Wednesday, April 27, 2022

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी आमिन शेख यांची निवड...


१६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न झाले.
या साहित्य संमेलन मध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मध्ये सदस्य म्हणून मनमाड येथील  युवा पत्रकार आमिन नबाब शेख यांच्या नियुक्ती ची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्यचे संघटक कॉ.किशोर ढमाले यांनी केली.अमिन शेख हे मनमाड शहरांतील  पत्रकार आहे. 
फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंच,ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व सेंट्रल रेल्वे मजुदर संघ मनमाड चे हितचिंतक आहे
त्यांच्या नेतृत्वाखाली पहिले विद्यार्थी-पालक-शिक्षक साहित्य संमेलन २०२० मध्ये मनमाड येथे भरविण्यात आले होते.त्या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते, दैनिक पुण्यनगरी चे मनमाड प्रतिनिधी म्हणून काही काळ काम केले आहे.साप्ताहिक मनमाड सम्राट चे ते संपादक आहे तर ते जागर जनस्थान न्युज चॅनल,E.T.Vभारत न्युज चॅनल प्रतिनिधी,दै.महानगर टाइम्स चे प्रतिनिधी म्हणून ते काम करत आहे.
परिवर्तन सोशल अकादमी च्या  माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मनमाड शहरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नांदगाव मस्तानी अम्मा उरूस कमिटीच्या अध्यक्षपदी सुनील जाधव



नांदगाव (प्रतिनिधी )  येथील हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मरहूम मस्तानी अम्माचा यंदाच्या उरूस भरविण्यासाठी पुन्हा एकदा भाविकांची लगबग सुरू झाली आहे. मस्तानी अम्माच्या यंदाच्या उरूस साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या मस्तानी अम्मा उरूस कमिटीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक जगताप, विजय बागोरे, माजी नगरसेवक याकूब शेख, अनिल जाधव, नितीन जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज
चोपडे, भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, समाधान दाभाडे, विकास चव्हाण, गणेश शर्मा, राजभाऊ गुढेकर आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उरूस कमिटीच्या उपाध्यक्षपदी मुश्ताक शेख व गौतम जगताप यांची कार्याध्यक्षपदी अॅड. विजय रिंढे, खजिनदारपदी शाकीर पठाण, सहखजिनदार राजूभाऊ गुढेकर, तर संदलप्रमुख म्हणून शकील रंगरेज,
दीपक सोनवणे, राकेश चंडाले सल्लागार म्हणून देविदास मोरे, वाल्मिक जगताप शकील शेख, संजय सानप, हरिभाऊ भालेकर, गणेश शर्माजी, बागुल रवि नगरकर, अकिल शेख, सदस्य म्हणून लालीभाई खाटीक, शरीफभाई शेख, इम्रानभाई बेग, समाधान दाभाडे, भरत मोकळ, नदीम रंगरेज, अरबाज मण्यार, नाविद शेख, सलीम रंगरेज, शकील रंगरेज, मुज्जू शेख, मौसिन शेख, मधू कलंत्री, रवी सानप, बाळासाहेब आहेर, करण भालेकर, आसिफ सय्यद, सोनू पेवाल, शरीफ शेख, पिंटू चौधरी, मौसिन खाटीक, गणेश कुमावत, जावेद तांबोळी, मिलिंद मोरे, आकाश हिरे, प्रकाश झोपे यांनी नियुक्ती झाली आहे.

