Sunday, July 28, 2024

नांदगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांत विकासकामांचे सौ. अंजुम कांदे यांच्या हस्ते लोकार्पण,




नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी ) - जे छोटे -छोटे समाज विखूरलेले होते, त्यांना या विकासकामांच्या माध्यमातून आमदार सुहास अण्णांनी एकत्र आणले. ही त्याचीच फलश्रुती आहे की, तुम्ही सर्व बारा बलुतेदार आज या सभामंडप लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने एका छताखाली जमा झालात. असे प्रतिपादन समाजसेविका सौ. अंजुम सुहास कांदे यांनी केले.
   नांदगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांत विकासकामांचे लोकार्पण करण्यातआले.त्यात माणिकपूंज, चांदोरे, व पळाशी येथे ३३ लाख ७५ हजार रुपये खर्चाच्या तीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करण्यात आले, तर न्यायडोंगरी येथे बारा बलुतेदार समाजाच्या बहुउद्देशीय कामासाठी बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण करण्यात  आले. त्यावेळी सौ. कांदे बोलत होत्या.
   यापूर्वीच्या आमदारांनी  तालुक्याच्या ठिकाणी ठराविक कामे केली, मात्र गावांमध्ये पाच लाखाचे ही काम केल्याचे उदाहरण कुणी देत नाही. मात्र आमदार सुहास अण्णांनी लाख सोडाच, कोटीचे ही आकडे मागे सोडलेत. आज एकही वस्ती, वाड्या, गाव असे नाही की, जेथे दोन कोटी पेक्षा कमी काम झालेय. शेकडो कोटीच्या पाणी योजना अंतिम टप्यात आहेत. सामाजिक अस्मिता जपण्यासाठी ही करोडो रुपये खर्च केलेत. असे ही सौ. कांदे शेवटी म्हणाल्या.
.    यावेळी सौ. कांदे यांच्या हस्ते शेकडो गरजू महिला, तरुणांना जातीच्या दाखल्यांचे घरपोहोंच वितरण करण्यात आले.
.   यावेळी माजी सभापती विलासराव आहेर,किरण कांदे,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्या जगताप, संगीता बागुल, रोहिणी मोरे,अँड. विद्या कसबे,नरेंद्र आहेर,मुख्यसेविका श्रीमती जयश्री गवळी,उज्वला मिस्त्री, प्रदीप थोरात, अशोक कोल्हे, प्रकाश आव्हाड, प्रवीण घोटेकर, कविता राऊत, सोनाली जाधव,शाईनाथ रामकर, रामदास आव्हाड, सुकदेव मेंगाळ,खंडू घोटेकर, साकृबाई मेंगाळ, समाधान वाघ, शबीर शेख, धर्मा आव्हाड, अलका कोल्हे, किरण मोहिते, सुवर्णा वाघ, जालम आहेर, राजू तीळवणे, विजय आहेर, सुभाष नहार,विजय निकम, दत्तू लाड, योगेश जाधव, प्रशांत सोनावणे, शशी सोनावणे, बाबासाहेब कदम, भावराव बागुल,संतोष कांदे,बाबा ढोमसे, दीपक शेलार, सिद्धेश खरोटे, सद्दाम शेख,शलैश मिस्त्री आदी सह शेकडो ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.



