Sunday, November 23, 2025

नांदगावची कबड्डी खेळाडू शालिनी गवळे हिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक ग्रामीण संघात निवड ,



नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील श्री राम कला क्रीडा मंडळ व स्वर्गीय मातोश्री गायत्री आव्हाड फिटनेस क्लबची खेळाडू शालिनी गवळे हिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक ग्रामीण संघात निवड झालेली आहे.  तिला तिच्या मार्गदर्शक शिक्षक  विशाल आव्हाड सर (प्रशिक्षक) यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. तिने प्रचंड मेहनत घेत मोठं यश संपादन केले.  शालिनी व तिचे प्रशिक्षक दोघांचे  सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामना खेळताना  असताना तिच्या डोक्याला  दुखापत झाली होती. डॉक्टरने तिला दोन - चार दिवस आराम सांगितला. पण तिने  हार मानली नाही. आपला खेळ सुरुच ठेवला.  तिची जिद्द व चिकाटीने तिने थेट राज्यस्तरीय नाशिक ग्रामीण कबड्डी संघात निवड झाली. तिच्या जिद्दीला सलाम सर्व  नागरिकांनी दिला आहे.

Friday, November 21, 2025

नांदगाव नगरपरिषद निवडणूकीत शिवसेना पक्षाचे सात नगरसेवक बिनविरोध,




नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे माघारीनंतर युतीचं उमेदवार शिवसेना पक्षाचे सागर हिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश बनकर यांच्या मध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार आहे.  नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून संतोष गुप्ता शिवसेना (उबाठा), संजय सानप भाजपा, धिरज मोकळ अपक्ष यांनी माघार घेतली आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात सात नगरसेवक बिनविरोध करत आमदार सुहास कांदे यांनी आपला करिष्मा दाखवला आहे. 
 नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिदेसेनेचे 
प्रभाग- २ ब स्वाती अमोल नांवदर प्रभाग- ४ ब शोभा नेमीचंद कासलीवाल प्रभाग - ४अ योगेता सचिन खरोटे यांची  बिनविरोध निवड झाली आहे. 
  शुक्रवार (दि.२१) रोजी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, थेट नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ सामना होणार आहे. तर अनेक प्रभागात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच दुरंगी लढती होणार आहे. महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसून येत नाही. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने नगरपरिषदेच्या वीस जागांपैकी सात जागा बिनविरोध निवडून आणता मजबूत आघाडी घेतली असून विरोधकांची भंबेरी उडवली आहे. पण नांदगावमध्ये मागच्या काही दिवसात राजकीय घडामोडी घडल्या होत्या. अनेक मोठं चेहरे निवडणूकीतून माघार घेतली. 
     नांदगाव मध्ये मतदान असून निवडणूक शहरात आहे की नाही मतदार ही वैतागले आहेत.  याचा परिणाम मतांवर होऊ शकतो. अशा गुप्त मतदानाचा फटका निश्चित बसणार आहे. नांदगाव नगरीत प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले माजी नगराध्यक्ष राजेश बनकर यापूर्वी नगराध्यक्ष पदांवर राहिले आहे. आणि तेव्हा निवडणूकीत ते किंगमेकर ठरलं होतं.  ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. कारण नगरपरिषदेत बहुमत सोबत नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे. जे नाराज अशा नेत्यांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहेत. भुजबळांनी नांदगावच्या निवडणूकी कडे लक्ष दिले आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव, मनमाडला विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राजकारणाचे चाणक्य म्हणून त्यांच्या कडे बघितले जाते. या नाराजीचा फायदा उचलण्याचे प्रयत्न ते करतील. मागच्या काही दिवसात शहरात विविध राजकीय घडामोडी घडल्या त्यांचा राग  मतदारांमध्ये आहे.  माघारीनंतर आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, शिवसेनेच्या झंझावातापुढे विरोधक कितपत तग धरत असलं तरी मतदार राजा मत कोणाला देतात हे सांगणं कठीण आहे. ही निवडणूक वाटेल तशी सोपी नाही. पुढील महिन्यात  दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून,  तीन तारखेला मतमोजणी होणार आहे.