पानेवाडी जवळ ईधनचोरी करणारे अटकेत,


मनमाड (प्रतिनिधी ) - साधारण एक दशकापूर्वी  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मनमाड शहरातील पानेवाडी इंधन प्रकल्पाजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांची पेट्रोल माफियाकडून हत्या करण्यात आली होती.त्या घटनेनंतर पेट्रोल डिझेल चोरी होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या मात्र या सगळ्या फोल ठरल्या चोरी करणारे या ना त्या मार्गाने चोरी करतातच पण जेव्हा ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच जर चोरी करत असतील तर? हो अशीच घटना मनमाड नजीक असलेल्या पानेवाडी इंधन प्रकल्पात घडली असुन रेल्वेच्या प्रत्येक वॅगनमधून 5 ते 15 लिटर पेट्रोल काढून ते काळ्या बाजारात विकण्याचा गोरख धंदा गेले अनेक वर्षांपासून सुरू होता रेल्वेच्या आरपीएफ यांनी या प्रकरणात विठ्ठल रामचंद्र सांगळे या रेल्वे कर्मचाऱ्यांला त्याच्या साथीदारासोबत सापळा रचून अटक केली आहे.मात्र हे दोघेच होते की मोठे रॅकेट आहे याचा छडा लावण्याचे मोठे आवाहन आरपीएफ समोर उभे आहे.
            या बाबत सविस्तर वृत्त असे कि शहरा पासून 6 किमी अंतरावर असलेल्या पानेवाडी येथे आव्हाड वस्तीवर इंधनाचा अवैध अड्डा असून तेथे रेल्वे रॅकच्या टॅंक मधून चोरी केलेले पेट्रोल डीझेलची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्या नंतर रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी क्षितीज गुरव,बी.पी.कुशवाह यांच्या आदेशानुसार प्रभारी निरीक्षक डी.के.मिश्रा,उपनिरीक्षक आर.एस.यादव,समाधान बहुलकर,आरपीएफ  विठ्ठल नागरे,सागर वर्मा,मनीष कुमार,गजानन पाटील आदींच्या पथकाने  सापळा रचून अड्ड्यावर छापा मारला. त्यांनी 75 लिटर आणि 50 लिटर डीझेलसह इतर साहित्य जप्त करून या प्रकरणी विजय दशरथ सांगळे आणि विठ्ठल रामचंद्र सांगळे (रा.पानेवाडी) या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे विठ्ठल हा रेल्वे कर्मचारी असून त्याची इंधन घेऊन आलेल्या रेल्वे रॅक टॅंकच्या सीलची देखभाल करण्याची जबाबदारी होती मात्र त्याने जबाबदारी पार पाडण्या एवजी इंधन चोरी सुरु केली अशी जोरदार चर्चा या भागात आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षा पासून ही इंधन चोरी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे काहींनी तर इंधन चोरी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली आहे त्यामुळे इंधन चोरीचे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्यात अनेक जणांचा समावेश असू शकतो त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने जर खोलात जाऊन तपास केल्यास अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येऊन काही मोठे मासे देखील त्यांच्या हाती लागू शकतात मनमाड पासून 4 ते 7 किमी अंतरावर नागापूर,पानेवाडी शिवारात इंडियन ऑयल,भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम चे इंधन प्रकल्प असून त्यातून टँकरच्या माध्यामतून राज्यभरातील पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा केला जातो टँकरचे  सील आणि लॉकचे बनावट चाव्या तयार करून मोठ्या प्रमाणात इंधन चोरी केली जात होती.इंधन चोरी आणि अवैध विक्री यातून 2011 साली अप्पर जिल्हा धिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्याची घटना घडली होती.या घटने नंतर काही काळासाठी इंधन चोरी,अवैध विक्रीवर काही प्रमाणात आळा बसला होता मात्र अधून-मधून पुन्हा अशा घटना घडू लागल्या आता तर थेट रेल्वे रॅकच्या टॅंक मधून इंधन चोरी केली जात असल्याचे उघडकीस आल्यामुळे इंधन चोर पुन्हा सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे
--------------------------------------------------------
सखोल चौकशी व्हावी सत्य बाहेर येईल...!
पेट्रोल डिझेल चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे यात कधी टँकर मधून तर कधी पेट्रोल पंपावर भेसळ करण्यासाठी पेट्रोल डिझेल काढण्यात येते हा प्रकार सर्रास सुरू आहे यावर कोणाचेही नियंत्रण नाही तसेच इंधन कंपनीच्या आतमध्ये देखील अनेकदा चोरी झाल्याच्या घटना ताज्या आहेत यामुळे इंधन कंपनी व आरपीएफ अधिकारी यांच्या संमतीशिवाय येथून चोरी करणे अशक्य या प्रकरणी सखोल निःपक्षपाती चौकशी झाली तर सत्य जनतेच्याआ समोर येईल.
- गुरुकुमार निकाळे,रिपाई युवक तालुकाध्यक्ष...
--------------------------------------------------------
अवैध धंद्याना राजकीय वरदहस्त कुणाचा...?
यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड नंतर नाशिक जिल्ह्यातील तसेच जवळपास राज्यभरात अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.यानंतर काही काळ थांबलेले मनमाड शहरातील अवैध धंदे देखील बंद झाले होते मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र या सर्व अवैध धंद्याना राजकिय वरदहस्त कुणाचा हा प्रश्न पुनः समोर उभा ठाकला आहे.

