Thursday, February 8, 2024

नांदगावच्या महाविद्यालयात रक्तदान शिबीर, अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला,




नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व मराठा विद्या प्रसारक समाजाचे वैद्यकीय महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त उपक्रमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रवीण निकम ,सदस्य स्थानीय व्यवस्थापन समिती नांदगाव यांच्या हस्ते संपन्न झाले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे असे उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ.प्रवीण निकम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी नेहमी रक्तदान करून समाज कार्य करावे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन केले .जवळ जवळ वीस विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा बालाजी मोरे, प्रा.कौशल्या बागुल व प्रा.बी.पी गायकवाड यांनी केले.

मनमाड मध्ये भविष्यात शिवसृष्टी प्रमाणे भीमसृष्टी उभारणार - आमदार सुहास कांदे,





मनमाड ( विशेष प्रतिनिधी) - आपल्या सर्वांना मूलभूत सुविधांच्या विकासकामांसह,आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय असलेल्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारेन असा जो शब्द दिला होता.त्याची आज आपूर्ती करताना माझा आनंद द्विगुणित झाला आहे.असे भावनिक प्रतिपादन आ.सुहास कांदे यांनी केले.
      शहरात डॉ.बाबासाहेब यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबीत होता.तो प्रश्न महत्वाचा माणून आमदार सुहास कांदे यांनी आज त्याची पूर्तता केली.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यापीठावर पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे,राजेंद्र पगारे,बबलू पाटील,गंगाभाऊ त्रिभुवन,मयूर बोरसे,शाईनाथ गिडगे,सौ.अंजुम सुहास कांदे,फरहान दादा,उपस्थित होते.
     आमदार कांदे पुढे म्हणाले की,अनेक मोठ्या लोकांनी या मतदार संघाचे लोकप्रतिनिधित्व केले,पण ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागणी बाबत काही करू शकले नाही,ते भाग्य माझ्या वाट्याला आले.तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या.! भविष्यात शिवसृष्टी सारखीच भीमसृष्टी उभारेन.! असा शब्द देतो, असे ते शेवटी म्हणाले.
     यावेळी पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी यांनी ही आमदार सुहास कांदे यांच्या कार्याचा गौरव केला.इतिहासात प्रथमच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्याची घटना अलौकिक असल्याचे सांगून हा क्षण मनात साठवून ठेवा असे ते म्हणाले.तसेच आमदार सुहास कांदे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला आहे.तुम्ही भाग्यवान आहात असे ते शेवटी म्हणाले.
     या सोहळ्याला उपस्थित पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी व आ.सुहास कांदे,व सौ.कांदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.आज माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यामुळे शहरातील विविध भागातून मिरवणूक काढून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी या मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली.यानंतर सर्वपक्षीय नेते सर्व समाजातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले भीम व आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
    मनमाडकर समाज बांधवांकडून आमदार सुहास अण्णा कांदे यांचा नागरिक सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
     लोकार्पण सोहळा सुरू असताना आकाशातून हेलिकॉप्टर द्वारे पुष्पृष्टी करण्यात आली, दोन हेलिकॉप्टर ने आकाशात सात वेळा घिरट्या मारत स्मारकावर पुष्पवृष्टी केली.लोकार्पण सोहळ्यानिमित्त कमालीचा उत्साह आनंद जल्लोष समाज बांधवांमध्ये पाहण्यास मिळाला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदगाव तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात यांची निवड,




 

नांदगाव ( प्रतिनिधी ) -  मनसे प्रमुख राज ठाकरे,  युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा संघटक ऍड. किशोर शिंदे साहेब, लोकसभा उपसंघटक ऍड गणेश सातपुते साहेब ,प्रदेश सरचिटणीस अशोक भाऊ मुर्तडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ऍड. रतनकुमार इचम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली  बुधवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा दौरा दरम्यान नांदगाव तालुका आढावा बैठक नांदगाव शासकीय विश्राम गृह येथे संपन्न झाली.पुढील प्रमाणे नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राहुल पाटील नांदगाव विधानसभा अध्यक्ष केदा भवर, कळवाडी गट नांदगाव तालुका उपाध्यक्ष, राहुल पांडे भालूर गट नांदगाव तालुका उपाध्यक्ष, गोकुळ करनर जातेगाव नांदगाव तालुका उपाध्यक्ष, या 
बैठकीस तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात ,जिल्हा संघटक सुनील कोल्हे, रेखाताई शेलार महिला नांदगाव तालुकाध्यक्ष, अभिषेक विघे नांदगाव शहराध्यक्ष , शहराध्यक्ष गौरव कांबळे,जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू,नाशिक शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे,योगेश पाटील, कुणाल साैंदाणे राहुल पांडे, राजाभाऊ माळवातकर, राहुल जाधव, गणेश देशमुख, सुनिल चव्हान रावसाहेब गरुड तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रसैनिक व पक्षाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

