Tuesday, June 24, 2025

आदिवासी गरोदर महिलेला दिवसभर ताटकळत बसून ठेवले , नांदगाव शासकीय ग्रामीण रुग्णालयात संतापजनक प्रकार,






नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका आदिवासी गरोदर महिलेला अनेक तास बसून ठेवून , नंतर तिची फाइल बघून पेशंटचे रक्त चेक करावे लागेल असे कारणे सांगून दिवसभर ताटकळत बसविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील  डॉक्टरांनी सायंकाळी नातेवाईकांना सांगितले की, येथे प्रसूती होणार नाही. या संतापजनक प्रकाराची माहिती मिळताच युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान यांनी सोबत कार्यकर्ते घेऊन संबंधित डॉक्टरांना जाब विचारत धारेवर धरले. यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
     जामधरी येथून सोनाली आकाश मोरे (वय १९)हिला शनिवारी (दि.२१ ) सकाळी सहा वाजता प्रसूतीसाठी आणले असता,  तिला प्रसूतीसाठी दाखल न करताच तिला रुग्णालयाच्या बाहेरच बसून ठेवण्यात आले.  पेशंटचे रक्त चेक करावे लागेल, रक्त द्यावे लागेल आदी कारणे सांगून दिवसभर ताटकळत बसविले. महिलेची सीजर करावे लागणार असल्याचे डॉक्टरने सांगितले. सीजर करण्यासाठी आमच्याकडे प्रसुतीतज्ञ नाहीत. असे कारण सांगून या गरोदर महिलेला मालेगांव येथे जाण्याचा अजब सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आला. पेशंटला दिवसभर उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली..
नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी रुग्ण दाखल असतानाही डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत होते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही वेळ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर ऐकत नसल्याने युनासेना जिल्हाप्रमुख फहरान खान यांनी ग्रामीण रुग्णालयात तात्काळ धाव घेत प्रसुतीसाठी आलेल्या सोनाली आणि त्यांच्या कुटुंबाशी चर्चा केली. फरहान खान यांनी येथील डॉ. शांताराम राठोड यांच्याशी चर्चा करतांना डॉ.राठोड आणि अतुल आठवले हे दोन्ही मद्यप्राशन केलेले आढळून आले. नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील एका डॉक्टरने मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर असताना प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांना ताटकळत ठेवल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यात प्रत्ययास आला आहे. या घटनेची दखल घेवून शिवसैनिकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला. संबंधित डॉक्टरला चोपही देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची माहिती फरहान खान यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे यांच्या कानावर घातली व त्यातील काही व्हिडिओ त्यांना बघण्यासाठी पाठविले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे यांनी डॉ. शांताराम राठोड यांच्यासह प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. काजल तुसे, परिचारिका गिरीजा कुलकर्णी व कर्मचारी अतुल आठवले या चौघांवर निलंबनाची कार्यवाही करणार असल्याची माहिती दिली. फरहान खान यांनी प्रसुतीसाठी आलेल्या सोनाली आणि त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करत त्यांना धीर दिला. यावेळी प्रसुती करण्यासाठी डॉ. तुसे यांना तातडीने बोलविण्यात आले आणि रात्री १० : १५ वाजता सोनालीची नॉर्मल प्रसुती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान सोनालीच्या आईने नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.



ऑलम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी खेळाडूंनी सोशल मीडियापासून लांब रहावे – प्राचार्य डॉ. आर. एन भवरे,






नांदगाव (प्रतिनिधी ) -  नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे २३ जून  रोजी सकाळी आठ वाजता महाविद्यालयाच्या गेट पासुन ऑलम्पिक दिन रन वॉकची सुरुवात करण्यात आली. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे, उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे , डी. एम. राठोड, क्रीडा संचालक  एल. एम. गळदगे, SDO प्रमुख डॉ. ए. न. मदने, NSS समन्वयक बी. पी. मोरे. ई. मान्यवर उपस्थित होते.
या ऑलम्पिक दिवसाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम बीएससी वर्गाचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ऑलम्पिक दिन रन अँड वॉक स्पर्धा संपल्यानंतर डॉ. आर. एन. भवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना ऑलम्पिक स्पर्धेचे महत्व, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी करावे लागणारे कष्ट व आजच्या खेळाडूची स्थिती यांची माहिती उदाहरणासह देवून, सध्याच्या युवकांना मैदानावर खेळण्यासाठी यावे. यासाठी सोशल मिडिया पासून लांब राहण्यास सांगून प्रोत्साहन दिले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक एल.एम गळदगे, डी. एम. राठोड , दिलीप आहेरराव यांनी प्रयत्न केले.

Wednesday, June 18, 2025

नांदगाव शहरातील अहिल्यानगर ( हमालवाडा ) रहिवाशांचे नगरपरिषदला विविध समस्यासाठी निवेदन,






नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील अहिल्यादेवी नगर ( हमालवाडा) ,  कैलासनगर,आनंदनगर या परिसरातील काही स्ट्रीट लाईट बंद असून, त्यामुळे खूप अंधार हा परिसरात राहत आहे.  त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढत आहे . तसेच या  भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. औषध फवारणी करण्यात यावी . कारण विविध प्रकारच्या डासाने लोंकाना त्रास होत आहे. तसेच परिसरात गवत खूप असल्या कारणाने रात्री अपरात्री साप निघत असता तरी तात्काळ यावर योग्य ती कारवाई करावी ही विनंतीचे निवेदन नांदगाव नगरपरिषद ला देण्यात आलं. या प्रसंगी बिरू शिंदे, शरद आयनोर, गंगाधर कर्नर , विनायक भावसार, विश्वास वाघ, रवि शिंदे व इतर नागरिक उपस्थित होते.