Tuesday, November 18, 2025

शिवसेनेतर्फे युवासेनेचे तालुका प्रमुख सागर हिरे यांना नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी,





नांदगाव (प्रतिनिधी) -   नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक - २०२५ निवडणूकीच्या अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी पुर्ण झाली असून, एक नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे तर नगराध्यक्ष पदाचे राजेश कवडे यांचा शिवसेना पक्षाचा अर्ज अवैध ठरला आहे. एकुण २०
सदस्यपदासाठी ८० अर्ज दाखल झाले होते . त्यापैकी 
१४ अवैध ठरले असून,  ६६ अर्ज वैध ठरले आहे. तर मतदानाअगोरदच आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने प्रभाग क्रमांक ८ ब  एक जागा बिनविरोध करत खाते उघडले आहे.
 आमदार सुहास कांदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या सागर हिरे यांना शिवसेना शिंदे गट व भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित झाली असून, छाननी प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलेले राजेश कवडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. तर सागर हिरे यांचा अर्ज वैध ठरवला. सागर हिरे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर सुहास कांदे समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला. 


प्रभाग क्रमांक ८ 'ब' मधून शिंदे गटाच्या उमेदवार खान जुबेदाबी गफ्फार बिनविरोध,
-    दरम्यान नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पहिला 'बिनविरोध' विजय मिळवत खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक ८ 'ब' मधून शिंदे गटाच्या उमेदवार खान जुबेदाबी गफ्फार यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा विजयी होणारा हा पहिला उमेदवार ठरला आहे. खान जुबेदाबी गफ्फार या शिंदे गटाच्या पहिल्या नगरसेविका ठरल्या आहेत. उमेदवार खान जुबेदाबी गफ्फार यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मनोबल वाढले आहे. एकीकडे नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत अपेक्षित असताना, सदस्याच्या जागेवर बिनविरोध विजय मिळवल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने विजयी सुरुवात केली आहे. नगपरिषद सदस्याच्या एका जागेवर शिंदे गटाने बिनविरोध विजय मिळवला असला तरी, नगराध्यक्षपदासाठी येथे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नगराध्यक्षपदासाठी मुख्यतः तिरंगी किंवा चौरंगी लढत अपेक्षित आहे.

जळगाव बुद्रुक येथे विहिरीत पडून दोन हरीण मृत्यू




नांदगाव ( प्रतिनिधी) -  नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील शेतकरी ज्ञानेश्वर भागोजी वाघ यांच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता, मोटरपंप चालू करत असताना विहिरीत दोन हरीण मृत आढळले. वाघ यांनी स्थानिक प्राणी मित्र प्रभाकर निकुंभ यांना माहिती दिली असता निकुंभ यांनी समक्ष पाहणी केले . दोन काळवीट असल्याची खात्री करून वनविभागास कळवले. नांदगाव वनपरिक्षेत्राधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अण्णासाहेब टेकनर आणि इतर वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ हजर झाले. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने दोन्हीही काळविटांना विहिरीतून वर काढूले.व पुढील विधी विल्हेवाट करण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे नांदगाव येथे नेण्यात आले. यावेळी लव्हा कांदे, किसन गावंडे, चिंदा गावंडे, आणि इतर शेतकरी उपस्थित होते. काळवटांची जोडी मागील बऱ्याच वर्षापासून आपल्या कळपाने परिसरात वास्तव्यास असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





Monday, November 17, 2025

नांदगाव नगरपरिषद निवडणूकीत नगराअध्यक्षपद १०, नगरसेवक पदासाठी ८० नामनिर्देशन पत्र दाखल, आज अर्जाची छाननी होणार!!







नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी  सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवारांनी १० अर्ज दाखल केले असून,  नगरसेवक पदासाठी एकूण ८० नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,  शिवसेना उबाठा, अपक्ष यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
 नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा  (१७ नोव्हेंबर) शेवटचा दिवस असल्याने नगरपरिषद कार्यालयात सकाळी ११ वाजेपासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने सर्वपक्षीय, अपक्ष इच्छुक उमेदवार समर्थकांसह दाखल झाले होते. 
सकाळी ११ वाजल्यापासूनच उमेदवार समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी हजर झाले होते. दुपार नंतर उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू असल्याने नगरपरिषद परिसरात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेश कवडे, समृद्धी बॅंकेच्या चेअरमन अंजूम कांदे , अरुण पाटील, सागर हिरे, विलास आहेर, अमोल नावंदर, ज्ञानेश्वर कांदे, आनंद कासलीवाल आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौदाणे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी शामकांत जाधव यांच्याकडे अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माजी नगराध्यक्ष राजेश बनकर तर शिवसेना उबाठा कडून तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी दहा अर्ज दाखल झालेले असून राजेश कवडे यांनी शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत तर शिवसेनाचे सागर हिरे, अरुण पाटील, किरण देवरे यांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना उबाठा कडून संतोष गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेश बनकर, भाजपचे संजय सानप, अपक्ष धिरज मोकळ, विक्रांत कवडे यांनी दाखल केले आहेत. 
आज अर्जांची छाननी केली जाणार असून २१ तारखेला माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी नांदगाव नगरपरिषदेची निवडणूक तिरंगी लढत होणार आहे. 