Saturday, July 27, 2024

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल,





नांदगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या शुक्रवार दि.  २६ जुलै रोजी होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात राज्यात अनेक जिल्ह्यांत होणाऱ्या अतिवृष्टी मुळे बदल करण्यात आला आहे. अशी माहिती नांदगाव तालुका गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी सोशल मिडियाला दिली आहे. त्यानुसार १० वी चा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२ (७२-२) शुक्रवार दि. २६/०७/२०२४ रोजी सकाळ सत्र ११-०० ते १-०० होणारा पेपर नवीन वेळापत्रकानुसार. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२(७२-२) हा पेपर बुधवार दि.३१/०७/२०२४ रोजी सकाळ सत्र ११-०० ते १-०० वाजता होणार आहे. तर बारावीचा शुक्रवार दि.२६/०७/२०२४ रोजी सकाळ सत्र ११-०० ते २-०० या वेळेत होणारा पेपर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (५१) व अर्थशास्त्र व तंत्रज्ञान (६२),
एम.सी.व्ही.सी.पेपर-२ EB to XB-२० विषय हे पेपर आता नवीन वेळापत्रकानुसार शुक्रवार दि. ९/०८/२०२४ रोजी सकाळ सत्र ११- ते २-००या वेळेत संबंधित केंद्रावर आयोजित करण्यात आला आहे.
यांची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. व वरील बदल झालेल्या वेळापत्रकाची झालं घेऊन परीक्षार्थीनी झालेल्या बदलानुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे मेधा निरफराके सहसचिव राज्य मंडळ, पुणे -४ व नांदगाव तालुका शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी कळविले आहे.

नांदगाव पंचायत समिती कार्यालयावर आधारवड संस्थेच्या वतीने ५ ऑगस्टला बिऱ्हाड मोर्चा निघणार,







नांदगाव (प्रतिनिधी) - शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व पुरुषांच्या अपघाती विमा चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, थकीत इंधन बिल व मानधन दर महिन्याला देण्यात यावे
कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये. दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे यासह अनेक समस्या सोडवण्यासाठी येत्या ५ ऑगस्ट रोजी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदगाव पंचायत समितीवर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संगिता सोनवणे यांनी दिली . संस्थेच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
                  शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला पुरुषांच्या अनेक समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक आंदोलन करण्यात आले आहे. त्याचा राज्य सरकारने सरकारने विचार करुन पगारात वाढ करण्यात आली . मात्र आमच्या इतर मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. त्या सोडवण्यासाठी आम्ही लढत आहोत याचाच भाग म्हणून आम्ही आता येत्या ५ ऑगस्ट रोजी बिऱ्हाड आंदोलन करणार असल्याचा निर्णय  बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संगिता सोनवणे यांनी दिली आहे. या बैठकीत नांदगाव येवला मनमाड मालेगाव तालुक्यातील शालेय पोषण आहार समितीच्या सदस्य उपस्थित होत्या. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मोर्चा करण्यासाठी व बिऱ्हाड आंदोलन करण्यासाठी तालुक्यातील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सदस्यां उपस्थित राहणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष संगिता सोनवणे सचिव आशा काकळीज, सरला मोढे ,संगिता कुलकर्णी, संगिता मोकळ,शोभा भोसले, ज्योती मोरे, पुष्पा वाघ,मनीषा भाबड,रत्ना सोनवणे, योगिता सोनवणे, अलका आयनोर,नफिसा शेख,येवला तालुक्यातील संजय जमधाडे, सुनील उशिरे यांच्यासह शेकडो शालेय पोषण आहार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, July 25, 2024

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केली रेल्वे समस्येबाबत चर्चा,

मनमाड (विशेष प्रतिनिधी ) - दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी दि. 25 जुलै रोजी नवी दिल्ली येथे रेलभवनात रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मतदार संघातील रेल्वे संबधी विविध समस्यावर चर्चा केली. यात मतदार संघातील नागरिकांना प्रवासी सुविधा पूर्ववत करण्यात याव्यात. तसेच मतदार संघातील विविध रेल्वेसाठी थांबे यावर चर्चा करण्यात आली.  काही रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात याव्यात असे विषय समाविष्ट होते. खासदार भास्कर भगरे यांनी खासदार झाल्या पासून अनेक विषय केंद्र व राज्य स्तरावर मांडून मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक प्रचारात त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आश्वासन दिले होते. मनमाड़ येथे नवीन प्रस्तावित एलएचबी पीओएच कारखान्यासाठी मंजूरी देण्यात यावी. हा कारखाना झाला तर अनेक युवकांना रोजगार मिळेल. केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना मनमाड़च्या रिक्त जागा भरण्यात याव्या. केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना मनमाड़ला भरपूर वर्कलोड देण्यात यावा अशा विविध विषयांवर रेल्वेमंत्री 
अश्विनी वैष्णव यांचेशी चर्चा केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व विषयावार सकारात्मक चर्चा केली. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