Friday, April 15, 2022

आपला लढा हा मनुवादी विचारांविरूध्द - सरसेनानी आनंदराज आंबेडकर


नांदगाव ( प्रतिनिधी)-  आपला लढा हा मनुवादी विचारांविरूध्द आहे ज्यांना मनुवादी व्यवस्था आणायची आहे त्याविविरुध्द आहे.
संविधान सभेमधून आपण इशारा देत आहो की, जे कोणी संविधानकडे  डोळेवर कडून बघतिल त्याची डोळे काढून घेण्याची ताकद आंबेडकरी समाजामध्ये असल्याचे प्रतिपादन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने ``संविधान के सन्मान बहुजन मैदान''  संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रवक्ते   राजु वाघमारे, विशेष कार्यकारी अधिकारी राज्यमंत्री विजय बोरसे,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुतणे दादाजी साठे व नातू सचिन साठे सुरज साठे, माजी आमदार अनिल आहेर, विनोद शेलार, श्रीकृष्ण रत्नपारखी, रिपाइंचे जिल्हा कार्यध्याक्ष देविदास मोरे, योगिता पाटील, विद्या कसबे, आदी मान्यवर उपस्थित होते.
     आंबेडकर पुढे म्हणाले की,देशावर अनेक राजवटींची आक्रमणे झाली. त्यामुळे देशाचा इतिहास गुलामगिरीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यांची ओळख निर्माण करुन दिली. त्यांनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला.

आंबेडकर पुढे म्हणाले की, आपल्याला जे सांगितले जाते त्यावर आपण विश्वास ठेवतो. खर तर आपण चौकस राहून सत्यता पडताळली पाहिजे. बाबासाहेबांनी समाजातील अन्यायग्रस्तांकरीता कार्य केले. त्यामुळे कामगार, महिला, शेतकरी यांसह विविध वर्गातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली. बहुजनांनी जागृत असणे आवश्यक आहे. संविधानामुळे  देश एकसंघ राहिला. धर्मा धर्मात शत्रुत्व नसावे.शिक्षित समाजाने चाकोरीबाहेर जाऊन देशाच्या प्रगतीचा विचार  केला पाहिजे. समता, बंधुत्व या विचारांमुळे देश अखंड राहतो.जाती धर्माची झापड काढून टाकून बाबासाहेबांचे विचार अंगीकारले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या विविध कार्यांची माहिती दिली.
दरम्यान,
या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना संविधान प्रत देऊन सन्मानीत करण्यात आले.