Sunday, November 16, 2025

मनमाड नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप -रिपाई, मित्रपक्षांची महायुती,







मनमाड ( प्रतिनिधी) -  येणाऱ्या मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीतील बहुप्रतीक्षित शिवसेना, भाजप, रिपाई, पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह मित्रपक्षांच्या युतीवर अखेर रविवारी मध्यरात्री शिक्कामोर्तब झाले. या पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रात्री नांदगाव येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या देवाज बंगल्यावर चर्चेची तिसरी फेरी अखेर यशस्वी झाली व त्यासाठी या युतीवर शिक्कामोर्तब  आले. त्यामुळे गेले काही दिवस सुरु असलेल्या प्रचंड उत्सुकता व सस्पेन्सला अखेर पूर्णविराम मिळाला आहें.
  राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रभारी आमदार राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या अनमोल मार्गदर्शन, सहकार्य व सूचनानुसार ही युती आकारात आल्याचे शिवसेनेचे  आमदार सुहास अण्णा कांदे दैनिक जनश्रध्दाशी रात्री उशिरा बोलताना म्हणाले . 
    मनमाडला थेट नगराध्यक्षसह 33 विरुद्ध 0 नगरसेवक या शिवसेना - भाजपा -रिपाई महायुतीचे निवडून येणार, असे या बैठकीनंतर आमदार सुहास अण्णा कांदे व उभय पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. युतीच्या कागद पत्रावर अधिकृत स्वाक्षर्या करून तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही कागदपत्रे परस्परांना देत शेवटपर्यंत एकजूट टिकून राहील,अशी लेखी ग्वाही दिली.
मनमाड शहरासाठी शिवसेनेने गेल्या दहा वर्षात मोठी विकास कामे केली असल्याने जनमत आमच्या बाजूने आहें.  त्याची प्रचिती गेल्या विधानसभा निवडणुकीत सुहास अण्णा कांदे यांचेवर मतांचा वर्षाव करून शिवसेनेवर व महा्युती वर दुसऱ्यांदा प्रेम व्यक्त करित आमदार सुहास कांदे यांना निवडून आणले.
    अशीच एकतर्फी व निर्णायक अशी ही मनमाड नगरपालिकेची निवडणूक निवडणूक 33-0 अशी महायुती जिंकणार, असेही या पक्षाच्या नेत्यांनी शेवटी सांगितले.
     या बैठकीला युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान, भाजपाचे नाशिक जिल्हा उत्तर महामंत्री व नांदगाव मनमाड निवडणूक प्रभारी नंदकुमार खैरनार, नांदगाव विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज खताळ, माजी नाशिक जिल्हा उत्तर महामंत्री सचिन दराडे यांच्या भाजपातर्फे पत्रावर सह्या आहेत. तर शिवसेना कोअर कमिटी सदस्य तालुका प्रनुख साईनाथ गिडगे, युवासेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान,सुनील हांडगे, मयूर बोरसे, योगेश इमले आदिच्या या युतीच्या पाठिंबा पत्रावर सह्या असून हे सर्व नेते या बैठकीसाठी उपस्थित होते.

Saturday, November 15, 2025

नांदगाव नगरपरिषद निवडणूक शिवसेना - भारतीय जनता पक्ष एकत्र लढणार,








 नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना शिवसेना (शिंदे गट) व भारतीय जनता पक्ष हे युतीत नांदगाव नगरपरिषदेची निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नांदगाव येथील आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थान असलेल्या देवास बंगल्यावर शिवसेना तसेच भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद घेऊन शिवसेना शिंदे गट, तसेच भारतीय जनता पक्ष हे दोघेही युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. या बैठकीला अंजुम कांदे यांच्यासह शिवसेना तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार कांदे यांनी शिवसेना-भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नगरपरिषदेवर युतीचा भगवा फडकवणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी युती झाल्याचे जाहीर केले. भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी आमदार कांदे यांनी केलेल्या विकासाचा झंझावात पाहता, युती केल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी नांदगाव नगरीचे   माजी नगरअध्यक्ष राजेश कवडे,  उमेश‌ उगले,  शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे,  शहर प्रमुख सुनिल जाधव , शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...