नांदगाव तालुक्याला पीक विम्यापोटी सुमारे १२५ कोटी रुपये मंजूर, शेतकऱ्यांकडून आमदार सुहास कांदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त,






नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका दृष्काळ सदृश्य जाहीर केला, मात्र शेतकऱ्यांना कुठलीही सवलत किंवा आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. याची दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे नांदगाव तालुक्याला पीक विम्यापोटी सुमारे १२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
     दृष्काळ सदृश्य तालुक्याना मदत देण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नसल्याने तालुक्यात मोठा गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.विरोधकांकडून याचे राजकीय भांडवल तयार केले जात होते.दृष्काळी तालुके जाहीर झाल्यानंतर शेजारच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक सवलती व आर्थिक मदत मिळाली. मात्र खऱ्या अर्थाने दृष्काळी असतानाही माझ्या तालुक्यावर अन्याय का.? असा सवाल करत आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन विमा कंपनी व राज्य शासनाला प्रतिवादी बनवत माझ्या तालुक्यातील शेतकरी बांधवाना ही आर्थिक मदत मिळाली पाहिजे असा आग्रह धरला.
  आमदार सुहास कांदे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील जेष्ठ वकिलांनी भक्कम बाजू मांडली. अन नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य शासन व संबंधित पीक विमा कंपनीकडून नांदगाव तालुक्याला सुमारे १२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Sunday, July 21, 2024

आपापसातील गटतट विसरून विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे - सौ. अंजुम कांदे यांचे प्रतिपादन,






नांदगाव (प्रतिनिधी) - आजमितीस नांदगाव मतदार संघातील एकही गाव असे नाही की, जेथे आमदार सुहास अण्णाचे काम पोहचले नाहीये.कुठलाच भाग दुर्लक्षित केला नाही.आनंदनगर मध्ये काम करण्यास उशीर झाला.याचे कारण तुम्हाला माहित आहे. आपापसातील हेवेदावे विसरून जावेत. म्हणजे कामे लवकर होतात. असे प्रतिपादन समाजसेविका सौ. अंजुम सुहास कांदे यांनी केले.
    नांदगाव शहरातील आनंदनगर मध्ये भूमिगत गटार, व काँक्रिटिकरण,चांडक प्लॉट ते शहराला जोडणारा पुलाचे भूमिपूजन,चांडक प्लॉट मध्ये श्रीराम मंदिर सभामंडप लोकार्पण,व महाजन वाडा येथे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन सौ. कांदे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
    जी जी कामे तुम्ही सुचवली,त्यातील बरीचशी पूर्ण झाली आहेत.तर काही प्रगतीत आहेत.आणि नवीन कामांना मंजुरी मिळाल्याने त्यांचे आज भूमिपूजन करण्यात आले. आणि शहराच्या,नगराच्या,वस्तीच्या विकासासाठी आपापसातील गटतट विसरून एकत्र या.! आमच्याकडे कुठलाही जातीभेद,धर्मभेद केला जात नाही. मूलभूत व प्राथमिक गरजा मिळवणे हा तुमचा जसा हक्क आहे, तसे ते आमचे कर्तव्य आहे. असे सौ. कांदे शेवटी म्हणाल्या.
    यावेळी महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष रोहिणी मोरे, शहर अध्यक्ष सुनील जाधव, रिपाई शहरप्रमुख महावीर जाधव, माजी नगरसेवक सौ. कामिनी साळवे, अँड. सचिन साळवे, अँड. विद्या कसबे, मुज्जू शेख, अय्याज शेख, अरुण साळवे, महेंद्र गायकवाड, माया शेळके, नेहा कोळगे, विद्या शिंदे, अलका पवार, बाळू इप्पर, कचेश्वर गिते, नितीन जाधव, सुरेखा सानप, गीता शिंदे, संगीता निकम, नयना खटके, योगिता बच्छाव, भारती बोरसे, दिपक सोनावणे, बाळासाहेब मोरे, निलेश काळे,मोती शेख, निर्मला केदारे, हेमंत शिंदे, समाधान शिंदे, बिरू शिंदे, तानसेन जगताप, आदीसह आनंदनगर,चांडक प्लॉट, महाजन वाडा परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

