Tuesday, December 30, 2025

देशी गायीच्या वासराचे बारसे वैराग्य मुर्ती ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या उपस्थितीत संपन्न,




नांदगाव (प्रतिनिधी) - भारतीय शेतीत गाय हा केवळ प्राणी नसून कुटुंबाचा सदस्य मानला जातो, असे अनेक कथा आणि लोकसाहित्यातून दिसून येते. गाय शेतकऱ्याच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे, जी त्याच्या शेतीला आणि कुटुंबाला आर्थिक व नैसर्गिकरित्या मदत करते. शहरातील इंद्रायणी नगर मधील निलेश काळे यांनी त्यांच्या कडील देशी गायीच्या वासराचे बारसे वैराग्य मुर्ती ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या उपस्थितीत करुन गोमाते विषयी आदरभाव व्यक्त केला. 
   हिंदू धर्मात गाईला माता म्हटले आहे. गाय माते प्रमाणेच तीच्या दुधापासून सर्वांचे पोषण करते. तिच्या पासून मिळणाऱ्या अनेक वस्तूंची उपयुक्तता सर्वातीत आहे. शेतकरी गाईला कुटुंबातील सदस्य समजून तिची सेवा करतात शहरातील इंद्रायणी नगर येथील शेतकरी तथा दुचाकी गॅरेजचे संचालक निलेश काळी यांच्या कडील देशी गाईने नुकताच एका वासराला जन्म दिला. परिवारातील सर्वांना आनंद झाला. वासराचे बारसे करावे अशी काळे परिवाराची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. अखेर तो योग जुळून आला. रविवार (दि.२८) रोजी सायंकाळी वैराग्य मुर्ती ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या उपस्थितीत गौरी या वासराचे पाळणा हलवून बारसे करण्यात आले. यावेळी नातेवाईक, आप्तेष्टांना, मित्र यांना आमंत्रित करण्यात येवून स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नांदगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे तथा वीस नगरसेवकांचा सत्कार काळे परिवाराच्या वतीने करण्यात आला. यावेळी जगनराव काळे, निलेश काळे, अनिल काळे, ओम काळे, गौरव काळे, कार्तिक काळे, शृती काळे, 
तथा काळे परिवार आणि इंद्रायणी नगर मधील तुलसी काळे, दिक्षा आदींसह इंद्रायणी नगर मधील रहिवासी नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, December 29, 2025

नांदगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार सागर हिरे यांनी स्वीकारला,






नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाने एकहाती सत्ता स्थापन केली होती.  नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांनी सोमवारी आमदार सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी चौकातील शिवस्फूर्ती प्रांगणात भव्य व उत्साहपूर्ण सोहळ्यात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांसह नांदगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षपदाची शपथ घेत सागर हिरे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
  नांदगाव शहरातील मायबाप जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासनही आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिले. लवकरच गिरणाधरणातून नांदगाव शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी चौकातील शिवस्फूर्ती प्रांगणात सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळेही लवकरच वसविण्यात येतील असं आश्वासन दिले. 
 कार्यक्रमात समृद्धी बँकेचे चेअरमन अंजुम कांदे, वाल्मिक जगताप, दत्तराज छाजेड, साईनाथ गिडगे, राजेंद्र पवार, विलास आहेर, रोहिणी मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यास माजी आमदार अॅड. अनिल आहेर, बापूसाहेब
कवडे, राजेंद्र पवार, अरुण पाटील, तेज कवडे, रमेश बोरसे, दर्शन आहेर, अर्जुन पाटील, समाधान पाटील, सतीश बोरसे, चेतन पाटील, बाळासाहेब कवडे, रमेश करवा, श्याम दुसाने, गोकुळ कोठारी, नूतन कासलीवाल, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच शिवाजी पाटील, नंदू पाटील, दत्तराज छाजेड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक शिवसेना शहराध्यक्ष सुनील जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर यांनी केले.