Monday, June 9, 2025

नांदगाव येथील जायंटस ग्रुप अॉफ सहेलीच्या वतीने गरजू शालेय विद्यार्थ्यांना चप्पल जोड वाटप,






नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच  सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून जायंटस ग्रुप अॉफ सहेलीच्या वतीने सामाजिक कार्य करत वस्तीवर जाऊन गरजू शालेय विद्यार्थ्यांना चप्पल जोड वाटप करण्यात आले. लहान मुले - मुली गरीब असल्याने यावेळी संस्थेने मदतीचा हात पुढे केला. प्रत्येक वेळी गरज पडली तर आम्ही मदत करू असे आश्वासन दिले. जायंटस ग्रुप सहेली यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी  जायंटस ग्रुप अॉफ सहेलीच्या अध्यक्षा वैशाली दुसाने , सदस्य भारती बोरसे , पुष्पा दुसाने,  वाघ मॅडम  , शाळेतील शिक्षकांसह आदीची उपस्थिती होती.




Tuesday, May 13, 2025

नांदगावमधील सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल शाळेचा १००% निकाल,







नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव येथील श्री.माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्यू.संस्थेच्या सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयाचा एस .एस. सी परीक्षा २०२५ चा १००% निकाल लागला आहे. 
सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयातील कु. वाबळे पूनम संदीप ९३.६० टक्के गुण मिळवून प्रथम ,  कु. खैरनार ओम वाल्मीक ९२. ६० टक्के  द्वितीय तर तृतीय क्रमांक कु. क्षीरसागर ओमकार किशोर ९१.८० %,  तसेच कु. राऊत प्रेरणा गणेश ९१.२० टक्के चतुर्थ तर कु. शिंदे संस्कार सागर ९१.०० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला. यावर्षी परीक्षेस एकुण १११ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. सर्व यशस्वी विद्यार्थी , शिक्षक ,  मुख्याध्यापक यांचे संस्थेचे चेअरमन श्री.सुनीलकुमार कासलीवाल, सचिव श्री . विजयकुमार चोपडा, सहसचिव सौ. प्रमिलाताई कासलीवाल, श्री. रिकबकाका कासलीवाल, सुशिलभाऊ कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्रभाऊ चांदीवाल, मार्गदर्शक श्री गुप्ता सर , प्राचार्य मनी चावला , मुख्याध्यापक (माध्य.) श्री. शरद पवार ,गोरख डफाळ, मुख्याध्यापक (प्राथ) विशाल सावंत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







नांदगाव येथील उर्दू माध्यमाच्या दहावी परिक्षेत यंदाही मुलींची बाजी, शाळेचा निकाल १००% ,







नांदगाव ( प्रतिनिधी ) -  नांदगाव येथील उर्दू माध्यमाच्या एच.आर. हायस्कूलच्या एस.एस.सी. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही एच. आर . हायस्कूलच्या दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यंदा ही मुलीने परिक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. यामध्ये  अनम शेख गालिबने 88.20 टक्के गुण मिळवून  पहिला ,  अमारा आसिफ शेखने 84.40 टक्के गुण मिळवून दुसरा , तर  आयशा शेख अफझलने 83.40% गुणांसह तिसरे स्थान पटकावले. परिक्षेत यशाबद्दल शाळाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना मनापासून अभिनंदन केले. 


Monday, May 5, 2025

नांदगाव महाविद्यालयाचा एच.एस.सी. इयत्ता बारावी निकाल 92.87%,






नांदगाव (प्रतिनिधी) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा  फेब्रुवारी / मार्च  २०२५ मध्ये घेण्यात आली होती . यात इयत्ता 12 वी परीक्षेच्या पर्यवेक्षक अंतर्गत बदल केल्यानंतरही नांदगाव महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम राखण्यात यश आले आहे.  कला शाखेचा निकाल 82.60%, वाणिज्य शाखेचा निकाल 98.93% व विज्ञान शाखेचा निकाल 99.57% लागला असून ,  कला शाखेत प्रथम कु. शिंदे मनीषा भास्कर 79.50% , द्वितीय कु. गीते जयश्री अनिल 73.83% तृतीय कु. शिंदे मेघा पुंडलिक 73.33% वाणिज्य शाखेत प्रथम कु. कलंत्री पार्थ महेंद्र 85.17%, द्वितीय-जोशी अथर्व दिनेश 82.50%, तृतीय कु. साळुंखे रोहिणी श्रावण 78.67% तर विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थ्यांनी कुमावत दर्शनी विनायक 82.17%, द्वितीय सोनवणे श्रुती रावसाहेब 80.67% तर तृतीय शेख सिमरन शफिक 77.67 % मिळून उत्तीर्ण झाले आहेत. या महाविद्यालयात एकूण एच. एस.सी. परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2025 साठी 533 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते.  त्यापैकी 495 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे . महाविद्यालयाचा एकूण निकाल 92.87% लागला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज नांदगाव तालुका संचालक श्री अमितभाऊ बोरसे (पाटील) व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन. भवरे यांनी अभिनंदन केले आहे.  तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...