Monday, June 30, 2025

शहरातील रस्त्यांवर जनावरे मोकाट, वाहने सुसाट, नगरपालिका प्रशासन कधी लक्ष देणार?





नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील मुख्य मार्गावर, चौका -  चौकात अशा मोकाट मुकी जनावरे फिरताना व रस्त्यावर मधोमध बसत असताना वाहनचालक, महिला, वय वृद्ध व्यक्ती यांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहे. परिणामी वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच छोट्या- मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नगर पालिकेकडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही मोहीम राबविली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु, रस्त्यावरच मोकाट जनावरे उभी राहत असल्याने पादचा-यांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.  परंतु, नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. ज्या व्यक्तीचे ही जनावरे आहेत त्यांवर प्रशासन कारवाई कधी करणार अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मोकाट जनावरे मुळं एखाद्या व्यक्तीचा जीव जावू शकतो. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यांवर लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नांदगाव शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी,







नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण देण्याबाबत ची मागणी केली आहे. मतदार संघातील नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा गांधी,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा ज्योतिराव फुले,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण नसल्यामुळे पुतळ्यांची विटंबना होऊन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे सदर पुतळ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.
     सोमवारी दि.  ३० जून रोजी पहाटे एका मनोरुग्ण महिला द्वारे अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या सुशोभीकरणाचे लाईट तोडण्यात आले असून,  यामुळे स्मारकाचे विटंबन व नुकसान झालेले आहे . यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असून धनगर समाजात तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे. सदर घटनेत महिला वेडसर असल्याने समाजाने सामंजसाची भूमिका  घेतली असली तरी यापुढे असे गैरकृत्य होऊ नये याची काळजी म्हणून यास संरक्षण मिळावे म्हणून आमदार सुहास कांदे यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साईनाथ बिडगे,  माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, चंद्रशेखर कवडे, युवासेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे, त्र्यंबक शेरमाळे, राजेश शिंदे, बिरू शिंदे, शरद आयनोर ,सुनील नेमणार, शुभम शिंदे, दीपक बनगर,  निवृत्ती शिंदे , डॉ.गणेश चव्हाण,  विकी सोर,  भिका खटके , चांगु खेमनार,  जय तांबे,  संतोष सोर , महिंद्र गायकवाड, तानसेन जगताप उपस्थित होते.




Sunday, June 29, 2025

नांदगावचे विशाल वडघुले हे आम आदमी पक्षाच्या जिल्हासंघटक पदावर, शिवसेना ठाकरे पक्षाकडून सत्कार !






नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहराच्या व तालुक्याच्या विविध प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेऊन त्या प्रश्नाची उकल करणारे संघर्ष वीर विशाल वढघुले यांची आप पार्टीच्या जिल्हा संघटक पदी नुकतीच नियुक्ती झाली.  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नांदगाव तालुका वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यात आम आदमी पक्षाच्या कार्यपद्धती व ध्येयधोरणे राबविण्यासाठी विशाल वडघुले यांनी वेळोवेळी केलेल्या कार्याची दखल पक्षाने घेतली. नार- पार नदीजोड प्रकल्पाची समावेशाबाबत आजही सरकारने कडे मागणी करत आहेत. विविध आंदोलने करून शहर व तालुक्यातील प्रश्न ते मांडत असतात. सर्व समाजातील लोकांशी संपर्क - संवाद साधत असतात. नांदगाव रेल्वे अंडर पास मध्ये लेंडी नदी पुराचे पाणी शिरले होते तेव्हा त्यांनी पाण्यात जाऊन प्रशासनासह लोकांचं लक्ष वेधले होते. अंडर पास किती अडचणी ठरतोय असे सांगितले. 





नांदगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांनी हाती घेतले शिवसेनेचे धनुष्यबाण, प्रवेश होताच तालुका संघटकपदी नियुक्ती!!








नांदगाव (प्रतिनिधी ) -  भुजबळांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नांदगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले . आमदार सुहास  कांदे व सौ. अंजुम सुहास कांदे यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना वाल्मीक टिळेकर यांनी मागील दहा वर्षांपासून माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या सोबत काम केले. पण अपेक्षित कामी झाली नाहीत आणि आमदार सुहास कांदे यांची कार्यपद्धत आधीपासूनच आवडत होती. आता सर्व समर्थकांकडून आम्ही हा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही अण्णांसोबत विकास कामांच्या सोबत आहोत असे मत व्यक्त केले. 
      याप्रसंगी वाल्मिक टिळेकर यांना (नांदगाव तालुका संघटक ) पदाची जबाबदारी देण्यात आली.
सोबतच गणेश पंडित सोमासे यांची (युवा सेना विभाग प्रमुखपदी) , शरद तुळशीराम महाजन यांची (युवा सेनेच्या नांदगाव शहर उपाध्यक्षपदी) , सतीश परशुराम महाजन यांची( युवासेनेच्या शहर सहसंघटक पदी), तर डॉ. वाल्मीक भास्कर महाजन यांची (शिवसेना नांदगाव शहर संघटक पदी ) नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल नावंदर यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्ष स्वागत केले.

नांदगाव येथील समृद्धी सहकारी बँक लिमिटेडचे उत्साहात उद्घाटन,








नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील सौ. अंजुम सुहास कांदे  चेअरमन असलेल्या  समृद्धी सहकारी बँक लिमिटेड  उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. आमदार सुहास कांदे व सौ . अंजुम कांदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.  याप्रसंगी नांदगाव मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी,  शिवसेना नेते पदाधिकारी,  महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास कांदे यांनी या बँकेच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला व्यापाऱ्यांना लहान मोठा व्यवसाय करणाऱ्यांना शेतकरी बांधवांना फायदा होईल. या प्रामाणिक हेतूने आम्ही बँक सुरू करत आहोत असे सांगितले. बँकेच्या शुभारंभ आधीच वीस कोटी रुपयांची ठेवी जमा झाली असून,  विधानसभा मतदारसंघातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. सौ. अंजुम कांदे यांनी यावेळी खातेदार आणि बँक यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असा विश्वास दाखवला. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नेतेमंडळी,  व्यापारी वर्ग , शेतकरी बांधव तसेच महिला वर्गांनी सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

मनमाड येथे शिवसेना ठाकरे पक्षाकडून हिंदी भाषा अनिवार्यता रद्द करावी प्रशासनाकडे निवेदन,







मनमाड (प्रतिनिधी ) - हिंदी भाषेचा वाद राज्याच्या राजकारणात जोर धरू लागला आहे. या वादात महायुती सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  मराठीचा गळा घोटण्याचे काम शिंदे - फडवीस सरकारच्या वतीने सुरू आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात आली. शाळेत इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा अनिवार्य करणाऱ्या परिपत्रकाची होळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मनमाड येथे करण्यात आली. तर ची अनिवार्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...