Thursday, April 14, 2022

नांदगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव  शहर व परिसरात मोठ्या उत्साहात व हर्षोल्हासात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. दोन वर्षापासून उत्सवावर कोरोनामुळे टाकण्यात आलेले निर्बंध दूर झाल्याने उधाण आले होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई, फुले व निळ्या पताकांनी सजविण्यात
आले होते. बारा बंगला, सहा बंगला, आनंदनगर, आंबेडकर नगर, एसटी कॉलनी, डीएम आहिरे चाळ, कैलासनगर, गांधीनगर आदी शहरातील विविध नागरी वस्तीमधून ढोल ताशांच्या निनादात बोलो बोलो जयभीम'च्या घोषणा देत आबालवृद्धांसह शेकडोच्या संख्येने मध्यरात्रीच्या बाराला आंबेडकरी अनुयायींचा गर्दीचा ओघ सुरूच होता. ठिकठिकाणी फटाक्यांच्या विविधरंगी आतषबाजीने या उत्साहाला वेगळे वलय निर्माण झाले होते. चारही बाजूने आलेल्या शोभायात्रा मध्यरात्री बाराच्या
सुमाराला डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहचल्या. तत्पूर्वी जयंतीच्या पूर्वसंध्येला अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने आयडलफेम आम्रपाली पगारे व संगीतकार सचिन पगारे सूत्रसंचाल राजुभाऊ गांगुर्डे यांणी  'मानवंदना भीमरायाला' हा स्वरसमृद्धी ऑर्केस्ट्राचा संगीतमय कार्यक्रम पार पडला. एकूणच उत्साह द्विगुणित करणाऱ्या कार्यक्रमाची सांगता रात्री बाराच्या सुमाराला करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक पंचशील व भीमस्तवनाने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी
नगराध्यक्ष राजेश कवडे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. गुरूवारी घराघरांवर उभारलेल्या निळ्या झेंड्यांनी व पताकांनी सकाळ उगविली. सारनाथ बुद्धविहार ते आंबेडकर पुतळा अशी मिरवणूक निघाली. या ठिकाणी पुन्हा पु सामुदायिक पंचशील व भीमस्तवनाने व अभिवादन करण्यात आले.
रेल्वेचे निवृत्त चालक वसंतराव बनसोडे व दूरध्वनी विभागातील पु बळवंत वाकोडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणेक ठिकाणी खिरदण करण्यात आले व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आले  संध्याकाळी उशिरा ठिकठिकाणी वेगवेगळ्या अशावेळी शोभायात्रा काढण्यात आले भीम गीता च्या तालावर व नुत्यासह शोभायात्रा काढण्यात आले.

Monday, April 11, 2022

एकवीरा देवी यात्रा उत्सव समिती अध्यक्षपदी युवा उद्योजक आनंद कासलीवाल यांची एकमताने निवड


नांदगाव (प्रतिनिधी )- नांदगाव येथील ग्रामदैवत एकवीरा देवी यात्रा चैत्र पौर्णिमेला भरविण्यात येते. या यात्रेच्या उत्सवासाठी हिंदू पंच व जनसेवा मंडळाच्या वतीने यात्रा उत्सव भरविला जातो. या यात्रा उत्सव समिती अध्यक्षपदी युवा उद्योजक आनंद कासलीवाल यांची एकमताने निवड झाली आहे. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे होते. दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली यात्रा यंदा जनसेवा मंडळाचे पुढाकाराने होत आहे.

नांदगावमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

नांदगाव   (प्रतिनिधी )  - नांदगाव शहर व परिसरात मोठ्या उत्साहात महात्मा जोतिराव फुले जयंती झाली. यानिमित्ताने सार्वजनिक उत्सव समितीतर्फे सकाळी दहाला राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. महात्मा फुले यांच्या विचारांचे विविध दाखले उद्धृत करणारी 'ठळक अवतरणे' सुशोभित करण्यात आले होते. यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणच्या शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांत प्रतिमापूजन झाले. मुख्य कार्यक्रम शहरातील महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ झाला. आमदार सुहास कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, विनोद शेलार यांनी महात्मा फुल्यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन केले.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...