Wednesday, December 17, 2025

नांदगाव येथे ४६ वी कै.वा.श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न,






नांदगाव (प्रतिनिधी ) - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जेष्ठ रंगकर्मी कै.वा. पुरोहित यांच्या स्मरणार्थ या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते. हे या स्पर्धेचे ४६ वे वर्षे होते . अशा प्रकारच्या नाट्य स्पर्धा घेणारी महाराष्ट्र राज्यातील एकमेव संस्था ठरली आहे.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व बालवयातच या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनयाचे धडे मिळावे हा खरा स्पर्धेचा हेतू आहे. ह्या स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने व्ही.जे.हायस्कूल, नांदगाव येथे उत्सहात संपन्न झाले या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानी नांदगाव संकूलप्रमुख संजीव धामणे व प्रमुख पाहुणे  अभिनेते व निर्माते शाळेचे माजी विद्यार्थी योगेश निकम होते.ह्यावेळी मंचावर सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला , सहखजिनदार हेमंत देशपांडे ,स्पर्धा प्रमुख राहुल मुळे,राजेंद्र पांडे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरवातीला कै.वा. पुरोहित व नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी केले. ह्या स्पर्धेविषयी माहिती दिली व १९७७ पासून संस्थेत सुरु केलेल्या एकांकीका स्पर्धा , पर्यावरणपूरक शाडू माती गणपती स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विवीध उपक्रम आदींचा गौरवशाली इतिहास व ह्यासोबतच शाळा-शाळांतून संस्कारक्षम पिढी घडविणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचेही सांगितले. 
        कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शालेय तथा महाविद्यालयीन जीवनांतील आठवणींना उजाळा देत नाट्यविश्वातील स्वतःच्या आजवरच्या सर्व यशाचे श्रेय संस्थेच्या कै. वा.पूरोहीत एकांकीका स्पर्धेला देतांना ते शालेय जीवनातील आपल्या गुरुंविषयी आदर तथा संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाही ह्यावेळी विसरले नाहीत..; ह्यांतूनच त्यांनी वडील कै. मधुकर निकम ह्यांच्या स्मरणार्थ रु.११,०००/- देणगी संस्थेसाठी देत असल्याचे जाहीरही केले.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव धामणे ह्यांनी प्रथमच नांदगाव संकूलाला संस्थास्तरावरील कै. पुरोहीत नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान दिल्याबद्दल आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ह्यावेळी संस्थेला धन्यवाद दिले.व या स्पर्धेतून विद्यार्थांना त्यांच्या अभिनय कलेला चांगली संधी मिळते अशा विविध उपक्रमाचे कौतुक केले.  
     शेवटी उपस्थित मान्यवर व योगेश निकम ह्यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून संस्थास्तरावरील ४६ व्या एकांकीका स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली झोडगेकर ह्यांनी केले व पाहुण्याचा परिचय राहुल मुळे यांनी करून दिला व आभार मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे यांनी मानले.  
    ह्या उद्घाटन समारंभ व स्पर्धा यशस्वितेसाठी संकूल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्याध्यापक.डॉ. नांदुरकर, नांदगाव संकूलाचे स्पर्धाप्रमुख विजय चव्हाण ह्यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षीका,
शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर नांदगाव संकुलाच्या एकांकिकाना सुरवात झाली . 
     सर्वप्रथम कि.माध्य.विद्यालय वाखारी ह्या शाळेची स्वप्निल महाले दिगदर्शित “शेवटची हाक पृथ्वीची” हि एकांकिका सादर झाली. 
       माध्य.विद्या.सावरगाव श्री भरत काकळीज दिग्दर्शित “शाळेने गाव तेथे गोंधळ” ही एकांकीका सादर केली व्ही.जे.हायस्कूल शाळेने गिरीजा वाघमारे लिखीतव सौ. रूपाली झोडगेकर दिग्दर्शित “दृष्टीकोन” तर सरस्वती विद्यामंदिर,मनमाड ह्या शाळेन श्रीम. धनश्री अहिरे दिग्दर्शित “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” ही एकांकीका सादर केली.शेवटी छाजेड विद्यामंदिर शाळेने “WWW गणोबा .COM”हि दिपक नारळे दिग्दर्शित एकांकिका सादर केली. सरस्वती विद्यालय,मनमाड ह्या शाळेने सादर केलेली धनश्री अहिरे दिग्दर्शित “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” ह्या एकांकिकेला संकुलातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या सर्व एकांकिकांना चांगला प्रतिसाद मिळाला. आलेल्या परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले प्रथम आलेल्या एकांकिकेला आलेले मान्यवर परीक्षकांच्या ह्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