Monday, July 15, 2024

नांदगावच्या जे. टी.कासलीवाल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा उत्साहात,




नांदगाव( प्रतिनिधी) -  नांदगाव येथील जे. टि कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. विठूमाऊलीच्या अभंगावर ठेकाधरत बालवारक-यांनी दिंडी उत्सवात साजरी केली. स्कूलचे प्राचार्य  मणी चावला यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये समूह नृत्य,गोल रिंगण, वारकरी पाऊली इ. विद्यार्थ्यांनी माऊली माऊली चा गजर करत,विठ्ठल नामाची शाळा भरवली,पंढरी पंढरी अभंग गात ,पाऊली खेळत आपला उत्साह द्विगुणीत केला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संत गोराकुंभार हे विठ्ठल भक्तीत कसे दंग होतात हे समूह नृत्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर रित्या दाखविले.यानिमित्ताने पाणी वाचवा हा संदेश एक नाटिकेच्या माध्यमातून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिला. कार्यक्रमाच्यावेळी स्कूलचे प्राचार्य मणी चावला उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुख सौ.सुवर्णा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षकांनी मिळून केले होते. 
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा,प्रमिलाताई कासलीवाल,  विश्वस्त जुगलकिशोरजी अग्रवाल, महेंद्र चांदीवाल ,रिखबचंद कासलीवाल,सुशीलभाऊ कासलीवाल  प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता ,प्राचार्य मणी चावला सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Friday, July 12, 2024

नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे विविध कार्यक्रम सौ. अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत संपन्न,


पिंपरखेड ( प्रतिनिधी)- नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे हे तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करून काम करत आहेत. मूलभूत सुविधा पुरवून, तुमची सामाजिक अस्मिता जपण्याचे ही काम आपले कुटूंबप्रमुख म्हणून ते करत आहेत. आणि वेळोवेळी जाहीर होणाऱ्या शासकीय योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणीकरण्यासाठी ते स्वतः झटत असून, मला ही कामाला लावतात असे प्रतिपादन समाजसेविका सौ. अंजुम कांदे यांनी केले.
. नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या आटकाट तांडा श्री. हनुमान मूर्ती, संत सेवालाल महाराज प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महिला वर्गाला लडकी बहीण योजनेचे अर्ज वितरित करण्यात आले.त्यावेळी सौ. कांदे बोलत होत्या. पिंपरखेड येथील तांडा वस्तीवर या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास उपस्थिती लावल्यानंतर वरील उपक्रम राबवण्यात आला. या योजनेची सविस्तर माहिती देऊन सौ. कांदे यांनी उपस्थित महिलांना मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
   तत्पूर्वी सौ. कांदे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद सामाजिक संस्था पोहरे (ता. चाळीसगाव ) व पिंपरखेड ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी किरण कांदे, गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले,बाजार समितीचे उपसभापती दीपक मोरे, संचालक जीवन गरुड,पिंपरखेड च्या सरपंच सौ. मंजुषा गरुड,शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौ. उज्वला खाडे, शहरप्रमुख रोहिणी मोरे, पत्रकार संतोष कांदे, निशा चव्हाण, भारती बागोरे, नवनाथ सोमवंशी,अँड. बाळकृष्ण कावळे,एन.के.राठोड, राजू मवाळ, माधव गरुड, श्री. देशमुख, आबा शिंदे, वसंत जाधव, रमेश काकळीज,काकासाहेब सोनावणे,दीपक शेलार,भावराव बागुल, सद्दाम शेख,आदी उपस्थित होते.

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....