नांदगाव शहरात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या कडून विविध गीत सादर,



नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या कडून माता रमाई यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले.सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुप नांदगाव यांच्या वतीने दर वर्षी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्रातील जन्माला आलेल्या अनेक महापुरुषांचे प्रबोधन पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते . यंदा देखील महाराष्ट्रात प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांनी "तुम्ही खाता त्या भाकरीवर , बाबासाहेबांची सही आहे रंररर " या भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कडूबाई खरात यांच्या हस्ते माता रमाई यांना दिपप्रज्वलित करून गुलाब पुष्प वाहुन वंदन करण्यात आले.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील बुलंद तोफ भुषणजी लोंढे, विनोद शेलार (राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष),मनमाडचे नगराध्यक्ष गणेश धात्रक,नांदगावचे उपगराध्यक्ष नितिन जाधव, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ .ख्याती तुसे, हर्षद तुसे , शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता,  
शैक्षणिक,समाजिक, सांस्कृतिक, क्रिडा,क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती . यावेळी आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन कडुबाई खरात यांच्या हस्ते सर्वांचे सत्कार करण्यात आले होते. 
   तसेच नांदगाव आंबेडकर नगर येथील नव वधु वर सिध्दांत व साक्षी काकळीज यांच्या परिवाराच्या वतीने व शहरातील अनेक बहुजन समाजातील महिला मंडळाच्या वतीने कडूबाई खरात यांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर कडूबाईंच्या पहाडी आवाजत प्रबोधन गीत सादर करण्यात आले. कडूबाई हे चाहत्यांसमोर येताच फटाकेंच्या आतिषबाजीत, टाळ्यांचा,घोषणांचा एकच जोरदार आवाज घुमु लागला होता..."जय जय जय जय भिम जय भिम जय भिम " संपूर्ण परिसर दणाणुन सोडला होता या गीत गाण्यासाठी चाहत्यांनी हाजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी व बहुजन समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने या मातारमाई जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मसेवक आनंद पवार यांनी केले तर सन २००५ ते २०२४ पर्यंतचा समाजिक क्षेत्रात कार्यक्रमाचे अहवाल देखील यावेळी जनते समोर शाहू महाराज ग्रुपचे मार्गदर्शक नितिन जाधव यांनी सादर केले होते. तसेच कडूबाई खरात यांच्या सोबत लहान मोठ्यां पासुन सर्वच फॅन सेल्फीचा मनसोक्त गप्पा मारत आप आपल्या मोबाईल मध्ये एक अविस्मरणीय क्लिक कैद करतांना दिसत होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर(नाना) जाधव, उपाध्यक्ष प्रशांत गरुड, 
यादींनी मोठे परीश्रम घेतलं होतं.

Saturday, February 3, 2024

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता - भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार - सौ. अंजुम ताई कांदे,





नांदगाव (प्रतिनिधी ) -    उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सौ. अंजुम कांदे मार्गदर्शन करताना बोलत होत्या. शासनाकडून मिळालेल्या कर्जाचा योग्य विनियोग करा,दहा पैशाचे वीस पैसे कसे होतील. याचा सारासार विचार करून व्यवसाय करा.आणि आपली आर्थिक प्रगती साधा असे आवाहन समाजसेविका सौ.अंजुम कांदे यांनी केले.
       यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या तालुकाप्रमुख सौ.विद्या जगताप, शहरप्रमुख रोहिणी मोरे,मनमाड शहर प्रमुख सौ.संगीता बागुल, बँक ऑफ बडोदा चे शाखाधिकारी मनजीत शहारे,प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी,स्वयं सहाय्यता बचत गटाचे अशोक अहिरे (साकोरा प्रभाग),भालूर प्रभाग चे दीपक सोनवणे,न्यायडोंगरी चे राहुल भदाणे,तालुका समन्व्यक अश्विनी जाधव,आदी उपस्थित होते.
       सौ.कांदे बोलताना म्हणाल्या की,ज्या जबाबदारीने कर्ज घ्याल,त्या जबाबदारीने फेडले ही पाहिजे जेणेकरून तुमची पुढची प्रगती सुखकारक होईल.तसेच या दृष्काळी तालुक्यातल्या माझ्या माता भगिनींना त्यांच्या घरातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपले आमदार सुहास कांदे यांनी व मी एक महत्वकांक्षी योजना आखली आहे.येत्या काही महिन्यात ते काम सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत.त्यासाठी दवा अन दुवा ची गरज आहे,तर दवा आम्ही देतो दुवा तुम्ही करा.! असेही त्या यावेळी म्हणाल्या.
      पहिल्या टप्यात किमान २५ हजार महिलांना रोजगार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.असे त्या शेवटी म्हणाल्या.याप्रसंगी तालुक्यातील गिरणानगर येथील ६ बचत गट तर लोहशिंगवे येथील ५ महिला बचत गटांना बँक ऑफ बडोदा कडून प्रत्येकी १ लाख ५० हजार असे १६ लाख ५० हजार रुपये कर्जाच्या धनादेशाचे वितरण सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले.