न्यू इंग्लिश विद्यालयात कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे साहेब यांची पुण्यतिथी!! १९७१ च्या युध्दात भारतानं मिळवलेल्या ऐतिहासिक ' विजय दिन ' साजरा,







नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयामध्ये कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे साहेब यांचा पुण्यतिथी निमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन व १९७१ च्या युध्दात शहीद झालेल्या भारतमातेच्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पण मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.
      उपशिक्षिका सुनिता निकम यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे साहेब यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देताना म्हणाल्या की, कर्मवीर हांडे साहेबांनी 'ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे'हे ध्येय समोर ठेवून त्यांनी संस्थेच्या शाळा, महाविद्यालय व वसतिगृहांचा ग्रामीण व आदिवासी भागात विस्तार केला.
     इगतपुरी चा 'भाग लढा' हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना होय. तत्कालीन मुंबई राज्याच्या सरकारने गुजरातच्या शेतकऱ्यांना तांदळाचा भाव जास्त तर महाराष्ट्राचा शेतकऱ्यांना कमी भाव दिला. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला.
      अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी कर्मवीर हांडे साहेबांचा जीवनप्रवास म्हणजे, कोणतेही श्रेय न घेता केवळ कार्य करत राहणे. निस्वार्थी सेवा, कठोर परिश्रम आणि शैक्षणिक कार्याप्रती असलेली निष्ठा यामुळे मविप्र संस्था आज लाखो विद्यार्थ्यांना आज ज्ञानदान करत आहे.
     ' विजय दिवस ' १९७१ च्या भारत- पाकिस्तान युध्दात भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या दिवस भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य, पराक्रम आणि बलिदान यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.





Thursday, December 11, 2025

न्यू इंग्लिश शाळेत आद्यसंस्थापक, सत्यशोधक कर्मवीर गणपत दादा मोरे यांची जयंती साजरी !!






नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव येथील  मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल  विद्यालयात कर्मवीर गणपत दादा मोरे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे , उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते संपन्न झाले. 
     विद्यालयातील उपशिक्षक राजेंद्र कदम यांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांचा कार्याचा परिचय करून देताना दादांनी आयुष्यभर शिक्षण ,शेती, श्रमसंस्कार ,सामाजिक न्याय या हक्कासाठी अखंड संघर्ष केला. शिक्षण हे फक्त पुस्तकी न राहता ते जीवनाला दिशा देणार असावं अशी कर्मवीर दादांची धारणा होती. 
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे यांनी आपल्या मनोगततून कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी बहुजन समाज शिक्षित व्हावा आणि त्यांच्यातील अज्ञान दूर व्हावे यासाठी सत्यशोधक जलशांद्वारे मोठी चळवळ उभी केली.ते केवळ एक व्यक्ती नव्हते ,तर ती एक संकल्पना होती-संघर्षाची, शिक्षणाची आणि सामाजिक जागृतीची. असे प्रतिपादन केले.
   याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
     



Wednesday, December 10, 2025

नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी निवेदनाव्दारे मागणी,







नांदगाव (प्रतिनिधी ) - सटाणा तालुक्यातील खतमाणे येथील नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने अमानुषपणे अत्याचार केल्याच्या निषेधार्थ येथील नाभिक समाज बांधवांनी  पोलीस निरीक्षक दिंगबर भदाणे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सटाणा तालुक्यातील खतमाणे येथील नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती कडून अमानुषपणे अत्याचार करण्यात आला आहे. नाभिक समाजातील मुलीवर अत्याचार करुन सदरचे प्रकरण दडपण्यासाठी व समाजातील गुंड प्रवृतीच्या व्यक्तीला वाचविण्यासाठी गावातील पुढारी व इतर प्रयत्न करीत आहेत. सध्या सगळीकडे अज्ञान मुर्तीवर अत्याचार होत आहेत. नाभिक समाजातील एकमेव घर असलेल्या कुटुंबियांवर गावगुंडाकडून दमदाटी, धमकी, तसेच जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देण्यात येत आहे. या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई कारवाई करावी ,यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी व शासनाने या नराधमास कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी विजय निकम, रविंद्र बिडवे , दिपक झुजाराव, सतिष बिडवे, ज्येष्ठ सुरेश निकम , नरेंद्र निकम, सुनिल निमराने,  दिपक निकम, राजु निकम,  युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल जाधव,  कृउबा संचालक अमोल नावंदर,नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Thursday, December 4, 2025

