली पण अश्या दुखातही फोटोग्राफर माझा फोटो काढु लागताच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. असे जिल्हा शिवसेना (शिंदे गट) युवा नेते फरहान खान यांनी नांदगाव येथे नांदगाव तालुका फोटो ग्राफर असोसिएशन च्या वर्ल्ड फोटोग्राफी डे सेलिब्रेशन २०२५ च्या गुप्ता लाॅन्स, मालेगाव रोड नांदगाव येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी या संघटनेला त्यांनी यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मा.नगराध्यक्ष नांदगाव नगरपरिषदचे अध्यक्ष राजेश कवडे, मार्गदर्शक रोशन ठाकूर,पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, फोटो ग्राफी असोसिएशन चे अध्यक्ष अनिल शिंदे, सागर हिरे,संजय सानप, पत्रकार संजीव निकम, संजीव धामणे, बब्बुभाई शेख, मारुती जगधने, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी फोटोग्राफी ही बातम्या साठी किती महत्वाची आहे व पुर्वी किती महतप्रयासाने बातमी साठी धडपड करावी लागत होती याचे उदाहरण देऊन आज फोटोग्राफी क्षेत्राने फारमोठी प्रगती केली आहे तरीही या क्षेत्रात अपडेट राहाण्याचा सल्ला जेष्ठ पत्रकार संजीव निकम यांनी शुभेच्छा देताना सल्ला दिला. तर हाच धागा पकडून संजीव धामणे यांनी पुर्वी फोटो काढायचा म्हणजे बागुलबुवाच्या घरात जावे लागत असे प्रचंड मेहनत घेऊन फोटो काढला जात असे पण आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या क्षेत्रात प्रगती झाली त्यामुळे बातमी साठी सहज फोटो आता उपलब्ध होत आहेत सर्व फोटो ग्राफर असोसिएशनला यावेळी शुभेच्छा दिल्या व संघटनेमुळे एकीचे बळ निर्माण झाले त्यामुळे अधिक विकास होण्यास मदत होईल असे त्यांनी प्रतिपादन केले. तर यावेळी राजेश कवडे व पत्रकार बब्बुभाई शेख यांनी ही या असोसिएशन शुभेच्छा मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सरोदे यांनी केले. व संघटना स्थापन करण्याचा उद्देश व कार्य काय असेल हे स्पष्ट केले. याप्रसंगी जुना पध्दतीचा कॅमेरा ते आज पर्यंत चे कॅमेरा यांचे प्रदर्शन ही प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले होते. या नंतर फोटो ग्राफी बाबत नाशिक येथील रोशन ठाकुर यांचे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी नांदगाव तालुका फोटो ग्राफर असोसिएशनचे मार्गदर्शक चंचल गंगवाल,विजय भावसार, अध्यक्ष अनिल शिंदे, उपाध्यक्ष मंगेश सोनस, उपाध्यक्ष निलेश बोरसे,सचिव गणेश सरोदे, कार्याध्यक्ष सचिन पांडे, खजिनदार दत्तु आवारे,सहखजिनदार निलेश्वर पाटील, तांत्रिक प्रमुख दिनेश रुणवाल प्रसिद्ध प्रमुख सचिन दंडगव्हाळ व सुहास पुणतांबेकर, शंकर विसपुते, नाना अहिरे व फोटो ग्राफर असोसिएशनचे सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र तुरकुणे यांनी केले तर आभार सचिन पांडे यांनी मानले.
'बहुजन हिताय ,बहुजन सुखाय' या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार आपण सर्वांनी जात पात बाजूला ठेवून संस्थेचा प्रगतीचा विचार करावा - इंजि.अमित पाटील.
नांदगाव (प्रतिनिधी) - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्ताने संस्थेत १९ ऑगस्ट समाजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यालयाच्या प्रांगणात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल , औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,आदर्श प्राथमिक शाळा , होरायझन अकॅडमी, बाह्य रुग्ण सेवा कक्ष, नांदगाव या सर्व संकुलांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचा समाजदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे तालुका संचालक इंजि.अमित बोरसे-पाटील होते. मंचावर राजाभाऊ देशमुख (माजी आमदार ), डॉ.दिलीप शिंदे (प्रमुख वक्ते), माननीय शरद पाटील (अध्यक्ष, महाविद्यालय व्यवस्थापन समिती),राजाराम गवांदे (अध्यक्ष, आदर्श,शालेय व्यवस्थापन समिती), सुनील बोरसे (अध्यक्ष आयटीआय व्यवस्थापन समिती) विजय काकळीज( अध्यक्ष, न्यू इंग्लिश स्कूल,शालेय व्यवस्थापन समिती), विश्वासराव कवडे (ज्येष्ठ सभासद), दत्तात्रय काकळीज (ज्येष्ठ सभासद ),आनंदा गुंड माळी श्रीमती विद्या पवार हेमंत पवार रमेश अण्णा बोरसे राजेश पाटील, नूतनशेठ कासलीवाल,पुंजाराम जाधव,उदय पाटील, मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या समाज ध्वजाचे ध्वजारोहण तालुका संचालक इंजि. अमित बोरसे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे समाजगीत विद्यालयाच्या गीतमंचाने सादर केले.
यानंतर समाजदिन निमित्ताने रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.दिलीप शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. होरायझन अकॅडमीचे कलाशिक्षक सौरभ शेवरे यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात व संस्थेचे बोधचिन्ह तर न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी ओम सुपेकर याने कर्मवीर डी. आर. भोसले व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी प्रतिकृती सुंदर रेखाटली.
मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर डी आर भोसले, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर बाबुराव ठाकरे, कर्मवीर विठ्ठलराव हांडे, कर्मवीर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून दीपक चव्हाण यांनी समाजदिनाचा मुख्य उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष इंजि.अमित बोरसे-पाटील यांचा सन्मान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी केला तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
विजय काकळीज यांनी आपल्या मनोगतातून समाजदिनाची सुरुवात केव्हापासून झाली हे सांगितले. श्रीमती विद्याताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी आदर व्यक्त केला.
विद्यालयातील गीतमंचाने कर्मवीरांच्या जीवन कार्यावर आधारित सुंदर पोवाडा सादर केला. त्यांना मार्गदर्शक व संगीत साथ विद्यालयाच्या संगीत शिक्षिका कल्पना आहिरे यांनी दिली.
कार्यक्रमास गोटू गोपीनाथ निकम, जयवंत चव्हाण, अशोक जाधव , बाबूलाल सावंत,सुदामराव काळे, पोपटराव पवार, शामराव काकळीज ,दौलतराव आहेर, वामनराव घोटेकर, रामनाथ गायकवाड, दत्तात्रय काकळीज, सुनील पगार ,रामराव मोहिते प्रभाकर कवडे,रवींद्र कवडे ,कुणाल देशमुख, किशोर शिंदे, जनार्दन पवार, नितीन आहेर,अनिल आहेर,दिलीप आहेर, रवींद्र आहेर, मिनीनाथ चोळके , अरविंद पाटील,रविकांत पाटील,कौतिक शिंदे तुकाराम चव्हाण, डॉ.गणेश चव्हाण इत्यादी मान्यवर सभासद उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून असून इंजि.अमित पाटील यांनी 'बहुजन हिताय ,बहुजन सुखाय' या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार आपण सर्वांनी जात पात बाजूला ठेवून संस्थेचा प्रगतीचा विचार करावा. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे ,संस्थेचे विकास हेच माझे प्रामाणिक ध्येय असेल हे सांगितले. त्यांनी सर्व उपस्थित त्यांना समाजदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रमुख वक्ते प्रा.दिलीप शिंदे यांनी आपल्या मनोगतातून सर्व कर्मवीरांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याची परिचय करून दिली. तसेच चंदनासारखे कर्मवीरांचे कार्य सतत दरवळत राहील. सर्वांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहावे हे सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संकुलातील शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भिला पवार , दत्तात्रय भिलोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.संजय मराठे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांनी पसायदानाने केली.
Tuesday, August 19, 2025
अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने शेती पिकांचे नुकसान, सरसकट पंचनामे करण्याचे आमदार सुहास कांदे यांच्या सूचना,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कळवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाची नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळवाडी तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
सदर परिस्थितीची माहिती मिळताच आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तात्काळ तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या नंतर तहसीलदार तुषार सोनवणे, तसेच कृषी अधिकारी भगवान गोरुडे आणि संबंधित अधिकारी यांनी कळवाडी सह नरडाने, चिंचगव्हाण, साकूर येथील झालेल्या नुसानची पाहणी केली.
यावेळी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना अधिकारी वर्गास दिल्या. या वेळी आमदार प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर कांदे या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. या प्रसंगी शेतकरी बांधव तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________
कळवाडी व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान झाले आहे, तहसीलदार व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत - आमदार सुहास आण्णा कांदे.
Wednesday, August 13, 2025
नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व प्र. के. अत्रे यांची जयंती साजरी,
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगावच्या मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, लेखक व शिक्षणमहर्षी प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका ज्योती काळे उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण ,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे ज्येष्ठ शिक्षक अशोक मार्कंड, उमेश पगार, भाऊसाहेब सोनवणे, दत्तात्रेय भिलोरे,बाळासाहेब कवडे , सचिन थेटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
उपशिक्षक श्री राजेंद्र कदम यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन कार्याचा परिचय करून देताना त्यांनी तुम्हारे ३० वर्ष माळवा प्रांतावर राज्य केले. त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली. त्यामुळे त्यांना 'पुण्यश्लोक' उपाधी मिळाली. त्यांनी अनेक मंदिरे घाट, विहिरी, धर्मशाळा, रस्ते बांधकाम केले. परिसरातील भिल्ल व गोंड समाजातील लोकांना आपल्या सैन्यात सामील केले व प्रभावी सैन्य व्यवस्था केली हे सांगितले.
उपशिक्षक सुनील सुपेकर यांनी आचार्य प्र के अत्रे यांच्या विषयी बोलताना ,अत्रे हे एक महान नाटककार होते. त्यांनी 'साष्टांग नमस्कार' ,'भ्रमाचा भोपळा',' लग्नाची बेडी',आणि 'तो मी नव्हेच' ही नाटके त्यांची आजही लोकप्रिय आहेत.
अत्रे यांनी 'केशवकुमार' या टोपण नावाने अनेक कविता लिहिल्या. 'मी कसा झालो?' आणि 'कऱ्हेचे पाणी' या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास अत्यंत प्रांजलपणे आणि प्रभावीपणे मांडला हे सांगितले.
उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सात- बारा ( ७/१२)हा शब्द कसा प्रचलित केला तर अत्रें विषयी बोलताना त्यांनी अत्रे हे एक निर्भीड व प्रभावी पत्रकार होते ते सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.
Subscribe to:
Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...