शहीद जवान संदीप मोहिते यांचे मांडवड गावात स्मारक उभारणार - आमदार सुहास कांदे,







मांडवड ( प्रतिनिधी ) - पुढच्या पिढीला शहीद संदीप मोहिते यांच्या बलिदानाची ,देशासाठी केलेल्या कर्तव्याची जाणीव रहावी,त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे उचित असे स्मारक या मांडवड गावात उभारणार असे जाहीर करून तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना श्रद्धांजली वाहिली.
        यावेळी संदीप मोहिते यांच्या बलिदानाचा गौरव करताना आ. सुहास कांदे पुढे म्हणाले की,आपले भारतीय जवान आपल्या देश बांधवांसाठी,देशासाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात.त्यांच्यामुळेच आपण आणि आई - बहीण किंवा संपूर्ण कुटुंबं सुरक्षित आहे. नांदगाव तालुक्याच्या वतीने आमदार सुहास कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार सिद्धार्थ मोरे,पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी,माजी आ.अँड.अनिल आहेर, आ.संजय पवार,जगन्नाथ धात्रक,विलास आहेर,शिवसेना तालुका प्रमुख शाईनाथ गिडगे, राजेंद्र पवार,किशोर लहाने,सागर हिरे,समाधान पाटील,अंकुश कातकडे,अँड.जयश्री दौंड,राजेश बनकर,गटविकास अधिकारी संदीप दळवी,विठ्ठलं आहेर,आदिंसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

Thursday, February 1, 2024

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी कामास दोन कोटी रुपये मंजूर,







नांदगाव ( प्रतिनिधी ) -  माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे यातून पाणी गळती होऊन अत्यंत कमी दाबाने नांदगावला पाणी मिळत असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात अडथळा होत होता. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे शहराला मिळणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे . दहेगाव धरण कोरडे असून गिरणा धरणातून महिन्यातून एकदाच आवर्तन सोडले जात असल्यामुळे माणिकपुंज धरणातून येणाऱ्या पाण्यावर भागवावे लागणार होते.  पण त्यातही नेहमीच पाणी लिक होण्याच्या समस्येमुळे शहराला प्रत्येक भागात पाणीपुरवठा करण्यासाठी २२ -  २३ दिवस लागत आहेत. 
     या सर्व पार्श्वभूमीचा अभ्यास करून आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नगरविकास विभागाकडे शहरातील पाणीटंचाईसाठी उपाययोजना म्हणून पाठपुरावा करून माणिकपुंज या तात्पुरत्या व तातडीच्या नळ योजनेच्या नव्या जलवाहिनीसाठी दोन कोटी रुपये अनुदान मंजूर करून घेतले आहे.
    काही दिवस आधीच आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून गिरणा धरण ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश मिळाला आहे .  या पाणी योजनेच्या स्वागता निमित्ताने नांदगाव शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून या योजनेचे स्वागत उत्साह साजरे केले. या योजनेचे कार्य तातडीने सुरू करण्यात आले असून वेहेळगाव ते साकोरा पर्यंत पाईपलाईन टाकली गेली आहे तसेच जलशुद्धीकरण केंद्र नांदगाव येथील जुनी पाण्याच्या टाकी मागील डोंगरावर काम सुरू झाले आहे. 
      नवीन पाणी योजनेचा आनंद नागरिकांमध्ये आहेच पण सध्या स्थितीत पाण्याचा टंचाईला सामोरे जावे लागत असताना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तातडीने माणिकपुंज धरणावरून होणाऱ्या पाणीपुरवठा साठी नवीन जलवाहिनी करिता दोन कोटी रुपये मंजूर करून दिल्याबद्दल नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...