नॉयलन मांजा वापर टाळावा, पर्यावरणास धोकादायक - मुख्याधिकारी शामकांत जाधव





नांदगाव (प्रतिनिधी ) -  नायलॉन मांजा पर्यावरणास धोकादायक असून नायलॉन मांजावर बंदी आहे. त्याची विक्री आणि वापर करू नये, नायलॉन मांजा पर्यावरणासाठी आणि सजीवांसाठी धोकादायक आहे, मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन नांदगाव नगरपरिषद मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी केले आहे. मांजा बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी नांदगाव शहरात पथक स्थापन करून जनजागृतीसह कारवाई केली जाणार आहेत. कोणीही प्रतिबंधित मांजाची विक्री, उत्पादन, साठा, पुरवठा व वापर करणार नाही, याची दक्षता ही पथके घेणार आहे. तसेच, नागरिकांच्या तक्रारी स्विकारणार आहे . मांजाबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले आहे. सध्या पतंग उडविण्यासाठी  मांजा वापरला जातो, पण नॉयलन मांजा मुळे गंभीर स्वरूप च््यया  शारीरिक इजा झाल्या आहेत. आता नगरपरिषद प्रशासन यांवर लक्ष केंद्रित असून वापरास बंदी असलेल्या मांजा जप्त करून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

Tuesday, December 2, 2025

नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत एकुण ६०.१८ टक्के मतदान, घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला ?









नांदगाव ( प्रतिनिधी) -   नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी शांततापूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकुण ६०.१८ टक्के मतदान  
 झाले. नगराध्यक्ष आणि २० सदस्य अशा जागांसाठी ही निवडणूक होत असून, कुठलाही अनुचित प्रकार न होता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नवमतदारांनीही मोठ्या उत्साहाने यात सहभाग नोंदवला होता. प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे.
    सकाळी मतदान केंद्रात महिला व पुरुष मतदार मतदानासाठी आले असता, बूथवर मतदार यादीमध्ये नावे शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदान केंद्रात मतदान सुरू झाल्यापासून सकाळी नऊपर्यंत संथगतीने मतदान सुरू असल्याचे दिसून आले. दुपारच्या
सत्रात मतदानाचा वेग वाढल्याने, उर्वरित वेळेत अंतिम मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. नांदगाव शहरातील कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, एच.आर .उर्दू हायस्कूल,  शासकीय आयटीआय, गांधीनगर शाळा, व्ही. जे. हायस्कूल, जुने तहसील कार्यालय, शहरातील व परिसरातील २३ मतदान केंद्रांत व बूथवर युवक, युवती, महिला, पुरुष, व ज्येष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी गर्दी केली होती. तसेच सेल्फी काढण्यासाठी मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. उमेदवारांचे कार्यकर्ते मात्र मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. शहरात राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी विविध पक्ष आपले कार्यकर्ते व नेत्यांकडून परिस्थितीचा अंदाज घेत होते. यंदा मात्र ९ % मतदान टक्केवारी घटली आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसतो यांचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. काही ठिकाणी मतदानाचे नांव सापडत नसल्याने मतदार संतापले होते. त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. खोली क्रमांक चुकल्याने काही ना पुन्हा पुन्हा चिठ्ठी बदलण्यासाठी धावपळ करावी लागली.  येवला रोड मतदान केंद्रावर सायंकाळी साडेपाचनंतर मतदारांनी गर्दी केल्याने याठिकाणी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.


नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...